• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, June 28, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उमरग्यात अवकाळी पावसाचा कहर: वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, गाय – बैलही दगावला

admin by admin
April 26, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
उमरग्यात अवकाळी पावसाचा कहर: वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, गाय – बैलही दगावला
0
SHARES
485
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा –  उमरगा तालुक्यात शुक्रवार, दिनांक २५ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसाने आणि विजांच्या कडकडाटाने मोठे नुकसान केले आहे. या नैसर्गिक आपत्तीत वीज कोसळून एका तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एका बैलालाही आपला जीव गमवावा लागला. तालुक्यात अनेक ठिकाणी वित्तहानी झाल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील बोरी येथील रहिवासी अमोल संतराम मदने (वय ३५) यांचा शुक्रवारी दुपारी वीज पडून मृत्यू झाला. अमोल हे आपल्या शेतात खत पसरण्याचे काम करत होते. अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाल्याने ते काम लवकर संपवण्याच्या तयारीत असतानाच अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. अमोल हे कुटुंबातील कर्ते पुरुष होते, त्यांच्या निधनामुळे मदने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, तालुक्यातील पेठसांगवी येथील राम सुभेदार यांची गाय तसेच एकुर्गा येथील राम सरवदे यांच्या मालकीचा एक बैल दगावला आहे. यामुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

शुक्रवारी झालेल्या या अवकाळी पावसाचा फटका उमरगा तालुक्यातील एकुर्गा, बेटजवळगा, मैंदर्गी, टाकळी, बोरी, जकेकूरवाडी अशा अनेक गावांना बसला. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा जोरदार कडकडाट झाला. जकेकूरवाडी येथे नानाराव सूर्यवंशी यांच्या शेतातील एका झाडावर वीज पडल्याने ते झाड पूर्णपणे जळून गेले. तसेच, वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी आंब्याच्या झाडांचे आणि इतर पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून मदत करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

Previous Post

परंड्यात तुळजापूरपेक्षा मोठे ड्रग्ज रॅकेट?

Next Post

परंड्याचं ‘एमडी’ पुराण २.०: पिक्चर अभी बाकी है… पण नेते मैदानात!

Next Post
परंड्याचं ‘एमडी’ पुराण २.०: पिक्चर अभी बाकी है… पण नेते मैदानात!

परंड्याचं 'एमडी' पुराण २.०: पिक्चर अभी बाकी है... पण नेते मैदानात!

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

वाशी तालुक्यात धाडसी घरफोडी; बंद घराचे कुलूप तोडून अडीच लाखांचे दागिने लंपास

June 28, 2025
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

परंड्यात गाडीचा फोकस जास्त लावल्याच्या कारणावरून तरुणाला मारहाण

June 28, 2025
चिंचपूरच्या शाळेत शिक्षकच दारूच्या नशेत हजर; ग्रामस्थांनी केली व्हिडिओ शूटिंग

चिंचपूरच्या शाळेत शिक्षकच दारूच्या नशेत हजर; ग्रामस्थांनी केली व्हिडिओ शूटिंग

June 28, 2025
नामरंगी रंगले भक्त, विठ्ठल भेटीचा मार्ग सोपा

नामरंगी रंगले भक्त, विठ्ठल भेटीचा मार्ग सोपा

June 28, 2025
अर्थांच्या आत्महत्येला आव्हान देणारी कवयित्री: सुनीता झाडे

अर्थांच्या आत्महत्येला आव्हान देणारी कवयित्री: सुनीता झाडे

June 27, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group