• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, September 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव-तुळजापूर महामार्गावर थरार! पहाटे वाहने अडवून मारहाण, लाखोंची लूट; प्रवासी भयभीत

admin by admin
April 10, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव-तुळजापूर महामार्गावर थरार! पहाटे वाहने अडवून मारहाण, लाखोंची लूट; प्रवासी भयभीत
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –  धाराशिव-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कावलदरा परिसरात आज (गुरुवार, दि. १० एप्रिल) पहाटेच्या सुमारास एक धक्कादायक दरोड्याची घटना घडली. तोंडाला मास्क लावलेल्या ५ ते ७ अज्ञात दरोडेखोरांनी रस्त्यावर दगड टाकून चार ते पाच चारचाकी वाहने अडवली, प्रवाशांना जबर मारहाण केली आणि त्यांच्याकडील लाखो रुपयांचा ऐवज लुटून नेला. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास हे दरोडेखोर कावलदरा परिसरातील महामार्गालगतच्या झाडीत दबा धरून बसले होते. त्यांनी अचानक रस्त्यावर दगडफेक करून वाहने थांबवली. त्यानंतर कुटुंबासोबत प्रवास करत असलेल्या ४ ते ५ गाड्यांमधील प्रवाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली. दरोडेखोरांनी वाहनांचे टायर फोडून नुकसान केले आणि प्रवाशांकडील रोख रक्कम, सोन्याचे दागिने, लॅपटॉप, आयफोन असा लाखोंचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून घेतला.

या घटनेनंतर सोलापूरहून धाराशिवकडे प्रवास करणाऱ्या कुरेशी नावाच्या एका चालकाने पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. मात्र, पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत सुमारे अर्धा ते एक तास उलटला होता आणि तोपर्यंत दरोडेखोर लूटमार करून पसार झाले होते.

या हल्ल्यात अनेक प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर तुळजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे व पुढील तपास करत आहेत.

Previous Post

धाराशिव बनावट औषध प्रकरण: गोळ्या निकृष्ट दर्जाच्या, उत्पादक कंपनीच बोगस! मोठे रॅकेट उघडकीस?

Next Post

सुरक्षेचे धिंडवडे: धाराशिव-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर पहाटे दरोडेखोरांचा हैदोस

Next Post
धाराशिव-तुळजापूर महामार्गावर थरार! पहाटे वाहने अडवून मारहाण, लाखोंची लूट; प्रवासी भयभीत

सुरक्षेचे धिंडवडे: धाराशिव-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर पहाटे दरोडेखोरांचा हैदोस

ताज्या बातम्या

पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR

पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR

September 18, 2026
एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

September 18, 2026
‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!

‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!

September 17, 2026
‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!

‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!

September 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : सामाजिक वनीकरण कार्यालयात घुसून वनरक्षकाच्या अंगावर ओतली काळी शाई; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

September 17, 2026

Recent Posts

  • पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR
  • एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल
  • ‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!
  • ‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!
  • उमरगा : सामाजिक वनीकरण कार्यालयात घुसून वनरक्षकाच्या अंगावर ओतली काळी शाई; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!