• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, March 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नळदुर्ग घोषणा प्रकरण: सकल हिंदू समाजाकडून गुरुवारी ‘शहर बंद’ची हाक; भवानी चौकात एकत्र येण्याचे आवाहन

admin by admin
September 10, 2025
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
नळदुर्गमध्ये औरंगजेबाच्या नावाने घोषणा: हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, पोलीस ठाण्यात निवेदन दाखल
0
SHARES
878
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग: ईद-ए-मिलाद मिरवणुकीत औरंगजेबाच्या नावाचा जयघोष केल्याच्या घटनेचे पडसाद आता अधिक तीव्र झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपींवर कारवाईच्या मागणीसाठी सकल हिंदू समाज संघटनेने येत्या गुरुवारी, दिनांक ११ सप्टेंबर रोजी ‘नळदुर्ग बंद’ची हाक दिली आहे.

या दिवशी शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात येणार असल्याचे संघटनेने जाहीर केले आहे. शहरातील सर्व व्यापारी आणि हिंदू बांधवांनी या बंदला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या आंदोलनाचा भाग म्हणून, गुरुवारी सकाळी १०:३० वाजता शहरातील भवानी चौक येथे सर्वांनी एकत्र जमावे, असे आवाहन सकल हिंदू समाजच्या वतीने करण्यात आले आहे. येथून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाण्याची शक्यता आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात तणावपूर्ण शांतता असून, पोलीस प्रशासनाने खबरदारी म्हणून सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.


काय आहे प्रकरण?

काही दिवसांपूर्वी रविवारी  ( दि. ७ सप्टेंबर ) नळदुर्ग शहरात पैगंबर जयंतीनिमित्त (ईद-ए-मिलाद) एक मिरवणूक काढण्यात आली होती. याच मिरवणुकीदरम्यान, काही तरुणांनी अचानक ‘आलमगीर औरंगजेब’ या नावाने घोषणा देण्यास सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना अनन्वित छळ सोसावा लागलेल्या ज्या औरंगजेबाला महाराष्ट्राचा शत्रू मानले जाते, त्याच्याच नावाचा जयघोष महाराष्ट्राच्या भूमीत झाल्याने अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. या घटनेचा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामुळे शहरात संतापाची लाट उसळली आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले.

सकल हिंदू समाजाचा आक्षेप आणि पोलिसांची भूमिका

या घटनेनंतर, सकल हिंदू समाज संघटनेच्या नेतृत्वाखाली शहरातील नागरिक आणि विविध हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत या प्रकाराचा तीव्र निषेध केला. त्यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात धाव घेत पोलीस निरीक्षक आणि तुळजापूरच्या तहसीलदारांना निवेदन सादर केले. या निवेदनात, सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावणाऱ्या या समाजकंटकांवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली.

यावर पोलिसांनी, “तुम्ही  तक्रार (फिर्याद) दाखल करा, त्यानंतर आम्ही गुन्हा दाखल करू,” अशी भूमिका घेतली. पोलिसांच्या या भूमिकेवर सकल हिंदू समाजाने तीव्र आक्षेप घेतला. “प्रत्येक मिरवणुकीत पोलीस स्वतः चित्रीकरण करतात, ते फुटेज तपासून पोलीस स्वतःहून गुन्हा का दाखल करत नाहीत? पोलिसांवर कुणाचा राजकीय दबाव आहे का?” असे संतप्त सवाल संघटनेकडून उपस्थित करण्यात आले.

 

Previous Post

भूममध्ये शासकीय कर्मचाऱ्यांवर कोयता आणि हॉकी स्टिकने जीवघेणा हल्ला, एक गंभीर

Next Post

दिवाळीनिमित्त हडपसर ते लातूर विशेष रेल्वे धावणार …

Next Post
दिवाळीनिमित्त हडपसर ते लातूर विशेष रेल्वे धावणार …

दिवाळीनिमित्त हडपसर ते लातूर विशेष रेल्वे धावणार ...

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group