• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, October 31, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

मैलारपूरच्या श्री खंडोबाची २५ जानेवारी रोजी महायात्रा

admin by admin
January 13, 2024
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
मैलारपूरच्या श्री खंडोबाची २५ जानेवारी रोजी महायात्रा
0
SHARES
812
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग – महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मैलारपूर (नळदुर्ग ) येथील श्री खंडोबाच्या वार्षिक यात्रा महोत्सवास २४ जानेवारी ( बुधवार ) रोजी प्रारंभ होत आहे. या यात्रोत्सवादरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात्रेची जय्यत पूर्वतयारी सुरू आहे. या महायात्रेस किमान पाच लाख भाविक हजेरी लावतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार असून महाराष्ट्रात श्री खंडोबाची एकूण आठ प्रमुख तीर्थक्षेत्र आहेत. त्यातील मैलारपूर ( नळदुर्ग ) हे दुसरे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे.नळ राजाची पत्नी दमयंती हिच्या भक्तीमुळे श्री खंडोबा नळदुर्गात प्रकट झाले तसेच दमयंती राणीच्या भक्तीमुळे श्री खंडोबाने बाणाईस चंदनपूराहून नळदुर्गात आणून विवाह केला व नंतर जेजुरीकडे प्रस्थान केले अशी आख्यायिका आहे.

श्री खंडोबाची अणदूर आणि नळदुर्ग मध्ये दोन वेगवेगळी मंदिरे असून मूर्ती मात्र एकच आहे.अणदूर मध्ये सव्वा दहा महिने व नळदुर्ग मध्ये पावणेदोन महिने श्री खंडोबाची मूर्ती ठेवण्याची परंपरा हजारो वर्षांपासून सुरू आहे.अणदूरहून नळदुर्गला आणि नळदुर्गहून अणदूरला मूर्ती नेताना दोन्ही गावातील मानकऱ्यात देवाचा करार केला जातो,. देवाचा करार करण्याची प्रथा महाराष्ट्रात फक्त याठिकाणी चालते, हे विशेष.

मूर्ती अणदूर येथून नळदुर्गला आणल्यानंतर यात्रोत्सव सुरू असतो.दर रविवारी भाविक भक्त देवाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी करतात. त्यास खेटे असे संबोधले जाते. पौष पौर्णिमा महायात्रा संपल्यानंतर अष्टमी करून नवमीला मूर्ती अणदूरला नेण्यात येते.

२५ जानेवारी यात्रेचा मुख्य दिवस

नळदुर्गची महायात्रा पौष पौर्णिमेला भरते. महायात्रा २४ जानेवारी रोजी सुरु होणार असून, २५ जानेवारी यात्रेचा मुख्य दिवस आहे. .गुरुवारी ( दि.२५ ) पहाटे ४ वाजता काकडा आरती झाल्यानंतर श्री खंडोबाच्या मूर्तीवर अभिषेक करुन अभ्यंगस्नान घालण्यात येणार आहे.त्यांनतर महावस्त्र अलंकार पूजा करून महानैवेद्य दाखवण्यात येणार आहे.

दिवसभर भंडारा व खोबरे उधळणे , विविध गावाहून आलेल्या नंदीध्वजाची मिरवणूक ,लहान मुलांचे जावळ काढणे, तळी भांडार उचलणे आदी धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. रात्री १२ वाजता अणदूर आणि नळदुर्गच्या मानाच्या काठ्याचे व अणदूरहुन आलेल्या घोड्यांचे आगमन होणार आहे. याचवेळी रंगीबेरंगी शोभेच्या दारूची आतषबाजी करण्यात येणार आहे. मध्यरात्री २ वाजता मंदिरात अणदूर व नळदुर्गच्या मानकऱ्यांचा सत्कार करण्यात आल्यानंतर पहाटे ३ वाजता श्री ची छबिना मिरवणूक निघणार आहे. शुक्रवारी ( दि. २६ ) दुपारी २ ते सायंकाळी ७ वाजता जंगी कुस्ती स्पर्धा होऊन यात्रेची सांगता होणार आहे.

यात्रेची जय्यत तयारी सुरू

यात्रेनिमित्त श्री खंडोबा मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून, भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे यासाठी दर्शन बारी तयार करण्यात आली आहे. यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच मंदिरात परिसरात बोअर घेण्यात आले असून, तीन टाकीमध्ये २४ तास पाणी राहणार आहे, तसेच यात्रा शांततेत आणि सुरळीत पार पडण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

 

Previous Post

धाराशिवजवळ दोन ठिकाणी अपघात, दोन ठार

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी चोरीची घटना

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

धाराशिव जिल्ह्यात चार ठिकाणी चोरीची घटना

ताज्या बातम्या

धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल

धाराशिव: शासकीय तंत्रनिकेतन मागे हाय-टेक मटका अड्ड्यावर धाड

October 31, 2025
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच; मोबाईल, ॲक्टिव्हा, मोटारसायकलसह गोदामातील शेतमालही लंपास

October 30, 2025
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

मारहाण आणि शिवीगाळीच्या त्रासाला कंटाळून गोजवाड्यातील व्यक्तीची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

October 30, 2025
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

पत्नीसह चौघांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

October 30, 2025
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

एसटीची ‘सफाई’ मोहीम: कर्तव्यावर ‘टल्ली’ आढळलेल्या ७ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कुऱ्हाड; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा ‘नो मर्सी’ इशारा!

October 30, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group