धाराशिव :आरोपी नामे-1)तुकाराम बालाजी राठोड, रा. जहागीरदारवाडी ता. जि. धाराशिव यांनी दि. 23.08.2022 रोजीचे अंदाजे एक महिन्यानंतर ते 05.01.2024 रोजी 17.30 वा. सु. जहागिरदारवाडी शिवार येथे फिर्यादी नामे- जमुना भागवत हाटकर, वय 52 वर्षे, रा. गंधोरा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींने उसतोड करुन देतो म्हणून घेतलेले पैसे न फेडण्याचे कारणावरुन जमुना हाटकर यांचे पती भागवत हाटकर यांना शेतात नेहुन त्यांचेकडून काम करुन घेवून त्यांना दोन वर्ष गावाकडे जावून न दिल्याने जमुना हाटकर या त्यांच्या नवऱ्यास आणनेकरीता आल्या असता नमुद आरोपीने त्यांनाही जातीवाचक शिवीगाळ केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- जमुना हाटकर यांनी दि.06.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 344, 374 भा.दं.वि.सं. सह कलम 16 बंद बिगार पध्दती अधिनियम 1976, सह अ.जा.ज.अ.प्र कायदा कलम 3(1) (एच), 3(1) (एस) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा :आरोपी नामे-1)शंकर दंडगुले, 2) लक्ष्मण दंडगुले, 3) श्रीकांत राम दंडगुले, 4) बालाजी शंकर दंडगुले, व इतर चार इसम यांनी दि. 05.02.2024 रोजी 20.30 वा. सु. कुंभारपट्टी चौकातील गंगाराम शिंदेच्या गिरणीजवळ उमरगा येथे फिर्यादी नामे- सुनिल राम बनसोडे, वय 19 वर्षे, रा. कुंभारपट्टी उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हा सोबतचे लोकांसह कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष महादेव सलके यांचे वाढदिवस साजरा करण्यासाठी रोडवर उभे असताना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगड, विटाने मारहण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीचे आजोबा बाबु कलृलाप्पा बनसोडे हे घरातुन बाहेर येत असताना तृयांना डोक्यात विट लागून जखम झाली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुनिल बनसोडे यांनी दि.06.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 143, 147, 149 भा.दं.वि.सं. सह 3(1) (आर), 3(1) (एस), 3 (2) (व्हिए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग :आरोपी नामे-1)धनाजी अर्जुन माळी, 2) प्रशांत उत्तम लोमटे, 3) जिवन कमलाकर लोमटे, तिघे रा. सलगरा दि. ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 04.02.2024 रोजी 12.00 वा. सु. शेत गट क्र 56 व 87 च्या सामाईक बांधावर सलगरा दि. शिवार येथे फिर्यादी नामे- सोमनाथ बाबुराव बामणकर, वय 70 वर्षे, रा. सलगरा दि. ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेत रस्त्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सोमनाथ बामणकर यांनी दि.06.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 34 भा.द.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.