नळदुर्ग : फिर्यादी नामे-मंगल सुधील राठोड, वय 35 वर्षे, रा. पाटील तांडा, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे पती नामे- सुधीर शिवाजी राठोड, वय 42 वर्षे, रा. पाटील तांडा, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना अनोळखी चार इसमांनी लाल रंगाचे चारचाकी वाहणात जबरदस्तीने बसवून हिंगोली येथे घेवून जावून 4,00,000₹ (चार लाख रुपये) खंडणी मागून ती न दिल्यास तुझ्या पतीस जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मंगल राठोड यांनी दि.20.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 364(ए), 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
दोन ठिकाणी हाणामारी
बेंबळी :आरोपी नामे-1)सतिश रामहरी शिरगिरे, 2) संजय नरहरी शिरगिरे, 3) आरुण नरहरी शिरगिरे सर्व रा. टाकळी बेंबळी ता. जि. धाराशिव यांनी दि. 20.01.2024 रोजी 12.30 वा. सु. टाकळी बेंबळी येथे सार्वजनिक पाण्याचे टाकीजवळ फिर्यादी नामे-सुरेश बाबुराव कांबळे, वय 35 वर्षे, रा. टाकळी बेंबळी ता. जि. धाराशिव यांना मागील भांडणाचे कारणावरुन नमुद आरोपीने जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी विळ्याने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुरेश कांबळे यांनी दि. 20.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 34 भा.दं.वि.सं. सह अ.जा.ज.अ.प्र. कायदा कलम 3(1)(आर)(एस), 3(2)(व्हिए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी :आरोपी नामे-1) सुरेश बाबुराव कांबळे, 2) आबा बाबुराव कांबळे, 3) सचिन सुनिल साबणे सर्व रा. टाकळी बेंबळी ता. जि. धाराशिव यांनी दि. 20.01.2024 रोजी 12.30 वा. सु. टाकळी बेंबळी येथे सार्वजनिक पाण्याचे टाकीजवळ फिर्यादी नामे- सतीश नरहरी शिरगिरे, वय 30 वर्षे, रा. टाकळी बेंबळी ता. जि. धाराशिव यांना ट्रॅक्टर बाजूला घेण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सतीश शिरगिरे यांनी दि.20.01.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 34 भा.दं.वि.सं.) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.