• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, March 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे वृद्ध महिलेचा खून

नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाची मालिका सुरूच; केशेगाव, फुलवाडी पाठोपाठ आता जळकोटमध्ये रक्ताचा सडा

admin by admin
November 22, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक
0
SHARES
3.5k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर: तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीने डोके वर काढले असून, खुनाची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. केशेगाव आणि फुलवाडी येथील खुनाच्या घटना ताज्या असतानाच आता जळकोट येथे एका वृद्ध महिलेचा निर्घृण खून झाल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील अंबिकानगर भागात सुभद्राबाई राम पाटील (वय ७०) या वृद्ध महिला वास्तव्यास होत्या. सुभद्राबाई यांच्या अंगावर अंदाजे १५ तोळे सोने होते. तसेच, त्यांच्या शेतात पवनचक्की उभारणीचे काम सुरू असल्याने त्यांना त्याचे ६ लाख रुपये मिळाले होते. हीच संपत्ती त्यांच्या जीवावर बेतली असल्याचे बोलले जात आहे.

सुभद्राबाई यांचा तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण खून करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात हा खून चोरीच्या उद्देशाने किंवा संपत्तीच्या वादातून झाल्याचा संशय बळावला असून, पोलिसांनी मयत महिलेच्या नातवाला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी सांगीतले की, जरी नातवाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असले तरी आरोपी म्हणून तो अद्याप निष्पन्न झालेला नाही, चौकशी सुरू आहे.

नळदुर्ग हद्दीत सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

  • गेल्या काही दिवसांत नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. केशेगाव आणि फुलवाडी पाठोपाठ आता जळकोटमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला असून, आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
Previous Post

धाराशिव: वाघोलीत क्रूर कृत्य! लैंगिकतेवरून चिडवल्याच्या रागातून मजुराचा लोखंडी पाईपने ठेचून खून; दोघे गंभीर जखमी

Next Post

धाराशिव पालिकेत युतीचा फज्जा; भाजपने शिंदे गटाच्या पाठीत खंजीर खुपसला! सर्व ४१ जागांवर ठोकले उमेदवार

Next Post
 धाराशिवच्या विकासाचा ‘गियर’ अडकला; पालकमंत्री आणि आमदारांमध्ये ‘लेटर-वॉर’

धाराशिव पालिकेत युतीचा फज्जा; भाजपने शिंदे गटाच्या पाठीत खंजीर खुपसला! सर्व ४१ जागांवर ठोकले उमेदवार

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group