• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, September 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

 धाराशिव नगर परिषद निवडणुकीत शिंदे गटाला ‘भोपळा’; जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे यांची पहिली प्रतिक्रिया

admin by admin
December 22, 2025
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
 धाराशिव नगर परिषद निवडणुकीत शिंदे गटाला ‘भोपळा’; जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे यांची पहिली प्रतिक्रिया
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: रविवारी जाहीर झालेल्या धाराशिव नगर परिषद निवडणुकीच्या निकालात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला  मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत शिंदे गटाला खातेही उघडता आले नाही, पक्षाच्या पदरी केवळ ‘भोपळा’ पडला आहे.

२० उमेदवारांचा पराभव

या निवडणुकीसाठी शिवसेनेने (शिंदे गट) जोरदार तयारी केली होती. पक्षाचे १६ अधिकृत उमेदवार आणि ४ पुरस्कृत उमेदवार असे एकूण २० उमेदवार रिंगणात होते. मात्र, या सर्वच्या सर्व उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

विशेष म्हणजे, शिंदे गटाचे शहरातील प्रमुख नेते सुधीर पाटील यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका प्रेमाताई पाटील यांचाही या निवडणुकीत पराभव झाला आहे. हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

जिल्हाप्रमुखांची प्रतिक्रिया

या निकालानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पराभव होऊनही त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.

सुरज साळुंखे म्हणाले, “धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत विजय झालेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन. आमच्या १६ अधिकृत आणि ४ पुरस्कृत उमेदवारांना शहरातील ८००० मतदारांनी मतदानरुपी जो विश्वास दाखवला, त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. तसेच या निवडणुकीत कष्ट घेतलेले सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांचेही आभार.”

निकाल काहीही लागला तरी धाराशिव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना सदैव कटिबद्ध असेल, असेही साळुंखे यांनी स्पष्ट केले आहे.

 

Previous Post

धाराशिव पालिकेत भाजपची सत्ता येताच ११७ कोटींच्या रस्त्यांवरील स्थगिती उठली

Next Post

परंडा: शेतात जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या तरुणीवर अत्याचार; नराधमावर गुन्हा दाखल

Next Post
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

परंडा: शेतात जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या तरुणीवर अत्याचार; नराधमावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

नळदुर्ग : अश्विनी पोळ प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

September 4, 2026
विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?

विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?

September 4, 2026
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

‘व्हिजन २०३०’ ला काळी फीत! शिक्षक दिनीच गुरुजींचा एल्गार, ‘प्रमोशन घोटाळा’ आणि शाळा एकत्रीकरणाविरुद्ध साखळी उपोषण!

September 4, 2026
नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू

September 4, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी चोरीच्या घटना; रोख रकमेसह मोबाईल, दुचाकी व किराणा माल लंपास

September 3, 2026

Recent Posts

  • नळदुर्ग : अश्विनी पोळ प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
  • विद्यानंद बापट प्रकरण : डीजेच्या आवाजापासून कॅमेऱ्यासमोर झालेल्या हल्ल्यापर्यंत नेमकं काय घडलं?
  • ‘व्हिजन २०३०’ ला काळी फीत! शिक्षक दिनीच गुरुजींचा एल्गार, ‘प्रमोशन घोटाळा’ आणि शाळा एकत्रीकरणाविरुद्ध साखळी उपोषण!
  • नळदुर्ग किल्ल्यावर तीन मुलांसह महिलेची उडी; आई, मुलगा आणि एका मुलीचा मृत्यू
  • धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी चोरीच्या घटना; रोख रकमेसह मोबाईल, दुचाकी व किराणा माल लंपास
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!