• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, April 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये ५१ हजारांच्या वर्गणीची मागणी करून हॉटेल मालकाला मारहाण

admin by admin
April 26, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
0
SHARES
3.9k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –  धाराशिव शहरातील एका चायनिज रेस्टॉरंट मालकाला केवळ खाल्लेल्या पदार्थांचे बिल मागितल्याच्या कारणावरून सहा जणांनी मिळून शिवीगाळ व जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. आरोपींनी मालकाकडील रोख रक्कम हिसकावून घेत ५१ हजार रुपयांच्या वर्गणीची मागणी केली, हॉटेलमध्ये तोडफोड केली आणि जीवे मारण्याची धमकीही दिली. ही घटना २५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली.

फिर्यादी संकेत सूर्यकांत सूर्यवंशी (वय ३७, रा. शिवनेरी चौक, तांबरी विभाग, धाराशिव) यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील चौपाटी येथे ‘हॉटेल सूर्या चायनिज रेस्टॉरंट’ आहे. फिर्यादीनुसार, २५ एप्रिल रोजी सायंकाळी आरोपी आकाश बनसोडे, जानराव ॲम्ब्युलन्सचा चालक आणि इतर चार अनोळखी इसम (सर्व रा. धाराशिव) हे त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये आले होते.

फिर्यादी सूर्यवंशी यांनी त्यांना खाल्लेल्या पदार्थांचे बिल मागितले असता, आरोपींनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच एका टोकदार वस्तूने वार करून जखमी केले. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी फिर्यादीकडील ५ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि येत्या २७ एप्रिल रोजी असलेल्या जयंतीसाठी ५१ हजार रुपयांची वर्गणी द्यावी लागेल, अशी मागणी केली. यानंतर आरोपींनी रेस्टॉरंटमधील कॅश काउंटरची काच फोडून नुकसान केले आणि फिर्यादी संकेत सूर्यवंशी यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी संकेत सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९१(३), १९०, ११९(१), ३२४(४) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास करत आहेत.

Previous Post

दिंडेगावात दोन गटांत तुफान हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल, २७ जणांवर कारवाई

Next Post

उमरग्यातील बेळंब तांड्यावर जुन्या भांडणातून कुटुंबावर हल्ला; कुऱ्हाड, दगडाने मारहाण, ७ जणांवर गुन्हा

Next Post
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

उमरग्यातील बेळंब तांड्यावर जुन्या भांडणातून कुटुंबावर हल्ला; कुऱ्हाड, दगडाने मारहाण, ७ जणांवर गुन्हा

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात गुन्हेगारांचा सुळसुळाट; घरफोडी, चोरीसह ट्रॅक्टर पळविण्याचा प्रयत्न

April 22, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

जुन्या वादातून महिलेस दगडाने मारहाण, जीवे मारण्याची धमकी; तुगाव येथील घटनेप्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल

April 22, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

‘शेत का विकले?’ या रागातून प्रौढास दगडाने मारहाण; चिंचपूर ढगे येथील घटनेप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

April 22, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, जीवे मारण्याची धमकी; तरुणावर गुन्हा दाखल

April 22, 2026
धाराशिवला अवकाळीचा तडाखा; गारांच्या खचाने शेती उद्ध्वस्त, वीज पडून एकाचा बळी

धाराशिवला अवकाळीचा तडाखा; गारांच्या खचाने शेती उद्ध्वस्त, वीज पडून एकाचा बळी

April 22, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group