• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, March 12, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

खंडाळा येथे दिवसाढवळ्या घरफोडी; पत्रे उचकटून चोरट्यांनी लंपास केला दीड लाखांचा ऐवज

admin by admin
October 2, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
88
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर –  तालुक्यातील खंडाळा येथे अज्ञात चोरट्यांनी दिवसाढवळ्या एका घराचे पत्रे उचकटून आत प्रवेश करत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण दीड लाखांपेक्षा जास्त किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी हा डल्ला मारला.

याप्रकरणी नारायण सुधाकर पवार (वय ३५, रा. खंडाळा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नारायण पवार यांचे घर मंगळवार, दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते दुपारी दीड वाजेच्या दरम्यान बंद होते. याच वेळेचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत घराच्या छताचे पत्रे उचकटले आणि आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी घरातील एका खोलीचा कडी-कोंडा तोडून कपाटात ठेवलेले ४९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ४० हजार रुपयांची रोकड असा एकूण १ लाख ५६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

घरी परतल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात येताच नारायण पवार यांनी दुसऱ्या दिवशी तुळजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(३) आणि ३०५ अन्वये घरफोडीचा गुन्हा नोंदवला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Previous Post

कळंबमध्ये जुन्या वादातून चाकू-वस्तऱ्याने हल्ला, पाच जणांवर गुन्हा दाखल

Next Post

धाराशिव जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात: अतिवृष्टीने पीक उद्ध्वस्त, बँकांकडून कर्ज वसुलीच्या नोटिसा

Next Post
धाराशिव जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात: अतिवृष्टीने पीक उद्ध्वस्त, बँकांकडून कर्ज वसुलीच्या नोटिसा

धाराशिव जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात: अतिवृष्टीने पीक उद्ध्वस्त, बँकांकडून कर्ज वसुलीच्या नोटिसा

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

घरी एकटी असल्याचा गैरफायदा घेत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार;

March 11, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची तक्रार केल्याचा राग; वाघोलीत ५६ वर्षीय व्यक्तीला बेदम मारहाण, ६ जणांवर गुन्हा दाखल

March 11, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

नाचताना पायावर पाय पडल्याच्या क्षुल्लक कारणावरून तरुणावर लोखंडी कत्तीने हल्ला

March 11, 2026
धाराशिव झेडपी सत्तानाट्य: अखेर मुहूर्त ठरला! १३ मार्चला अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड

धाराशिव झेडपी सत्तानाट्य: अखेर मुहूर्त ठरला! १३ मार्चला अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड

March 11, 2026
टायर फुटल्याने भीषण अपघात : उमरग्यात दोघांचा जागीच मृत्यू, एक जखमी

टायर फुटल्याने भीषण अपघात : उमरग्यात दोघांचा जागीच मृत्यू, एक जखमी

March 10, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group