धाराशिव : आरोपी नामे- भगवान रामलिंग बारबोले, वय 61 वर्षे, रा. शेलगाव मा., ता. बार्शी, जि. धाराशिव (मयत) हे दि.08.01.2024 रोजी 16.00 वा. सु. त्यांचे ताब्यातील ट्रक क्र एमएच 13 आर 3116 मधील हरभरा लातुर येथे खाली करुन बार्शी कडे येत होते. दरम्यान येडशी घाट उतरत असताना त्यांचा ट्रक हायगई व निष्काळजीपणे चालवून ट्रक वरील ताबा सुटल्याने ट्रक घाटातील डोंगर कट्ट्याला जावून धडकल्याने भगवान बारबोले हे स्वत: गंभीर जखमी होवून स्वत:चे मरणास कारणीभुत झाले. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा नामे-प्रकाश भगवान बारबोले, वय 33 वर्षे, रा. शेलगाव मा., ता. बार्शी जि. सोलापूर यांनी दि.12.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : मयत नामे- बब्रुवान मल्हारी सोनटक्के, रा. उपळा मा. ता. जि. धाराशिव हे दि. 21.12.2023 रोजी 18.00 ते 19.00 वा. सु. शिंगोली ते उपळा पायी चालत जात होते. दरम्यान शिंगोली स्मशानभुमी जवळ मोटरसायकल क्र एमएच 03 यु 4770 च्या चालकाने त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजीपणे चालवून बब्रुवान सोनटक्के यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात बब्रुवान सोनटक्के हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अजयकुमार बब्रुवान सोनटक्के, वय 53 वर्षे, रा. उपळा मा. ता. जि. धाराशिव ह.मु. आशादिप को ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी सर्वे नं.83 फ्लॅट नं. 102 पहिला मजला ज्ञानेश्वर पार्क दिघी पुणे यांनी दि.12.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 304(अ) सह 184, 134 (अ) (ब) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.