• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, August 25, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर चाकू आणि लोखंडी गजाने हल्ला

जवळा (नि.) येथील बाजार चौकातील घटना; परंडा पोलिसांत तिघांवर गुन्हा दाखल

admin by admin
May 11, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा : जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका २२ वर्षीय तरुणाला भरचौकात गाठून शिवीगाळ करत त्याच्यावर चाकू आणि लोखंडी गजाने हल्ला केल्याची घटना परंडा तालुक्यातील जवळा (नि.) येथे रविवारी (ता. १०) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष नागनाथ कारकर (वय २२, रा. जवळा नि., ता. परंडा, जि. धाराशिव) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास संतोष कारकर हे जवळा (नि.) येथील बाजार चौकात उभे होते. यावेळी आरोपी योगेश दत्ता राऊत, तुषार बबन राऊत आणि आदेश अण्णा राऊत (सर्व रा. जवळा नि., ता. परंडा) हे तिघे तिथे आले. त्यांनी मागील भांडणाचे कारण उकरून काढून संतोष यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या तिघांनी संगनमत करून संतोषला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी त्यांच्याजवळील चाकू आणि लोखंडी गजाने मारहाण करून संतोष यांना जखमी केले.

भरबाजारात झालेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी संतोष कारकर यांनी रविवारी (ता. १०) दिलेल्या प्रथम खबरीवरून परंडा पोलीस ठाण्यात योगेश राऊत, तुषार राऊत आणि आदेश राऊत या तीन आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत.

Previous Post

मत्स्य आयुक्तांकडे तक्रार केल्याच्या रागातून महिलेवर कोयत्याने हल्ला; दागिने व रोकड लुटली

Next Post

येडेश्वरी मंदिरात गर्दीचा फायदा घेत महिलेचे ९५ हजारांचे सोन्याचे गंठण पळविले

Next Post
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

येडेश्वरी मंदिरात गर्दीचा फायदा घेत महिलेचे ९५ हजारांचे सोन्याचे गंठण पळविले

ताज्या बातम्या

तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

August 24, 2026
तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

August 23, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल

August 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

परंडा : जुन्या पैशांच्या वादातून मंडई पेठेत दोन गटांत तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या, पाईपने दहशत माजवत दुकाने पाडली बंद

August 23, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

तुळजापूर : माळुंब्रा फाट्याजवळ सोलापूरच्या तरुणाचा खून; अनैतिक संबंधांच्या संशयातून कृत्य

August 23, 2026

Recent Posts

  • तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!
  • तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!
  • उमरगा : कसगी चौकात पिकअपमधून ४० किलो गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह १.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त, एकावर गुन्हा दाखल
  • परंडा : जुन्या पैशांच्या वादातून मंडई पेठेत दोन गटांत तुंबळ हाणामारी; लाठ्या-काठ्या, पाईपने दहशत माजवत दुकाने पाडली बंद
  • तुळजापूर : माळुंब्रा फाट्याजवळ सोलापूरच्या तरुणाचा खून; अनैतिक संबंधांच्या संशयातून कृत्य
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!