• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, June 11, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

“फक्त सोनं चोरत जा रे…”; धाराशिव पोलिसांचा चोरांना मोलाचा सल्ला! ९ हजारांच्या चोरीत ३३०० चा ‘रिफंड’ आणि चोराला थेट ‘क्लीन चिट’

admin by admin
April 27, 2026
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
“फक्त सोनं चोरत जा रे…”; धाराशिव पोलिसांचा चोरांना मोलाचा सल्ला! ९ हजारांच्या चोरीत ३३०० चा ‘रिफंड’ आणि चोराला थेट ‘क्लीन चिट’
0
SHARES
3k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: तुम्ही लहानपणी ‘चोर-पोलीस’ हा खेळ नक्कीच खेळला असाल; पण धाराशिवमध्ये सध्या या खेळाचे एक भन्नाट आणि ‘अपडेटेड व्हर्जन’ पाहायला मिळत आहे. इथे पोलीस चोरांना पकडून तुरुंगात टाकत नाहीत, तर त्यांना ‘सुरक्षित चोरी कशी करावी’ याचे मोफत मार्गदर्शन (करिअर गाईडन्स) करत असल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

  • तारीख आणि वेळ: शनिवार, २५ एप्रिल, दुपारी १:२५ वाजता.

  • ठिकाण: धाराशिव बस स्थानक.

  • घटना: संतोष बाबुराव टेकाळे (वय ४५) हे कोल्हेगावला जाण्यासाठी लातूरकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत होते. गर्दीचा फायदा घेत एका भामट्याने त्यांच्या खिशातून चक्क ९ हजार रुपये हातोहात लांबवले. चोरी झाल्याचे लक्षात येताच टेकाळे तातडीने खाली उतरले, पण तोपर्यंत चोरट्याने धूम ठोकली होती आणि नेहमीप्रमाणे बस स्थानकावर सुरक्षेसाठी एकही पोलीस हजर नव्हता.

स्वतःच पुरावे गोळा करण्याची वेळ:

पोलिसांचा पत्ता नसल्याने संतापलेल्या संतोष टेकाळे यांनी थेट आनंदनगर पोलीस स्टेशन गाठले. पण इथे त्यांना ‘सिंघम’ नाही, तर वेगळेच पोलीस भेटले. पोलिसांनी सांत्वन करण्याऐवजी थेट “पुरावा काय?” असा उलटा सवाल केला. शेवटी एका सामान्य प्रवाशालाच तपास अधिकारी बनावे लागले. टेकाळे यांनी पुन्हा बस स्थानक गाठले, एसटी अधिकाऱ्यांच्या अक्षरशः हाता-पाया पडून मनधरणी केली आणि चोरीचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले.

चोराला ‘व्हीआयपी’ वागणूक आणि पैशांचा ‘रिफंड’:

पुरावा हातात आल्यावर टेकाळे पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये गेले. फुटेज पाहिल्यावर पोलिसांनी चोराला पकडण्यासाठी पथके वगैरे पाठवली नाहीत, तर खिशातून मोबाईल काढला आणि थेट चोरालाच कॉल लावला! (जणू काही तो त्यांचा रोजचाच ‘क्लायंट’ असावा).

थोड्याच वेळात चोर महाशय पोलीस स्टेशनमध्ये हजर झाले. ९ हजार रुपये चोरणाऱ्या या चोराने टेकाळे यांना फक्त ३,३०० रुपये परत केले. उरलेले ५,७०० रुपये कुठे गेले? हा ‘सर्व्हिस चार्ज’ होता की ‘जीएसटी’? हे पोलिसांनाच ठाऊक! यावर कहर म्हणजे, पोलिसांनी कोणतीही फिर्याद न घेता, गुन्हा दाखल न करता त्या चोराला तिथून सन्मानाने सोडून दिले.

“तुझे कितनी बार बोला, सिर्फ सोना चोर…”

या संपूर्ण नाट्यातील सर्वात धक्कादायक भाग म्हणजे पोलिसांचा तो ‘डायलॉग’. चोराला सोडताना साहेब त्याला म्हणाले, “तुझे कितने बार बोला, चोरी जरा देख कर कर.. सिर्फ सोना चोर..” (तुला किती वेळा सांगितलंय, जरा बघून चोरी करत जा.. फक्त सोनं चोरत जा).

हा सर्व प्रकार संतोष टेकाळे आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होते. हे पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी दादागिरी करत तो व्हिडिओही डिलीट करायला लावला.

रात्री वाट्याला येतोय चोरीचा माल?

फिर्याद नाही, गुन्हा नाही आणि पुराव्यांसकट चोर सापडूनही त्याला सोडून देणे… या सर्व प्रकारावरून एकच गोष्ट स्पष्ट होते की, धाराशिवमध्ये ‘चोर आणि पोलीस’ यांची घट्ट साठगाठ आहे. दिवसा चोऱ्या करायच्या आणि रात्री मिळून चोरीचा माल वाटून घ्यायचा, अशीच काहीशी नवी ‘सिस्टीम’ आनंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असल्याचा संशय आता उघडपणे व्यक्त केला जात आहे. सामान्य जनतेने दाद तरी कोणाकडे मागायची, हाच खरा प्रश्न आहे!

Previous Post

विमा कंपनीची नफेखोरी आणि शासनाची बघ्याची भूमिका! धाराशिवचे शेतकरी वाऱ्यावर

Next Post

आनंदनगर पोलिसांचा आणखी एक प्रताप: “चोर पकडला तरी दागिने परत मिळतीलच याची गॅरंटी नाही”; आनंदनगर पोलिसांच्या उत्तराने फिर्यादीला धक्का!

Next Post
आनंदनगर पोलिसांचा आणखी एक प्रताप: “चोर पकडला तरी दागिने परत मिळतीलच याची गॅरंटी नाही”; आनंदनगर पोलिसांच्या उत्तराने फिर्यादीला धक्का!

आनंदनगर पोलिसांचा आणखी एक प्रताप: "चोर पकडला तरी दागिने परत मिळतीलच याची गॅरंटी नाही"; आनंदनगर पोलिसांच्या उत्तराने फिर्यादीला धक्का!

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

परंड्यात एअर पिस्टल बाळगणाऱ्या चौघांवर गुन्हा; जिल्हाधिकाऱ्यांच्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन

June 11, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र! केबल, दुचाकीसह ३ लाखांची ॲल्युमिनियम तार लंपास; चार पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

June 11, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर तालुक्यात ज्येष्ठ दाम्पत्याला लोखंडी रॉड अन् सिमेंटच्या गट्टूने बेदम मारहाण; ६ जणांवर अट्रॉसिटीसह गुन्हा दाखल

June 11, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

‘माझा संसार का मोडलास?’ म्हणत जावयाचा सासूवर जीवघेणा हल्ला; लोहारा तालुक्यातील मुर्शदपूर येथील घटना

June 11, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

वाशीत हद्दीखुना पाडताना निवासी नायब तहसीलदारांना मारली आडकाठी; ८ जणांवर गुन्हा दाखल

June 11, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group