• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, October 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

पोलिस असल्याची बतावणी करून वृद्धेची फसवणूक; तुळजापुरात ६० हजारांचे सोन्याचे गंठण लंपास

admin by admin
April 14, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
घेतलाय का ‘खाकी’चा इंगा? धाराशिव जिल्ह्यात ‘डुप्लिकेट’ पोलिसांचा सुळसुळाट; एका आठवड्यात तिघांना गंडा!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

तुळजापूर : ‘आम्ही पोलिस आहोत, शहरात सध्या चोऱ्या होत आहेत, त्यामुळे तुमचे दागिने पर्समध्ये ठेवा’ अशी बतावणी करून दोन भामट्यांनी एका ७२ वर्षीय वृद्धेचे तब्बल ६० हजार रुपये किमतीचे दोन तोळ्यांचे सोन्याचे ‘मिनी गंठण’ हातोहात लांबवल्याची धक्कादायक घटना तुळजापूर येथे घडली. रविवारी (ता. १२) दुपारी सव्वातीनच्या सुमारास सैनिक स्कूलजवळ हा प्रकार घडला.

याप्रकरणी उन्नती भामंडळ मेहता (वय ७२, रा. मंगरुळ, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी सोमवारी (ता. १३) तुळजापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उन्नती मेहता आणि त्यांचे पती हे रविवारी (ता. १२) दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास तुळजापूरवरून त्यांच्या गावी, मंगरुळकडे पायी जात होते. ते सैनिक स्कूलच्या पुढे रस्त्यावर आले असता, दोन अनोळखी इसमांनी त्यांना अडवले. आपण पोलिस असल्याचे भासवत त्यांनी या वृद्ध दाम्पत्याला विश्वासात घेतले. “तुळजापूर शहरात सध्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे तुम्ही गळ्यातील दागिने काढून सुरक्षितपणे पर्समध्ये ठेवा,” असा सल्ला या तोतया पोलिसांनी दिला.

सुरक्षेच्या कारणास्तव उन्नती मेहता यांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे सोन्याचे मिनी गंठण (अंदाजे किंमत ६० हजार रुपये) काढले. मात्र, ते पर्समध्ये ठेवण्याचा बहाना करून भामट्यांनी हातचलाखीने ते स्वतःजवळच ठेवले आणि तेथून पोबारा केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या दाम्पत्याने पोलिसांत धाव घेतली.

उन्नती मेहता यांनी दिलेल्या प्रथम खबरीवरून तुळजापूर पोलिस ठाण्यात दोन अनोळखी इसमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (भा.न्या.सं.) कलम ३१८(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भामट्यांचा शोध आता तुळजापूर पोलिस घेत आहेत. नागरिकांनी अशा तोतया पोलिसांपासून सावध राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Previous Post

धाराशिव: जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर चोराखळी येथील ‘महाकाली कला केंद्रा’ला टाळे

Next Post

धाराशिव : घरभाड्याच्या वादातून घरमालकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

धाराशिव : घरभाड्याच्या वादातून घरमालकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला

ताज्या बातम्या

धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

धाराशिव : ‘गॅस पाईपलाईन अपडेट’च्या नावाखाली ६६ वर्षीय ज्येष्ठ महिलेला पावणेआठ लाखांचा गंडा

October 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर नवीन बसस्थानक : बसमध्ये चढताना प्रवाशाचा खिसा कापणारी महिला रंगेहात पकडली

October 22, 2026
तुळजापूर नवरात्रोत्सव: भाविकांच्या सुरक्षेसाठी वाहतुकीत मोठे बदल; ‘हे’ प्रमुख मार्ग ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान बंद

तुळजापूर शारदीय नवरात्र महोत्सव २०२६: भाविकांच्या सुरक्षेसाठी २३ ते २६ ऑक्टोबर दरम्यान वाहतूक मार्गात मोठे बदल; पर्यायी मार्ग जाहीर

October 22, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

नितळी शिवार : विनाकारण शिवीगाळ करत हातावर गुडघा दाबून तरुणाचा हात मोडला

October 22, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

कसबे तडवळे : ‘गावात लय समाजसेवा करायला काय?’ म्हणत तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला

October 22, 2026

Recent Posts

  • धाराशिव : ‘गॅस पाईपलाईन अपडेट’च्या नावाखाली ६६ वर्षीय ज्येष्ठ महिलेला पावणेआठ लाखांचा गंडा
  • तुळजापूर नवीन बसस्थानक : बसमध्ये चढताना प्रवाशाचा खिसा कापणारी महिला रंगेहात पकडली
  • तुळजापूर शारदीय नवरात्र महोत्सव २०२६: भाविकांच्या सुरक्षेसाठी २३ ते २६ ऑक्टोबर दरम्यान वाहतूक मार्गात मोठे बदल; पर्यायी मार्ग जाहीर
  • नितळी शिवार : विनाकारण शिवीगाळ करत हातावर गुडघा दाबून तरुणाचा हात मोडला
  • कसबे तडवळे : ‘गावात लय समाजसेवा करायला काय?’ म्हणत तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!