• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, April 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत धाराशिवचा मनोज माने अंतिम फेरीत

गादी विभागात धाराशिवचाआदित्य कांबळे अंतिम फेरीत

admin by admin
November 9, 2023
in क्रीडा
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत धाराशिवचा मनोज माने अंतिम फेरीत
0
SHARES
554
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

पुणे : महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत धाराशिवचा मनोज माने आणि नागपूरच्या शुभम मुसळे यांच्या ९२ किलो वजनी गटाची अंतिम लढत होणार आहे. उपांत्य फेरीत दोघांनी प्रतिस्पर्ध्यांचा कडवा प्रतिकार मोडून काढावा लागला. आदित्य कांबळे आणि स्वप्नील काशीद यांच्यात ७९ किलो वजनी गटात गादी विभागातील अंतिम लढत होणार आहे.

प्रदीपदादा कंद व पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने ६६ वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. फुलगाव येथील सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेमध्ये सुरु आहे.

स्पर्धेतील ९२ किलो वजनी गटातून माती विभागातून अंतिम फेरी गाठताना मनोज मानेने धाराशिवच्या सुनील नवलेचे आव्हान ८-४ असे परतवून लावले. विशेष म्हणजे पहिल्या फेरीत सुरुवातीलाच सुनीलने एकत्रित ४ गुणांची कमाई करून सनसनाटी सुरुवात केली. पण, त्यानंतर मनोजने दोन दोन गुणांची दोन वेळा कमाई करून पहिल्या फेरीत ४-४ अशी बरोबरी साधली.त्यानंतर सुनीलला बचावात्मक खेळण्याचा फटका बसला. उलट मनोजने दोनवेळा एकेक आणि एकदा दोन गुणांची घेत चार गुणांची कमाई करून विजयावर शिक्कामोर्तब केले. अंतिम फेरीत त्याची गाठ नागपूरच्या शुभम मुसळेशी पडणार आहे. शुभमनेही अंगद बुलबुलेचा पहिल्या फेरीतील प्रतिकार ८-५ असा परतवून लावला. अंगदने एकत्रित ४ आणि नंतर एका गुणाची कमाई करून पहिली फेरी जिंकली होती. पण, दुसऱ्या फेरीत शुभमने प्रतिआक्रमण करताना भारंदाज डावाचा पूर्ण वापर करत चार वेळा २ दोन गुणांची कमाई करताना विजयावर शिक्कामोर्तब केले.

याच वजनी गटात गादी विभागात विजय शिंदेने अंतिम फेरी गाठताना सोलापूरच्या निकेतन पाटीलचा तांत्रिक वर्चस्वावर १०-० असा पराभव केला. अन्य एका लढतीत पुण्याच्या अभिजित भोईने अनिकल जाधवचे आव्हान ७-१ असे मोडून काढले. स्पर्धेतील ८६ किलो वजनी गटातून विश्वचरण सोलकरने सांगलीच्या शुभम पवारचा ५-० असा पराभव करून अंतिम फेरी गाठली.

गादी विभागात ७९ किलो वजनी गटातन धाराशिवच्या आदित्य कांबळे याने नगरच्या धुळाजी ईटकरला तांत्रिक वर्चस्वावर ११-० असे हरवून अंतिम फेरी गाठली. पाच मिनिटे २२ सेकंद चाललेल्या या लढतीत आदित्यने सुरुवातीला १ नंतर एकत्रित ४ आणि पाठोपाठ तीनवेळा दोन दोन गुणांची कमाई करून विजयावर शिक्कामोर्तब केले. विजेतेपदाच्या लढतीत आदित्यची गाठ सोलापूरच्या स्वप्नील काशीदशी पडेल. स्वप्नील काशीदने वाशीमच्या स्वप्निल शिंदेचा गुणांवर ५-० असा पराभव केला.

Previous Post

धाराशिवसह संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा – आ. रोहित पवार

Next Post

धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रोड रॉबरी

Next Post
धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रोड रॉबरी

धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रोड रॉबरी

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात गुन्हेगारांचा सुळसुळाट; घरफोडी, चोरीसह ट्रॅक्टर पळविण्याचा प्रयत्न

April 22, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

जुन्या वादातून महिलेस दगडाने मारहाण, जीवे मारण्याची धमकी; तुगाव येथील घटनेप्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल

April 22, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

‘शेत का विकले?’ या रागातून प्रौढास दगडाने मारहाण; चिंचपूर ढगे येथील घटनेप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

April 22, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, जीवे मारण्याची धमकी; तरुणावर गुन्हा दाखल

April 22, 2026
धाराशिवला अवकाळीचा तडाखा; गारांच्या खचाने शेती उद्ध्वस्त, वीज पडून एकाचा बळी

धाराशिवला अवकाळीचा तडाखा; गारांच्या खचाने शेती उद्ध्वस्त, वीज पडून एकाचा बळी

April 22, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group