• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, April 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूरमधील प्रसिद्ध हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाच्या अपहरणाचा प्रयत्न, मारहाण करून रस्त्यावर फेकले

admin by admin
July 24, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापूरमधील प्रसिद्ध हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाच्या अपहरणाचा प्रयत्न, मारहाण करून रस्त्यावर फेकले
0
SHARES
1.6k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर : सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्धीझोतात आलेल्या येथील हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांच्या अपहरणाचा धक्कादायक प्रकार बुधवारी, दि. २३ रोजी सायंकाळी घडला. सेल्फी काढण्याच्या बहाण्याने गाडीत ओढून त्यांना जबर मारहाण करण्यात आली आणि वडगाव (सि.) जवळ फेकून देण्यात आले. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव रोडवरील हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके हे बुधवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास हॉटेलसमोर उभे होते. यावेळी एका चारचाकी गाडीतून आलेल्या काही व्यक्तींनी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याची इच्छा व्यक्त केली. मडके सेल्फीसाठी जवळ जाताच, गाडीतील पाच जणांनी त्यांना जबरदस्तीने गाडीत ओढले.

आरोपींनी गाडीत मडके यांना जबर मारहाण केली आणि जीवे मारण्याचा त्यांचा डाव होता, असा आरोप नागेश मडके यांनी केला आहे. गाडी धाराशिवच्या दिशेने नेल्यानंतर, अपहरणकर्त्यांनी मडके यांना वडगाव (सि.) येथील पुलावर फेकून दिले आणि तेथून पळ काढला.

घटनेनंतर मडके यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला, त्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

वारंवार होणारे हल्ले आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

हॉटेल भाग्यश्री गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. मागील महिन्यात काही अज्ञातांनी हॉटेलवर हल्ला करून पोस्टर फाडले होते, तर गेल्या आठवड्यात हॉटेलमध्ये हाणामारीची घटनाही घडली होती. सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यामुळे या हॉटेलमध्ये जेवणासाठी मोठी गर्दी असते. सुरक्षेसाठी बाऊन्सर तैनात केलेले असतानाही मालकाच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना परदेशात प्रशिक्षणाची संधी: ५ शेतकऱ्यांची होणार निवड

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चोरी आणि लूटमारीच्या घटनांमध्ये वाढ; एकाच दिवशी विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरी आणि लूटमारीच्या घटनांमध्ये वाढ; एकाच दिवशी विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात गुन्हेगारांचा सुळसुळाट; घरफोडी, चोरीसह ट्रॅक्टर पळविण्याचा प्रयत्न

April 22, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

जुन्या वादातून महिलेस दगडाने मारहाण, जीवे मारण्याची धमकी; तुगाव येथील घटनेप्रकरणी ११ जणांवर गुन्हा दाखल

April 22, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

‘शेत का विकले?’ या रागातून प्रौढास दगडाने मारहाण; चिंचपूर ढगे येथील घटनेप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

April 22, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, जीवे मारण्याची धमकी; तरुणावर गुन्हा दाखल

April 22, 2026
धाराशिवला अवकाळीचा तडाखा; गारांच्या खचाने शेती उद्ध्वस्त, वीज पडून एकाचा बळी

धाराशिवला अवकाळीचा तडाखा; गारांच्या खचाने शेती उद्ध्वस्त, वीज पडून एकाचा बळी

April 22, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group