• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, June 6, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव: ईदगाह मैदानावर विनापरवाना ड्रोन कॅमेऱ्यांनी नमाजात आणला व्यत्यय; चौकशीची मागणी

admin by admin
April 3, 2025
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
धाराशिव: ईदगाह मैदानावर विनापरवाना ड्रोन कॅमेऱ्यांनी नमाजात आणला व्यत्यय; चौकशीची मागणी
0
SHARES
687
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –  रमजान ईदच्या पवित्र दिवशी धाराशिव (उस्मानाबाद) येथील ईदगाह मैदानावर नमाज पठणाच्या वेळी दोन खाजगी ड्रोन कॅमेरे विनापरवाना उडवल्याने प्रार्थनेत व्यत्यय आल्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप करत शहरातील मुस्लीम बांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शहरातील मुस्लीम बांधवांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ईदच्या दिवशी ईदगाह मैदानावर नमाज पठण आणि त्यानंतर खुतबा (धार्मिक प्रवचन) ऐकणे अनिवार्य असते. मात्र, यावेळी पोलीस प्रशासनाचा एक अधिकृत ड्रोन असतानाही, दोन खाजगी ड्रोन कॅमेरे परवानगीशिवाय अत्यंत खालच्या पातळीवरून उडवण्यात आले.

या ड्रोनच्या आवाजाने आणि पंख्याच्या हवेमुळे नमाज पठण करणाऱ्यांची एकाग्रता भंग झाली आणि धार्मिक प्रार्थनेत अडथळा निर्माण झाला, असे तक्रारीत नमूद केले आहे. प्रसिद्धीच्या हव्यासापोटी किंवा कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याच्या कुटील हेतूने हा प्रकार मुद्दाम घडवून आणल्याचा संशयही निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, ड्रोन खाली कोसळल्यास लहान मुले, वृद्ध किंवा इतर नमाजी व्यक्तींना गंभीर इजा होण्याची शक्यता होती, ज्यामुळे चेंगराचेंगरी होऊन मोठी दुर्घटना घडली असती. बीड जिल्ह्यात नुकत्याच घडलेल्या घटनेचा संदर्भ देत, अशा ड्रोनचा वापर समाजकंटकांकडून हल्ला करण्यासाठीही केला जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

या खाजगी ड्रोन कॅमेऱ्यांना कोणी परवानगी दिली, हे कॅमेरे उडवणारे व्यक्ती कोण होते आणि त्यांचे मालक कोण आहेत, याची सखोल चौकशी करून विनापरवाना ड्रोन वापरणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मुस्लीम बांधवांनी केली आहे.  या निवेदनावर अनेक नागरिकांच्या सह्या आहेत.  या तक्रारीनंतर प्रशासन ड्रोन उडवणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन काय कारवाई करते, याकडे लक्ष लागले आहे.

Previous Post

फडणवीस सरकारवर ओमराजेंचा घणाघात! विकास कामांवर स्थगितीवरून फेसबुक पोस्टद्वारे थेट टीका

Next Post

धाराशिव : ड्रोनवरून राजकीय “ड्रामा”! – रमजान ईदच्या मैदानात रीलच्या नावाखाली रणकंदन

Next Post
धाराशिव : ड्रोनची “ईलाही” उडाण! – रमजान ईदच्या मैदानात राजकारणाची रील सुरू!

धाराशिव : ड्रोनवरून राजकीय "ड्रामा"! – रमजान ईदच्या मैदानात रीलच्या नावाखाली रणकंदन

ताज्या बातम्या

YouTube चे क्रिएटर्ससाठी मोठे अपडेट; AI लेबल्स आणि स्टुडिओ फीचर्समध्ये महत्त्वाचे बदल

YouTube चे क्रिएटर्ससाठी मोठे अपडेट; AI लेबल्स आणि स्टुडिओ फीचर्समध्ये महत्त्वाचे बदल

June 6, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव जिल्ह्यात गोवंश तस्करी आणि अवैध मांस विक्रीवर पोलिसांची मोठी कारवाई! लोहारा आणि उमरग्यात गुन्हे दाखल

June 6, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

परंडा शहरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई! ६५ वर्षीय वृद्धाच्या घरातून ७८ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; गुन्हा दाखल

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

नळदुर्गमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फोकसवरून वाद; एकाला काठी आणि बतईने बेदम मारहाण, ५ जणांवर गुन्हा दाखल

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

बेंबळी हद्दीतील नितळी गावात शेताच्या बांधावरून धुमश्चक्री! सामाईक बांध फोडल्याच्या वादातून ५ जणांकडून प्रौढाला काठी आणि ढेकळाने बेदम मारहाण

June 6, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group