नळदुर्ग : फिर्यादी नामे-एकनाथ निवृत्ती जाधव, वय 40 वर्षे, रा. मराठा गल्ली नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे आलियाबाग शिवारात शेत गट नं 15 येथुन चार काळ्या रंगाच्या मोठ्या शेळ्या व पाच काळया रंगाचे लहान पिल्ले असा एकुण 43,000₹ किंमतीच्या शेळ्या व पिल्ले हे दि. 15.12.2023 रोजी 23.20 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे-एकनाथ जाधव यांनी दि.21.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : फिर्यादी नामे-मनोज महाविर कदम, वय 32 वर्षे, रा. जळकोट, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे जळकोट शिवारातील शेत गट नं 763 मधील 3 एकर तुरीच्या पिकापैकी 1.5 एकर तुरीचे पीक मध्ये बेकायदेशीर रित्या आरोपी नामे- 1) नवनाथ व्यंकट कदम, 2) महेश नवनाथ कदम, 3) हरीदास नवनाथ् कदम, 4)संतोषनवनाथ् कदम, सर्व रा. जळकोट ता. तुळजापूर जि. धाराशिवयांनी दि. 20.12.2023 रोजी 13.00 ते दि. 21.12.2023 रोजी 11.00 वा. सु. प्रवेश करुन फिर्यादीच्या संमतीशिवाय कापून नुकसान करुन अंदाजे 15 पाकीट तुर असा एकुण 60,000₹ किंमतीचे तुरीचे पॉकीट संगणमत करुन चोरुन नेले. सदर शेता बाबत फिर्यादीने मा. कोर्ट तुळजापूर येथे मनाई हुकुमाचा दावा दाखल असुन तो अदयाप न्यायप्रविष्ठ आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मनोज कदम यांनी दि.21.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 379, 447, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा : फिर्यादी नामे-बालाजी कुंडलिक सुर्यवंशी, वय 25 वर्षे, रा.उंडरगाव, ता. लोहारा जि. धाराशिव यांची अंदाजे 60,000 ₹ किंमतीची हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल क्र एमएच 25 एपी 8427 कळ्या रंगाची ही दि.05.06.2023 रोजी 11.30 ते दि. 06.06.2023 रोजी 06.00 वा. सु बालाजी सुर्यवंशी यांचे राहाते घराचे समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बालाजी सुर्यवंशी यांनी दि.21.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.