• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, May 27, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

शेतकऱ्यांची जनावरे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई, १३ गुन्हे उघडकीस

admin by admin
February 24, 2026
in क्राईम
Reading Time: 2 mins read
शेतकऱ्यांची जनावरे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई, १३ गुन्हे उघडकीस
0
SHARES
1.4k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांची जनावरे (म्हशी) चोरणाऱ्या एका टोळीला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून ८ म्हशी आणि चोरीसाठी वापरलेली वाहने असा एकूण १२ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे म्हैस चोरीचे तब्बल १३ गुन्हे उघडकीस आले आहेत

गुन्ह्याची पार्श्वभूमी आणि तपास:

  • दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी लासोना शिवारातील एका शेतकऱ्याच्या ५ म्हशी चोरीला गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

  • धाराशिव जिल्ह्यात जनावरे चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याने, पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी हे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.

  • तपासादरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक कासार आणि त्यांच्या पथकाला एका गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, बीड जिल्ह्यातील नेकनूर येथील एक संशयित व्यक्ती आणि त्याचे वाहन चोरीच्या परिसरात आले होते.

  • या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ चंद्रकांत जगन्नाथ नन्नवरे (रा. नन्नवरे वस्ती, नेकनूर, ता. जि. बीड) याला नेकनूर येथून ताब्यात घेतले.

  • त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीतून मिळालेल्या माहितीवरून त्याचा दुसरा साथीदार शंकर सुरेश चव्हाण (रा. ढोकी) यालाही अटक करण्यात आली आहे.

आरोपींची कबुली आणि जप्त मुद्देमाल:

  • या आरोपींनी आतापर्यंत येवती, लासोना, बेंबळी, कोंड, तुळजापूर, काटी सावरगाव, सांगवीमार्डी, सुरतगाव, वैराग आणि माणकेश्वर शिवार या ठिकाणांवरून म्हशी चोरल्याची कबुली दिली आहे.

  • धाराशिव जिल्ह्यातील एकूण १३ म्हशी चोरीचे गुन्हे केल्याचे आरोपींनी मान्य केले आहे.

  • पोलिसांनी आरोपींकडून ८ म्हशी, गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा पिकअप आणि हिरो स्प्लेंडर दुचाकी असा एकूण १२,१५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपींचे इतर साथीदार आणि चोरीला गेलेल्या आणखी काही म्हशींचा पोलीस कसून शोध घेत आहेत. पुढील कायदेशीर कारवाईसाठी ताब्यात घेतलेले आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी धाराशिवच्या पोलीस अधीक्षक  श्रीमती रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार आणि त्यांच्या पथकातील अंमलदार (शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, रत्नदिप डोंगरे, नागनाथ गुरव) यांनी ही कारवाई यशस्वी केली.

Previous Post

मोहा शिवारातून ७५ हजार रुपये किमतीच्या तीन मुऱ्हा म्हशींची चोरी; कळंब पोलिसांत गुन्हा दाखल

Next Post

गुंजोटीत विश्वासाचा गैरफायदा: गोदामाची चावी मागून २ लाख ७० हजारांच्या सोयाबीनची चोरी

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

गुंजोटीत विश्वासाचा गैरफायदा: गोदामाची चावी मागून २ लाख ७० हजारांच्या सोयाबीनची चोरी

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

धाराशिव जिल्हा परिषदेत प्रशासकीय भूकंप! कलाकार मानधन योजनेत गंभीर गैरव्यवहार; कनिष्ठ सहाय्यक निलंबित

May 27, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

परंड्यात पोलिसांची मोठी कारवाई! कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या ४ गायींची सुटका; तिघांवर गुन्हा दाखल

May 27, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तेरमध्ये शेतीच्या वादातून सख्ख्या भावावर कुऱ्हाड आणि फायटरने जीवघेणा हल्ला; ४ जणांवर गुन्हा दाखल

May 27, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

परंड्यात जागेच्या वादातून डॉक्टरचा राडा! पिता-पुत्रांवर ब्लेड अन् दगडाने जीवघेणा हल्ला; पोलिसांत गुन्हा दाखल

May 27, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

भूममध्ये खळबळ! गांजाच्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना का दिली? तरुणाला मारहाण करत २५ लाखांची खंडणी मागितली

May 27, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group