धाराशिव : वेश्या व्यवसाय प्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेना ( उबाठा ) सेनेचा पदाधिकारी आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा युवक प्रदेशाध्यक्ष नितीन शेरखाने याचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे शेरखाने याचा जिल्हा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.
तुळजापूर ते धाराशिव नॅशनल हायवेच्या रस्त्यालगत असलेल्या ‘निसर्ग गारवा लॉज मध्ये मागील अनेक दिवसांपासून वेश्या व्यवसाय सुरु होता. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानंतर दि. २१ डिसेंबर रोजी पोलिसांनी या लॉजवर छापा मारला असता, चार महिलांसह काही ग्राहक मिळून आले होते.याप्रकरणी लॉजमालक नितीन शेरखाने यांच्यासह गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर शेरखाने फरार झाला होता. पोलिसांनी अखेर शेरखाने याच्या मागील रविवारी पहाटे मुसक्या आवळल्या होत्या. त्यास सुट्टीच्या कोर्टात उभे करण्यात आले असता, तीन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली होती. तीन दिवसाची पोलीस कस्टडी संपताच, पुन्हा कोर्टात उभे करण्यात आले असता, जेलमध्ये रवानगी करण्यात आली होती.
न्यायालयीन कोठडीत रवानगी होताच, नितीन शेरखाने याने वकील ऍड. अमोल वरुडकर यांच्या मार्फत जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा वर सत्र न्यायाधीश व्ही.जी, मोहिते यांच्यासमोर झाली. यावेळी ऍड. अमोल वरुडकर यांनी जोरदार युक्तिवाद केला. निसर्ग गारवा लॉज हे नितीन शेरखाने याच्या मालकीचे असले तरी मॅनेजर दिलीप रामदास आडसुळे यास ५ लाख डिपॉझिट आणि दरमहा ७० हजार रुपये भाड्याने चालवण्यास देण्यात आल्याचे सांगितले आणि तसा भाडेपत्र करार दाखवला, पण बँक स्टेटमेंट दिले नाही. तसेच लॉजवर आलेले पैसे स्कॅन केल्यानंतर नितीन शेरखाने याच्या बँक खात्यावर जात असल्याचा पुरावा पोलिसांनी न्यायालयात दिला. त्यामुळे भाडेतत्वावर लॉज चालवण्यास देण्यात आल्याचा शेरखाने याचा बनाव न्यायाधीश मोहिते यांच्या लक्षात आला.
तसेच वेश्या जमनसाठी आलेल्या ग्राहकाकडून किमान एक हजार पाचशे रुपये घेतले जात होते. पैकी पीडित महिलेला ६०० रुपये, दलाल बालाजी गवळी यास ३०० आणि उर्वरित रक्कम शेरखाने यास मिळत होती. तसेच मॅनेजर मॅनेजर दिलीप रामदास आडसुळे यास लॉजचा मॅनेजर म्हणून मासिक १२ हजार पगार होता तसेच ग्राहकाकडून टीप मिळत होती. याचे पुरावेच पोलिसांनी सादर केल्याने अतिरिक्त जिल्हा वर सत्र न्यायाधीश व्ही.जी, मोहिते यांनी नितीन शेरखाने याचा जामीन फेटाळून लावला.
‘निसर्ग गारवा लॉज मध्ये सेक्सची उब घेण्यासाठी आजवर किती महिला आल्या, कोण ग्राहक आले, त्यांच्याकडून किती रक्कम घेतली याचा तपास पोलीस करीत असून, अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
काय आहे प्रकरण ?
धाराशिव शहरात तुळजापूर ते धाराशिव नॅशनल हायवेच्या रस्त्यालगत असलेल्या ‘निसर्ग गारवा लॉज’ येथे लॉज चालक- व्यवस्थापक हॉटेलमध्ये काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करवुन घेत आहेत. यावर पोलीस पथकाने एका बनावट ग्राहकास तेथे पाठवून बातमीची खात्री करुन नमूद लॉजवर दि. 21.12.2023 रोजी 16.05 वा. सु. छापा टाकला असता लॉज मध्ये चार महिला (नाव- गाव गोपनीय) आढळुन आल्याने महिला पोलीसांमार्फत त्यांची विचारपुस केली असता हॉटेल चालक दिलीप रामदास आडसुळे, वय 63 वर्षे,रा. करंजकर हॉस्पीटल जवळ धाराशिव,दलाल- बालाजी चंद्रकांत गवळी, वय 29 वर्षे, रा. लहुजी नगर नागनाथ रोड धाराशिव, हे दोघेजण नमुद लॉजचे मालक 1)नितीन रोहीदास शेरखाने रा. धाराशिव यांचे सांगण्यावरुन त्या महिलांना वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देउन त्यांना लैंगीक स्वैराचाराकरीता परावृत्त करत होते व नमुद तिघेजण त्यावर स्वत:ची उपजिवीका करत आहेत असे समजले.
यावरुन पथकाने लॉज मॅनेजर नामे- 1) दिलीप रामदास आडसुळे, वय 63 वर्षे, रा. करंजकर हॉस्पीटल जवळ धाराशिव, दलाल-2) बालाजी चंद्रकांत गवळी, वय 29 वर्षे, रा. लहुजी नगर नागनाथ रोड धाराशिव, यांना ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातील मोबाईल फोन, नोंदीचे रजिस्टर, ॲटोरिक्षा क्र एमएच 09 जे 8134, रोख रक्कम 16,130 व निरोधची पाकीटे असा एकुण 71,130 ₹ माल हस्तगत केला. पोलीसांनी संबंधीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या लॉजवरील त्या महिलांची सुटका करुन लॉजमालक नितीन रेाहीदास शेरखाने रा. धाराशिव, लॉज मॅनेजर दिलीप रामदास आडसुळे, वय 63 वर्षे,रा. करंजकर हॉस्पीटल जवळ धाराशिव, दलाल- बालाजी चंद्रकांत गवळी, वय 29 वर्षे, रा. लहुजी नगर नागनाथ रोड धाराशिव, यांचेविरुध्द गुरनं 352/2023 भा.दं.वि. सं. कलम- 370, 370 (अ) (2), 34 सह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम- 3, 4, 5 अन्वये धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात दि. 21.12.2023 रोजी गुन्हा नोंदवला आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर नितीन शेरखाने फरार झाला होता. पोलिसांनी रविवारी पहाटे त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक केली आहे.
अटकेनंतर ग्रामीण पोलिसांनी त्यास सुट्टीच्या कोर्टात उभे केले असता, तीन दिवसाची म्हणजे २६ डिसेंबर पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली होती. तीन दिवसाची पोलीस कस्टडी संपताच, आज पुन्हा कोर्टात उभे करण्यात आले असता, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर नितीन शेरखाने याची जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
धाराशिव शहरात आणखी काही लॉजवर राजरोस वेश्या व्यवसाय सुरू आहे. शहर आणि आनंदनगर पोलीस, धाराशिव ग्रामीण पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हप्ता घेऊन मूग गिळून गप्प आहेत.हप्ता नाही मिळाला की, छापा मारला जातो नाही तर ‘तेरी भी चूप , मेरी भी चूप असा प्रकार सुरु आहे.