• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, June 27, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये बेकायदेशीर दारू वाहतूक उघडकीस; ६ लाखांच्या मुद्देमालासह एकावर गुन्हा दाखल

admin by admin
May 4, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड
0
SHARES
466
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: धाराशिव सिटी पोलिसांच्या पथकाने छ. शिवाजी महाराज चौकात मोठी कारवाई करत बेकायदेशीररीत्या दारूची वाहतूक करणारी गाडी पकडली आहे. या कारवाईत पोलिसांनी देशी-विदेशी दारू आणि महिंद्रा बोलेरो जीप असा एकूण ६,०७,०९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

रविवार, दिनांक ०३ मे २०२६ रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास ही घटना घडली. सविस्तर माहितीनुसार, पोलीस नाईक रमाकांत मधुकर जगताप आणि सपोनि अंभोरे हे नेट परीक्षेच्या बंदोबस्तासाठी गस्तीवर असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात त्यांना एका गुप्त बातमीदारामार्फत खबर मिळाली होती. एक व्यक्ती पांढरा शर्ट आणि काळी पँट घालून आपल्या ताब्यातील महिंद्रा बोलेरो जीप (MH13DT5924) मध्ये देशी-विदेशी दारूची चोरटी विक्री करण्यासाठी छ. शिवाजी महाराज चौकातून बार्शी रोडने जाणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे सपोनि अंभोरे यांनी दोन पंचांना बोलावून घेत देवगुडे यांच्या किराणा दुकानासमोर, छ. शिवाजी महाराज चौक येथे सापळा रचला. संशयित जीप तिथे येताच पोलिसांनी ती थांबवून तिची तपासणी केली असता, गाडीमध्ये ट्यूबर्ग बिअर, टॅंगो पंच, इम्पिरियल ब्ल्यू, क्लासिक गोल्ड, रॉयल स्टॅग, ओल्ड मंक आणि रॉयल चॅलेंज अशा विविध कंपन्यांच्या दारूच्या सीलबंद बाटल्या आढळून आल्या. जप्त करण्यात आलेल्या दारूची एकूण किंमत ७,०९५ रुपये आहे. त्याचबरोबर गुन्ह्यात वापरलेली ६,००,००० रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो निओ जीप देखील पोलिसांनी जप्त केली आहे.

या प्रकरणी आरोपी सतीश रामभाऊ शिंदे (वय ४५, रा. नारीवाडी, ता. बार्शी, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध विनापरवाना बेकायदेशीररीत्या दारूची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध धाराशिव सिटी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५ (ई) अन्वये प्रथम खबर अहवाल (गुन्हा क्र. ०१७३) दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फौजदार गजानन खंडोजी करहाळे हे करत आहेत.

Previous Post

फेसबुक पिंट्या उर्फ पावशेरसिंहाचा नवा स्टंट! ‘काम दुसऱ्याचं… आणि श्रेय स्वतःचं’, रेल्वे ट्रॅकवर साहेबांचा ‘कॅमेरा-शो’!

Next Post

तुळजापुरात थरार: जुन्या वादातून १९ वर्षीय तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने भोसकून निर्घृण खून

Next Post
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

तुळजापुरात थरार: जुन्या वादातून १९ वर्षीय तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने भोसकून निर्घृण खून

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

 तुळजापूर तालुक्यात घरफोडी! बिजनवाडीत कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने लंपास; अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल

June 27, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

भूम तालुक्यातील शेतीचा वाद परंड्यात पोहोचला! गोलेगाव शिवारात ५८ वर्षीय प्रौढाला चपलेने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; डोके कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल

June 27, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

ढोकी हद्दीत संतापजनक प्रकार! “अंघोळीचा व्हिडिओ व्हायरल करीन” अशी धमकी देत विवाहितेवर उसाच्या शेतात अत्याचार

June 27, 2026
फेसबुक पिंट्याचा नवा ‘हवाई’ स्टंट! जुन्या घोषणा हवेत विरल्या, आता तुळजापुरात थेट ‘विमानतळ’!

फेसबुक पिंट्याचा नवा ‘हवाई’ स्टंट! जुन्या घोषणा हवेत विरल्या, आता तुळजापुरात थेट ‘विमानतळ’!

June 27, 2026
‘सूर्यराजे’ सत्तेत, ‘फेसबुक पिंट्या’ची गोची, आणि ‘मल्लू नेरूळकर’ला ‘भावी खासदारकी’चे डोहाळे!

‘सूर्यराजे’ सत्तेत, ‘फेसबुक पिंट्या’ची गोची, आणि ‘मल्लू नेरूळकर’ला ‘भावी खासदारकी’चे डोहाळे!

June 27, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group