वाशी :आरोपी नामे- 1)आप्पा सोपान चव्हाण,2)अभिजीत आप्पा चव्हाण, 3) आदीत्य आप्पा चव्हाण, 4) माउली मारुती गावडे, व इतर तीन इसम( नाव पत्ता माहित नाही), रा. पखरुड ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.25.10.2023 रोजी 18.00 वा .सु. बेलेश्वर डोंगराजवळ पखरुड येथे फिर्यादी नामे-जगन्नाथ लक्ष्मण कांबळे, वय 31 वर्षे, रा. पखरुड,ता. भुम जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी गैरकायद्याच्या मंडळी जमवून जातीवाचक शिवीगाळ करुन काठीने मारहान करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- जगन्नाथ कांबळे यांनी दि.21.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 324, 143, 147, 148, 149, 323, 504, 506, भा.दं.वि.सं. 3(1) (आर) (एस), 3(2)(व्हिए) अ.जा.ज.अ.प्र. कायदा अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंडा :आरोपी नामे-1) रामकृष्ण सोमनाथ सानप रा. रामेश्वर ता. भुम जि. धाराशिव व अनोळखी तीन इसम यांनी दि.20.12.2023 रोजी 15.00 ते 16.00 वा. सु. भुम ते वारदवाडी रोडवर वांगी फाटा येथे फिर्यादी नामे- अमोल भरत दराडे, वय 35 वर्षे, रा. रामेश्वर ता. भुम जि. धाराशिव यांना नमुद आरोपींने राजकरणाच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, बाभळीच्या काठीने मारहाण केली. तु जर आमच्या विरोधात तक्रार दिली तर तुला जिवे ठार मारु अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- अमोल दराडे यांनी दि.21.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी :आरोपी नामे-महेमद शब्बीर शेख, वय 42 वर्षे, 2) नुजत महंमद शेख दोघे रा. धुत्ता ता. जि. धाराशिव यांनी दि. 10.12.2023 रोजी 15.45 वा. सु. धुत्ता ता. जि. धाराशिव येथे फिर्यादी नामे- साहिल महंमद शेख वय 18 वर्षे, रा. धुत्ता, ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने कौटुंबिक वादाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी कोयत्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीचा भाउ हे भांडण सोडवण्यास आले असता नमुद आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- साहिल शेख यांनी दि.21.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे कलम 326, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब :आरोपी नामे-संयोगिता उत्तरेश्वर पानढवळे, रा. तांदुळवाडी, ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 21.12.2023 रोजी 13.30 वा. सु. तांदुळवाडी शिवार येथे फिर्यादी नामे-अन्नपुर्णा उर्फ राधा बालाजी डिकले, वय 39 वर्षे, रा. तांदुळवाडी, ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने उसात शेळ्या चारण्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड व उसाने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- अन्नपुर्णा डिकले यांनी दि.21.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 324, 323 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब :आरोपी नामे-1)अन्नपुर्णा उर्फ राधा बालाजी डिकले, वय 39 वर्षे,2)बालाजी बळीराम डिकले, 3) बाबा उर्फ रोहीत बालाजी डिकले, 4)प्रिया बालाजी डिकले सर्व रा. तांदुळवाडी, ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 21.12.2023 रोजी 14.40 वा. सु. जेजरत डिकले यांचे शेताजवळील ओढ्याजवळ तांदुळवाडी शिवार येथे फिर्यादी नामे- संयोगिता उत्तरेश्वर पानढवळे, वय 33 वर्षे, रा. तांदुळवाडी, ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड व उसाने मारहान करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- संयोगिता पानढवळे यांनी दि.21.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.