• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, April 24, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे; सरकारच्या कर्ज मर्यादेवर आमदार कैलास पाटील यांचा इशारा

admin by admin
March 10, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
धाराशिव शहरातील रस्ते निविदा प्रक्रियेची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करा
0
SHARES
155
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव  : राज्य सरकारच्या वाढत्या कर्जामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था धोक्याच्या उंबरठ्यावर पोहोचल्याचा इशारा देत आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत सरकारला आरसा दाखवला. राज्याला अर्थव्यवस्थेच्या २५ टक्क्यांपर्यंत कर्ज घेण्याची मर्यादा असताना सरकारने घेतलेले कर्ज जवळपास २४ टक्क्यांपर्यंत पोहोचले असून राज्याची वाटचाल आर्थिक दिवाळखोरीकडे सुरू असल्याचे त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनातील चर्चेदरम्यान स्पष्ट केले.

आमदार पाटील म्हणाले की, सरकार आकडेवारी मांडून जनतेला खूश करण्याचा प्रयत्न करत असले तरी वास्तव वेगळे आहे. गेल्या तीन वर्षांपासून महसुली अंदाज आणि खर्चामध्ये ५० ते ६० हजार कोटींची तफावत दिसून येत आहे. खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी स्थिती कायम राहिली तर ती राज्यासाठी धोक्याची घंटा असल्याचे त्यांनी नमूद केले.

भांडवली खर्चाचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की, वाहतूक आणि दळणवळण क्षेत्रावर मोठी तरतूद केली जात असताना कृषी क्षेत्रासाठी अत्यल्प निधी देण्यात येत आहे. सध्या शेतीसाठी केवळ ५.२ टक्के तरतूद करण्यात आली असून तेलंगणात हीच तरतूद १० टक्के आहे. अशा परिस्थितीत ५०० अब्ज डॉलर्सचे उद्दिष्ट कसे साध्य होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

याशिवाय शिक्षण, आरोग्य, ऊर्जा आणि समाजकल्याण विभागातील निधी कमी करण्यात आल्याबद्दलही त्यांनी सरकारवर टीका केली.

  • शिक्षण क्षेत्र: 2025-26 मध्ये 15.4% तर 2026-27 मध्ये 14.4% इतकी तरतूद.
  • आरोग्य क्षेत्र: 44 हजार कोटींवरून 37 हजार कोटींवर घसरण.
  • ऊर्जा विभाग: 37,899 कोटींवरून 25,212 कोटींवर घट.
  • समाजकल्याण व पोषण: 81 हजार कोटींवरून 53 हजार कोटींवर कपात.

राज्यावर सध्या ९ लाख कोटींपेक्षा अधिक कर्ज असल्याचे सांगितले जात असले तरी महामंडळांच्या १ लाख ८७ हजार कोटींच्या थकहमीचा समावेश नाही, त्यामुळे प्रत्यक्षात राज्यावरचे एकूण कर्ज १२ लाख ८३ हजार कोटी रुपये इतके असल्याचा दावा आमदार पाटील यांनी केला.

पाच लाखांपर्यंत कर्जमाफीची मागणी

यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दाही उपस्थित केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दोन लाखांपर्यंत कर्जमाफी दिली होती, असे सांगत शेतकऱ्यांचे पाच लाखांपर्यंत कर्ज माफ करावे आणि नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

फक्त पिककर्ज माफ करण्याऐवजी दूध उत्पादक, जरबेरा व फुल उत्पादक अशा शेतीपूरक व्यवसायांनाही कर्जमाफीचा लाभ देण्याची आवश्यकता असल्याचेही आमदार कैलास पाटील यांनी अधोरेखित केले.

 

Previous Post

धाराशिवमध्ये बांधकाम कामगार योजनेंतर्गत साहित्य वाटपात मोठा घोटाळा

Next Post

तुळजापूरमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा! भ्रष्ट पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांची उचलबांगडी निश्चित?

Next Post
तुळजापूरमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा! भ्रष्ट पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांची उचलबांगडी निश्चित?

तुळजापूरमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा! भ्रष्ट पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांची उचलबांगडी निश्चित?

ताज्या बातम्या

भीमजयघोषाने दणाणली धाराशिव नगरी; अठरापगड जाती-धर्मांचा मिरवणुकीत सहभाग

भीमजयघोषाने दणाणली धाराशिव नगरी; अठरापगड जाती-धर्मांचा मिरवणुकीत सहभाग

April 24, 2026
४० वर्षांचा रस्ता अचानक जि.प.चा कसा झाला? अध्यक्षांच्या मनमानीला ठाकरे गटाचा दणका, समतानगरचा रस्ता पुन्हा मोकळा!

जि.प. प्रशासनाची दडपशाही उधळली; अंधारात बंद केलेला ४० वर्षांचा रस्ता ठाकरे गटाने ‘शिवसेना स्टाईल’ने केला मोकळा!

April 24, 2026
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

जागजी शिवारात राजमा पिकाच्या गंजीला आग; २ लाखांचे नुकसान, एकावर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल

April 24, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

कत्तलीसाठी चाललेली ४० गोवंशीय वासरे परंड्यात जप्त; ९ लाखांच्या मुद्देमालासह एकास अटक

April 24, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

जिल्ह्यात गुटखा तस्करांवर पोलिसांची धडक कारवाई; वाशी व ढोकीत तब्बल १३ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त

April 24, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group