• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

 धाराशिव पालिकेचे निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख राज्य निवडणूक आयोगाच्या ‘रडार’वर!

जिल्हाधिकाऱ्यांना दिले तातडीच्या चौकशीचे आदेश

admin by admin
December 6, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव ब्रेकिंग: नगरपरिषदेच्या ३ प्रभागांतील निवडणूक स्थगित; आयोगाच्या निर्णयाने मोठा गोंधळ, नगराध्यक्षपदाचा निकालही लांबणीवर?
0
SHARES
1.5k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव –  धाराशिव नगर परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मदत करण्यासाठी आणि बोगस ‘एक्झिट पोल’ प्रकरणाकडे डोळेझाक केल्याचा ठपका ठेवत, निवडणूक निर्णय अधिकारी (RO) ओंकार देशमुख यांच्यावर कारवाईची टांगती तलवार लटकली आहे. युवासेना (उबाठा) तालुकाप्रमुख राकेश सूर्यवंशी यांनी केलेल्या तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाने (SEC) गंभीर दखल घेतली असून, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांना या प्रकरणी तातडीने चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे कडक आदेश दिले आहेत.

नेमके प्रकरण काय?

धाराशिव नगर परिषदेसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान पार पडले. मात्र, मतदानाच्या एक दिवस आधी, म्हणजेच १ डिसेंबर रोजी सोशल मीडियावर (Dharashiv 2.0 या पेजवरून) एका बोगस टीव्ही चॅनेलचा वापर करून एक ‘एक्झिट पोल’ व्हायरल करण्यात आला. यामध्ये भाजपच्या उमेदवार नेहा काकडे या विजयी होत असल्याचे, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या परवीन खलिफा कुरेशी दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे भासवण्यात आले. आदर्श आचारसंहितेचा भंग करणारा हा प्रकार मतदारांची दिशाभूल करण्यासाठीच केला गेल्याचे उघड होते.

अधिकाऱ्यांचे सत्ताधाऱ्यांशी ‘साटेलोटे’?

या गंभीर प्रकाराबाबत युवासेनेचे राकेश सूर्यवंशी यांनी १ डिसेंबर रोजीच जिल्हाधिकारी आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र, निवडणूक निर्णय अधिकारी ओंकार देशमुख यांनी यावर कोणतीही कारवाई केली नाही. सत्ताधारी भाजपला फायदा व्हावा यासाठी देशमुख यांनी जाणीवपूर्वक कर्तव्यात कसूर केली आणि सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम केले, असा खळबळजनक आरोप सूर्यवंशी यांनी केला आहे. चार-पाच दिवस उलटूनही गुन्हा दाखल न झाल्याने, अधिकारी आणि सत्ताधारी यांचे ‘साटेलोटे’ असल्याची चर्चा शहरात सुरू झाली होती.

आयोगाचा ‘अॅक्शन मोड’

स्थानिक पातळीवर न्याय मिळत नसल्याचे पाहून सूर्यवंशी यांनी थेट राज्य निवडणूक आयोगाकडे धाव घेतली.  आयोगाच्या आचारसंहिता कक्षाने या तक्रारीची तात्काळ दखल घेतली आहे. आयोगाने ५ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी, धाराशिव यांना पाठवलेल्या ई-मेलद्वारे स्पष्ट निर्देश दिले आहेत की, राकेश सूर्यवंशी यांच्या तक्रार अर्जातील मुद्द्यांच्या अनुषंगाने ‘वस्तुस्थितीची चौकशी करून आपला स्वयंस्पष्ट सविस्तर अहवाल आयोगास तात्काळ सादर करावा.’

निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक पार पाडण्याची जबाबदारी असताना, खुद्द निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावरच पक्षपाताचा आरोप झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. आता जिल्हाधिकारी आपल्या अहवालात ओंकार देशमुख यांना पाठीशी घालतात की दोषी ठरवतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Previous Post

वर्षात फक्त ‘स्थगिती’ दिसली, ‘प्रगती’ नाही! : तानाजी जाधवर यांचा भाजपवर पलटवार

Next Post

‘धाराशिव २.०’ बोगस एक्झिट पोल प्रकरण: जिल्हा माहिती अधिकाऱ्यांचा ‘हात वर’!

Next Post
‘धाराशिव २.०’ बोगस एक्झिट पोल प्रकरण: जिल्हा माहिती अधिकाऱ्यांचा ‘हात वर’!

‘धाराशिव २.०’ बोगस एक्झिट पोल प्रकरण: जिल्हा माहिती अधिकाऱ्यांचा ‘हात वर’!

ताज्या बातम्या

तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव–बीड–छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाला गती; सर्वेक्षणास मंजुरी, डीपीआरचे काम सुरू

July 23, 2026
काक्रंबा पाटीजवळ भीषण अपघात : टेम्पो पुलाच्या कठड्याला धडकला; चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, सात जण जखमी

धाराशिवजवळ किया सोनेट कारचा भीषण अपघात! डिव्हायडरला धडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, एक जखमी

July 22, 2026
नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च; आमदार कैलास पाटील यांचा सहभाग

नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च; आमदार कैलास पाटील यांचा सहभाग

July 22, 2026
राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ धाराशिवात काँग्रेसचे आंदोलन

राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ धाराशिवात काँग्रेसचे आंदोलन

July 22, 2026
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

परंडा तालुक्यात तोतया अन्न भेसळ अधिकाऱ्यांचा कारनामा!

July 22, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!