• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेला गती; मुंबईच्या पथकाकडून प्रस्तावित जागेची पाहणी

admin by admin
July 23, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेला गती; मुंबईच्या पथकाकडून प्रस्तावित जागेची पाहणी
0
SHARES
128
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय सुरू करण्याच्या प्रक्रियेला महत्त्वाची गती मिळाली असून, केंद्रीय विद्यालय विभागीय कार्यालय, मुंबईच्या पथकाने गुरुवारी धाराशिव येथे प्रस्तावित जागेची तसेच उपलब्ध पायाभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. खासदार ओमप्रकाश (ओमराजे) राजेनिंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही प्रक्रिया पुढे सरकल्याचे सांगण्यात आले.

पाहणी पथकात केंद्रीय विद्यालयाचे सहाय्यक आयुक्त ए. सी. पाटील, केंद्रीय विद्यालय भांडुपचे प्राचार्य ए. सी. राजपूत आणि केंद्रीय विद्यालय सोलापूरचे प्राचार्य उमाकांत जोशी यांचा समावेश होता. त्यांनी केंद्रीय विद्यालयासाठी प्रस्तावित जागा आणि आवश्यक पायाभूत सुविधांची माहिती घेतली.

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी चालू लोकसभा अधिवेशनात ९ जुलै २०२६ रोजी प्रश्न क्रमांक १०२६८४ द्वारे धाराशिव येथे केंद्रीय विद्यालय सुरू करण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. या प्रश्नावर केंद्र सरकारकडून २७ जुलै २०२६ रोजी लोकसभेत उत्तर दिले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्तरावरील उपलब्ध जागा आणि सुविधांचा आढावा घेण्यासाठी हे पथक धाराशिवमध्ये दाखल झाले.

खासदार निंबाळकर यांनी केंद्रीय विद्यालय मंजुरीसाठी केंद्र सरकार आणि संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला असून, लोकसभेत प्रश्न उपस्थित करण्याबरोबरच अधिकाऱ्यांसोबत पत्रव्यवहार आणि बैठका घेऊन हा विषय पुढे नेला आहे. त्याचाच भाग म्हणून प्रत्यक्ष पाहणीची प्रक्रिया सुरू झाल्याचे मानले जात आहे.

यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय विद्यालयाच्या अधिकाऱ्यांचे स्वागत केले. तसेच धाराशिव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून केंद्रीय विद्यालयाला तातडीने मंजुरी देऊन पुढील कार्यवाही वेगाने पूर्ण करावी, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली.

या प्रसंगी सोमनाथ गुरव, अमित उंबरे, सह्याद्री राजेनिंबाळकर, गणेश जगताप, आकाश कोकाटे, अमित लाटे, आकाश कावळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालय सुरू झाल्यास जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार केंद्रीय शिक्षणाची संधी उपलब्ध होणार असून, या दिशेने उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

Previous Post

जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

Next Post

पश्चिम महाराष्ट्रातील ५० टीएमसी पूरपाणी मराठवाड्यात वळविण्याच्या प्रकल्पाला गती

Next Post
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

पश्चिम महाराष्ट्रातील ५० टीएमसी पूरपाणी मराठवाड्यात वळविण्याच्या प्रकल्पाला गती

ताज्या बातम्या

“खायला भरपूर जागा आहे!” जिल्हा परिषदेत ‘मल्टी-कुझिन’ बुफे; पण शाळकरी पोरांच्या नशिबी मात्र गळकी छत!

“खायला भरपूर जागा आहे!” जिल्हा परिषदेत ‘मल्टी-कुझिन’ बुफे; पण शाळकरी पोरांच्या नशिबी मात्र गळकी छत!

July 23, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

पश्चिम महाराष्ट्रातील ५० टीएमसी पूरपाणी मराठवाड्यात वळविण्याच्या प्रकल्पाला गती

July 23, 2026
धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेला गती; मुंबईच्या पथकाकडून प्रस्तावित जागेची पाहणी

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेला गती; मुंबईच्या पथकाकडून प्रस्तावित जागेची पाहणी

July 23, 2026
जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

July 23, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; मोटारसायकल, वीजतारा आणि डिझेल लंपास

July 23, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!