भूम : फिर्यादी नामे-विनायक हनुमान दहिबाळ, वय 18 वर्षे, रा. समर्थ नगर भुम ता. भुम जि. धाराशिव हे व त्यांचे वडील हे मोटरसायकलवरुन जात असताना दि. 29.12.2023 रोजी 20.15 वा. सु. समर्थ नगर भुम येथे दोन मोटरसायकलवर चार अनोळखी इसमांनी पाठलाग करुन त्यांची मोटरसायकल आडवून झटापट करुन त्यातील एका इसमाने गावठी कट्टयाने फायर करुन विनायक दहिबाळ यांचे वडीलांचे हातातील पैशाची बॅग जबरीने चोरुन नेहण्याचा प्रयत्न केला. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विनायक दहिबाळ यांनी दि.29.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे कलम 341, 394, 393 भा.दं.वि.सं. सह भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : फिर्यादी नामे-मोहम्मंद हिल्लाउुद्दीन मोहंमद जललाउद्दीन हुसामी वय 28 वर्षे, रा.कुमारवाडी फत्ते दरवाजा हैद्राबाद राज्या तेलंगणा हे मुंबई येथुन हैद्राबाद येथे गुजरात ट्रॅव्हल्स कंपनीच्या खजगी बसमध्ये प्रवास करत असताना दि.29.12.2023 रोजी 11.45 ते 12.30 वा. सु. नळदुर्ग येथील दिल्ली दरबार धाब्या समोर जेवणासाठी गाडी थाबल्याने फिर्यादी हे सिटवर बॅग ठेवून जेवण करण्यासाठी उतरले असता मोहम्मंद हिल्लाउुद्दीन हुसामी यांचा अंदाजे 5,000₹ किंमतीचा एससीईर कंपनीचा निळ्या रंगाचा लॅपटॉप व घराचे कागदपत्र, पेनड्रईव्ह व इतर कागदपत्र असा एकुण 5,500₹ किंमतीचे साहित्य अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मोहम्मंद हिल्लाउुद्दीन हुसामी यांनी दि.29.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी : फिर्यादी नामे- प्रदिप बळीराम शिंदे, वय 28 वर्षे, रा. धारुर ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 30,000₹ किंमतीची शाईन मोटरसायकल क्र एमएच 25 ए.टी. 7726 ही दि. 20.12.2023 रोजी 01.00 वा. सु. फिर्यादी यांचे घराचे बाजूस असलेले लक्ष्मण जालिंदर कोनाळे यांचे शेडसमोर अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रदिप शिंदे यांनी दि.29.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा : फिर्यादी नामे-निर्मला शाम पानढवळे, वय 60 वर्षे, रा. रांजणी ता. कळंब जि. धाराशिव या दि. 29.12.2023 रोजी उमरगा बसस्थानक येथुन लातुर येथे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना त्यांचे 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे 50,000₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून चोरुन नेले. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- निर्मला पानढवळे यांनी दि.29.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे- वासुदेव पांडुरंग शिंदे, वय 53 वर्षे, रा. आझाद चौक मंदीर गल्ली लातुर ता. जि. लातुर ह.मु. दिपक पुजारी निवास खामकर पेट्रोलपंप समोर माणिक चौक धाराशिव ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 40,000₹ किंमतीची फॅशन प्रो कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल क्र एमएच 25 ए.झेड 4119 ही दि. 11.10.2023 रोजी 08.30 ते दि. 12.10.2023 रोजी 06.00 वा. सु. देशपांडे निवास माणिक चौक धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- वासुदेव शिंदे यांनी दि.29.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
ढोकी :आरोपी नामे- 1)प्रकाश भगवान गरड, 2) बाबासाहेब माणिक हाजगुडे, 3) आशिष बाबासाहेब हाजगुडे, 4)ज्ञानेश्वर चतुभुज हाजगुडे, 5) अशोक चर्तुभुज हाजगुडे, 6) आशा प्रकाश गरड, 7) वनमाला बाबासाहेब हाजगुडे सर्व रा. तुगाव ता. जि. धाराशिव यांनी दि.06.03.2023 रोजी 08.45 वा .सु. तुगाव येथे फिर्यादी नामे-धनाजी रमेश गरड, वय 22 वर्षे, रा. तुगाव ता. जि. धाराशिव, यांना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून नमुद आरोपीने पैकी आशिष हाजगुडे यांनी बैलगाडी अंगावर घातल्याने फिर्यादी हे विचारण्यास गेल्याचे कारणावरुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कुह्राड, गज, काठी व दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादीची पत्नी या भांडण सोडवण्यास आल्या असता त्यांनाही शिवीगाळ करुन मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. मा. मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय धाराशिव यांचे संदर्भ जा क्र फौजदारी/3506/2023 मा.मु.न्या.दं.प्र.वर्ग यांचे कडील फिर्यादी- धनाजी गरड यांनी दि.29.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 307, 143, 146, 148, 149, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.