धाराशिव : फिर्यादी नामे- संतोष शिवाजी भोसले, वय 46 वर्षे, रा. सरकोली, ता. पंढरपुर, जि. सोलापूर हे दि. 04.02.2024 रोजी 05.00 वा. सु. पंढरपुर ते काळेबोरगाव येथे अंत्यविधी करीता जात होते. दरम्यान कवालदरा येथे आले असता संतोष भोसले यांचे गाडीसमोर अचानकपणे दगड टाकल्याचा मोठा आवाज आल्याने ड्रायव्हर याने गाडी साईडला थांबवून खाली उतरुन गाडीचे काय नुकसान झाले आहे काय हे बघण्याकरीता तो खाली वाकून पाहत असताना अनोळखी एका इसमाने ड्रायव्हर भगीरथ भारत विभुते यांना काठीने मारहाण करुन जखमी करुन इतर तीन अनोळखी इसमांनी संतोष भोसले व त्यांची पत्नी यांना गाडीतुन खाली उतरवून मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी देवून त्यांचे जवळील 37 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, टायटन घड्याळ, रोख रक्कम 12,500₹ असा एकुण 2,09,550 ₹ किंमतीचा माल जबरीने लुटून पसार झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- संतोष भोसले यांनी दि.06.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 392, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे- दिगंबर बळीराम जाधव, वय 54 वर्षे, रा. धाराशिव, ता. जि. धाराशिव यांची अंदाजे97,000₹ किंमतीची लाल रंगाची टीव्हीएस रेडीऑन मोटरसायकल ही दि. 04.02.2024 रोजी 10.30 वा. सु. दि. 05.02.2024 रोजी 04.00 वा. सु. दिगंबर जाधव यांचे राहाते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- दिगंबर जाधव यांनी दि.06.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे- खॉजा नुरअहेमद शेख, वय 38 वर्षे, रा. खॉजानगर गल्ली नं 17 धाराशिव, ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 25,000₹ किंमतीची टीव्हीएस स्टार सिटी मोटरसायकल क्र एमएच 25 एझेड 5679 ही दि. 19.01.2024 रोजी 11.00 वा. सु. राजधानी हॉटेलच्या बाजूला धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- खॉजा शेख यांनी दि.06.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : फिर्यादी नामे-भिम धनाजी व्हनमाने,वय 27 वर्षे, रा. पितापुर, ता. अक्कलकोट, जि सोलापूर यांचा अंदाजे 15,000₹ किंमतीचा विवो वाय कंपनीचा 5 जी मोबाईल फोन हा दि. 05.02.2024 रोजी 00.00 ते दि. 06.02.2024 रोजी 02.00 वा. सु. तुळजाभवानी स्टेडीअम धाराशिव येथुन संशईत आरोपी नामे- 1) कांबळे 2) शेख यांनी चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- भिम व्हनमाने यांनी दि.06.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 379, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : फिर्यादी नामे- चंद्रकांत दगडू जाधव, वय 55 वर्षे, रा. मानेनगर नळदुर्ग, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे नगर परिषद नळदुर्ग येथील इलेक्ट्रिशन रुमचे अज्ञात व्यक्तीने दि.04.02.2024 रोजी 20.00 ते दि. 05,02.20.24 रोजी 06.00 वा. पुर्वी कुलूप तोडून आत प्रवेश करुन रुममधील काळ्या रंगाची 10 एमएम ची सर्व्हीस वायर 1,000 फुट अंदाजे 15,000₹ किंमतीचा वायर चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- चंद्रकांत जाधव यांनी दि.06.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 461, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
भुम : फिर्यादी नामे- अरविंद हरिनंद टाळके, वय 35 वर्षे, रा. राळेसांगवी, ता. भुम जि. धाराशिव यांचे चुलते दत्तात्रय टाळके यांचे घरातील लोखंडी पायी फवारणी, ज्वारी काढण्याचे लोखडी वाकस,पाण्याचे मोटारीचे सहा लोखंडी नेपल, बोअरच्या मोटारचे लोखंडी दोन बॅड, पाईप लाईनची लोखंडी रिंग, एक लोखंडी एअर वॉल, पाण्याचे मोटारीचे लोखंडी, 02 बॅड, जुना टेबल पंखा, बैलगाडीचे लोखंडी दोन खिळे, जुना मोटार टार्टर, क्रेनचे लोखंडी ब्रेक, असा एकुण 40,900₹ किंमतीचे साहित्य हे दि. 06.02.2024 रोजी 12.45 वा. सु. चार अनोळखी इसम चोरी करुन चोरी करण्यासाठी वापरलेली लाल रंगाचे टमटम क्र एमएच 04 एफ्यु 1597 मध्ये घेवून जात असताना अरविंद टाळके यांनी गावकऱ्यांच्या मदतीने त्या चौघांना पकडून भुम पोलीसांच्या ताब्यात दिले. यावर पोलीसांनी त्यांची विचारपुस केली असता त्यांनी त्यांची नावे- 1) घनशाम मधुकर पवार, वय 28 वर्षे, रा. आरोळे वस्ती, जामखेड, जि. अहमदनगर, 2) रामेश्वर शिवाजी शिंदे, वय 20 वर्षे, रा. पारा ता. वाशी जि. धाराशिव, 3) नंदा कैलास पवार, वय 20 वर्षे, रा जामखेड जि. अहमदनगर, 4) सुगंधा कैलास पवार, वय 19 वर्षे रा. जामखेड जि. अहमदनगर असे सागिंतले. यावर पोलीसांनी नमुद आरोपींना अटक करुन त्यांच्याविरुध्द भुम पो.ठा. येथे- गुन्हा क्र. 30/2024 भा.दं.वि. सं. कलम- 380, 34 अन्वये नोंदवण्यात आला आहे.
तुळजापूर: फिर्यादी नामे- विकास गणेश यादव, वय 22 वर्षे, रा. खयरेडीय, ता. गौरीबाजार जि. देवरया, राज्य उत्तरप्रदेश, ह. मु. तडवळा शिवारात मनोहर काळे यांचे शेतात बायपासच्या पश्चिमेस तुळजापूर यांचा अंदाजे 15,000 ₹ किंमतीचा ओपो कंपनीचा मोबाईल फोन हा दि.24.01.2024 रोजी 22.00 ते दि. 25.01.2024 रोजी 05.00 वा. सु. तडवळा शिवारात मनोहर काळे यांचे शेतातुन बायपासच्या पश्चिमेस तुळजापूर येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विकास यादव यांनी दि.06.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.