• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 16, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

जिल्ह्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट; पवनचक्कीचे ३६ लाखांचे नुकसान, तर बसस्थानकातून प्रवाशाचे ४३ हजार लांबविले

admin by admin
April 23, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : जिल्ह्यात चोरी आणि नुकसानीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, नळदुर्ग, कळंब आणि वाशी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तीन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या आहेत. यात तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा शिवारात पवनचक्कीचे ट्रान्सफॉर्मर फोडून तब्बल ३६ लाखांचे नुकसान करण्यात आले आहे. तर कळंब बसस्थानकात प्रवाशाच्या खिशातील रोकड आणि वाशी तालुक्यात यात्रेतून दुचाकी पळविल्याचे प्रकार समोर आले आहेत. याप्रकरणी बुधवारी (ता. २२) संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पवनचक्कीचे तब्बल ३६ लाखांचे नुकसान

तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा शिवारात पवनचक्कीची (लोकेशन आर.एस.एल.) तोडफोड करून लाखो रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याचा व नुकसान केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दि. १३ एप्रिल रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी पवनचक्कीचे कॉपर वायर तोडून ट्रान्सफॉर्मरमधील २,६०० लिटर ऑईल खाली सोडून दिले (किंमत २ लाख ८० हजार ८०० रुपये). तसेच ट्रान्सफॉर्मर पूर्णपणे निकामी करून एकूण ३५ लाख रुपयांचे नुकसान केले. यासोबतच १ लाख रुपये किमतीचे कॉपर वायर व बस बार चोरून नेले. याप्रकरणी पांडुरंग माणिक गरड (वय ३५, रा. चिकुंद्रा, ता. तुळजापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३२४(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बसस्थानकात प्रवाशाचे ४३ हजार लांबविले

कळंब येथील बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत एका प्रवाशाच्या खिशातील ४३ हजार ५०० रुपयांची रोकड लांबविल्याची घटना मंगळवारी (ता. २१) सकाळी १०.३० ते ११.३० च्या सुमारास घडली. निलेश विष्णुदास मालपानी (वय ३६, रा. साईनगर, परळी रोड, कळंब) हे बसस्थानकावर ‘कळंब-धाराशिव’ बसमध्ये चढत असताना अज्ञात भामट्याने त्यांच्या पँटच्या खिशातून ही रोकड हातोहात लंपास केली. याबाबत निलेश मालपानी यांनी बुधवारी (ता. २२) दिलेल्या तक्रारीवरून कळंब पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात भा.न्या.सं. कलम ३०३(२) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पखरुड यात्रेतून दुचाकीची चोरी

वाशी तालुक्यातील पखरुड येथील यात्रेतून एका भाविकाची दुचाकी चोरीला गेली आहे. गोकुळ धोंडीबा कराळे (वय ५१, रा. चिंचपूर ढगे, ता. भूम) हे दि. ३ एप्रिल रोजी पखरुड यात्रेसाठी गेले होते. सकाळी ९ वाजेच्या सुमारास भैरवनाथ मंदिराजवळ त्यांनी त्यांची ‘हिरो स्प्लेंडर प्लस’ (एमएच २५ ए.सी. ०५०१) ही ३० हजार रुपये किमतीची दुचाकी लावली होती. अज्ञात चोरट्याने ती गर्दीचा फायदा घेत चोरून नेली. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गोकुळ कराळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous Post

वृद्धेची विहिरीत ढकलून निर्घृण हत्या; निपाणी शिवारातील घटना, दोघांवर गुन्हा दाखल

Next Post

कायदा हरला, लेकाचा ‘निकाल’ जिंकला! ८ वर्षांच्या पोराच्या एका वाक्याने आई-बापाचा ३ वर्षांचा ‘इगो’ एका सेकंदात ‘शून्य’

Next Post
कायदा हरला, लेकाचा ‘निकाल’ जिंकला! ८ वर्षांच्या पोराच्या एका वाक्याने आई-बापाचा ३ वर्षांचा ‘इगो’ एका सेकंदात ‘शून्य’

कायदा हरला, लेकाचा 'निकाल' जिंकला! ८ वर्षांच्या पोराच्या एका वाक्याने आई-बापाचा ३ वर्षांचा 'इगो' एका सेकंदात 'शून्य'

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास

September 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली

September 16, 2026

Recent Posts

  • दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास
  • जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल
  • धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद
  • तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!