धाराशिव : वेळ आमावस्या दिवशी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी करूनही या सुचनकेकडे दुर्लक्ष केल्याने बेंबळी पोलीस स्टेशन हद्दीत बामणी आणि ताकविकी या दोन ठिकाणी चोरटयांनी डल्ला मारला.
बेंबळी : फिर्यादी नामे-गोवर्धन गणपती डोंगरे, वय 51 वर्षे, रा. बामणी ता. जि. धाराशिव हे वेळ आमावस्या असल्यामुळे सकाळी ते वत्यांची पत्नी असे घराला कुलूप लावून पत्नीचे वडीलांचे विठ्ठलवाडी शिवारातील शेतात गेले असता त्यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.11.01.2024 रोजी 11.30 ते 14.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन स्वंयपाक घरात ठेवलेल्या लोखंडी कपाटातील रोख रक्कम 1,80,000 ₹ सोयाबीन विक्री करुन आलेली व पत्नीचे मणी मंगळसुत्र, फुले, झुबे 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकुण 2,40,000 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- गोवर्धन डोंगरे यांनी दि.12.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे कलम 454,380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी : फिर्यादी नामे- संतोष विनायक जाधव, वय 42 वर्षे, रा. ताकविकी ता. जि. धाराशिव हे वेळ आमावस्या असल्यामुळे सकाळी ते व त्यांची पत्नी असे घराला कुलूप लावून ताकविकी शिवारातील शेतात गेले असता त्यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.11.01.2024 रोजी 10.30 ते 16.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील लोखंडी कपाटातील रोख रक्कम 34,000 ₹ व 28 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकुण 1,26,500 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- संतोष जाधव यांनी दि.12.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे कलम 454,380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मोटारसायकलची चोरी
तुळजापूर : फिर्यादी नामे-प्रकाश नंदकुमार जाधव, वय 33 वर्षे, रा. सळई मारुती मंदीरा जवळ 339/40 उत्तर कसबा सोलापूर ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर यांची अंदाजे 45,000 ₹ किंमतीची हिरो पॅशन प्रो कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 13 डी.ए. 6721 ही दि.07.01.2024 रोजी 16.15 ते 18.25 वा. सु.चाहा हॉटेलच्या बाजूला असलेल्या शिवराज पान शॉपच्या पाठीमागील बाजूस तुळजापूर येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- प्रकाश जाधव यांनी दि.12.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.