• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, March 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

परंड्यात तुळजापूरपेक्षा मोठे ड्रग्ज रॅकेट?

माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांचा दावा; मुख्यमंत्र्यांना भेटणार

admin by admin
April 26, 2025
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 1 min read
बार्शीत पोलिसांची मोठी कारवाई: एमडी ड्रग्ज, गावठी पिस्तूलसह तिघे गजाआड
0
SHARES
856
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा –  परंडा शहर आणि तालुक्यात नुकत्याच उघडकीस आलेल्या तुळजापूर प्रकरणापेक्षाही मोठे एमडी ड्रग्जचे रॅकेट कार्यरत असल्याचा खळबळजनक दावा भाजपचे नेते व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केला आहे. या रॅकेटची पाळेमुळे खणून काढून सूत्रधारांवर कठोर कारवाई करावी, यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी परंडा येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरण राज्यभर गाजत असताना, परंडा शहरातील काही जणांना या प्रकरणात अटक झाली आहे. याच पार्श्वभूमीवर श्री. ठाकूर यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “मी सोलापूर आणि धाराशिवच्या पोलीस अधीक्षकांच्या संपर्कात आहे. परंड्यातील ड्रग्ज रॅकेट हे तुळजापूरपेक्षाही मोठे असण्याची शक्यता आहे. या प्रकरणात कोणीही दोषी आढळल्यास, मग तो कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी असो, त्याची गय केली जाणार नाही.”

या प्रकरणातील आरोपींची बँक खाती तातडीने गोठवण्यात यावीत आणि मुख्य सूत्रधाराला (म्होरक्याला) अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत, असेही ठाकूर यांनी नमूद केले. मुख्यमंत्र्यांना भेटून या प्रकरणाची सविस्तर माहिती देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

परंड्यातील ९ जणांवर गुन्हा, ३ फरार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परंडा ड्रग्ज प्रकरणी आतापर्यंत परंड्यातील ९ जणांना आरोपी करण्यात आले आहे. यामध्ये असद हसन देशमुख, मेहफूज महेमद शेख, वसीम इसाक बेग, जावेद नवाबुद्दीन मुजावर, हसन फक्रस, दीपक काळे, साजिद चाँद मुजावर, फिरोज उर्फ मस्तान रसूल शेख व शेळके यांचा समावेश आहे. यापैकी जावेद मुजावर, फिरोज शेख व शेळके हे तिघे अद्याप फरार आहेत. याशिवाय, बार्शी येथील अय्याज शौकत शेख, जमीर असगर पटेल व सिरफराज उर्फ गोल्डी अस्लम शेख या तिघांचाही आरोपींमध्ये समावेश आहे.

या पत्रकार परिषदेला किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अॅड. संतोष सूर्यवंशी, अॅड. जहीर चौधरी, तालुकाध्यक्ष अरविंद रगडे, समरजितसिंह ठाकूर आदी उपस्थित होते.

Previous Post

उमरगा येथे वॉचमनला चाकू-रॉडने मारहाण करून लुटणारे १२ तासांत जेरबंद

Next Post

उमरग्यात अवकाळी पावसाचा कहर: वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, गाय – बैलही दगावला

Next Post
उमरग्यात अवकाळी पावसाचा कहर: वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, गाय – बैलही दगावला

उमरग्यात अवकाळी पावसाचा कहर: वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, गाय - बैलही दगावला

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group