• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, June 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘पार्टीला का येत नाही?’ म्हणत तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; मुरुममधील घटना

admin by admin
December 3, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
1.2k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

मुरुम: शेतातील पार्टीला का येत नाही, या क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी व लोखंडी काटा तसेच काठीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना मुरुम (ता. उमरगा) नजीक सुंदरवाडी शिवारात घडली आहे. या प्रकरणी एकावर मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युसुफ मकबुल ढोबळे (वय ४५, रा. जैन मंदिराच्या मागे, मुरुम) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. मुरुम येथील सुंदरवाडी शिवारात गट नं ३९ (१)(२) मध्ये शाहीन झाकीर हुसेन बागवान यांनी बटईने (हिश्श्याने) केलेल्या शेतात दि. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली.

आरोपी मोहम्मदीया झाकीर बागवान (रा. अशोक चौक, मुरुम) याने युसुफ ढोबळे यांना “तू पार्टीला का येत नाही?” असे म्हणून वाद घातला. त्यानंतर शिवीगाळ करत त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने लोखंडी काटा आणि काठीने मारहाण करत ढोबळे यांना गंभीर जखमी केले. तसेच यावेळी त्यांना जीवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आली.

या प्रकरणी जखमी युसुफ ढोबळे यांनी २ डिसेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून मुरुम पोलीस ठाण्यात आरोपी मोहम्मदीया बागवान याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ३५२, ३५१(२) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास मुरुम पोलीस करत आहेत.

Previous Post

येडशीत हॉटेल चालकाला दगडाने बेदम मारहाण; एकाच कुटुंबातील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

खामसवाडीत रस्त्याच्या कारणावरून ५५ वर्षीय व्यक्तीला काठीने मारहाण; शिराढोण पोलिसांत गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

खामसवाडीत रस्त्याच्या कारणावरून ५५ वर्षीय व्यक्तीला काठीने मारहाण; शिराढोण पोलिसांत गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

गतिमान नव्हे हे तर गतिमंद सरकार – आ.कैलास पाटील

ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयावर आमदार कैलास पाटील यांची प्रतिक्रिया; “हा निर्णय दुर्देवी”

June 21, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

संपादकीय : ओमराजेंचा निर्णय : सत्तेच्या वाटेवर विकास की विचारसरणीचा त्याग?

June 21, 2026
‘या’ २ जंगी अटींवर खासदार ओमराजे निंबाळकर यांचा शिंदे गटात प्रवेश निश्चित

‘या’ २ जंगी अटींवर खासदार ओमराजे निंबाळकर यांचा शिंदे गटात प्रवेश निश्चित

June 21, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

मजुरीचे पैसे मागितल्याने मजुराला फर्शीने हाणले! लोहारामधील धाब्यावरील धक्कादायक प्रकार; जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल

June 21, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली! हातोड्याने कुलूप तोडून ६७ वर्षीय वृद्धाचे घर हडपले; सुर्यवंशी अन् घोरपडे कुटुंबाविरुद्ध गुन्हा दाखल

June 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group