• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, May 12, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

स्पा सेंटर सुरू ठेवण्यासाठी ३६ हजारांची लाच घेताना कळंबचा पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात; दुसरा फरार

admin by admin
May 12, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
कळंब तहसीलदारांच्या वाहन चालकांने साहेबाच्या नावावर आठ हजार लाच घेतली
0
SHARES
1.6k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब : शहरातील एका स्पा सेंटरच्या चालकाकडून व्यवसाय सुरळीत चालू देण्यासाठी ३६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना कळंब पोलीस ठाण्यातील एका पोलीस अंमलदाराला जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई सोमवारी (दि. ११) करण्यात आली. अशोक दादाराव करवर असे रंगेहाथ पकडण्यात आलेल्या अंमलदाराचे नाव असून, या प्रकरणातील दुसरा पोलीस अंमलदार सिद्धेश्वर प्रकाश शिंदे याचा शोध सुरू आहे.

नेमके प्रकरण काय?

तक्रारदार (वय ३३) यांचा कळंब शहरात ‘रिलॅक्स स्पा सेंटर’ नावाचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय विनाअडथळा सुरू ठेवण्यासाठी कळंब पोलीस ठाण्यातील अंमलदार सिद्धेश्वर शिंदे (वय ३७) याने पोलीस निरीक्षकांसाठी २० हजार रुपये, तर अंमलदार अशोक करवर (वय ३४) याने दुय्यम अधिकाऱ्यांसाठी २० हजार रुपये, अशा एकूण ४० हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी केली होती. तक्रारदाराने वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली असता, “वरिष्ठांना भेटलास तर ते तुझा स्पा बंद करून तुझ्यावर कारवाई करतील, धंदा सुरळीत चालवायचा असेल तर आमच्याशीच बोलावे लागेल,” अशी धमकी या अंमलदारांनी दिली होती.

पडताळणी आणि सापळा कारवाई

या प्रकाराला कंटाळून तक्रारदाराने जालना एसीबीकडे धाव घेतली. १० मे २०२६ रोजी बागवान चौक, कळंब येथे पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. यात तडजोडीअंती दोघांनी मिळून ३६ हजार रुपये घेण्याचे निश्चित केले. त्यानंतर ११ मे २०२६ रोजी एसीबीच्या पथकाने कळंब शहरातील होळकर चौकातून तांदळवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील हॉटेल गुलमोहर बिर्याणी हाऊससमोर सापळा रचला. यावेळी तक्रारदाराच्या स्विफ्ट कारमध्ये ३६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस अंमलदार अशोक करवर याला एसीबीने रंगेहाथ पकडले. त्याच्या अंगझडतीमध्ये लाचेच्या रकमेसह ३५० रुपये रोख, एक मोबाईल आणि वाहनांच्या चाव्या जप्त करण्यात आल्या आहेत.

पुढील कारवाई सुरू

या कारवाईनंतर आरोपी अशोक करवर याला ताब्यात घेण्यात आले असून, दुसरा आरोपी सिद्धेश्वर शिंदे याचा शोध सुरू आहे. दोन्ही आरोपींच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया एसीबीकडून सुरू असून, कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

कारवाईतील अधिकाऱ्यांचे पथक

ही धडक कारवाई छत्रपती संभाजीनगर एसीबीच्या पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार-कांगणे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. शशिकांत सिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली, जालना एसीबीचे पोलीस उपअधीक्षक बाळू जाधवर (सापळा अधिकारी) यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या सापळा पथकात पोहेकॉ गजानन घायवट, पो. अंमलदार मनोहर भुतेकर, गणेश चेके, संदीपान लहाने, गजानन कांबळे आणि चालक भालचंद्र बिनोरकर यांचा सहभाग होता. या प्रकरणाचा पुढील तपास धाराशिव एसीबीचे पोलीस निरीक्षक विजय वगरे करत आहेत.


नागरिकांना आवाहन:

कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • टोल फ्री क्र.: १०६४

  • व्हॉट्सॲप क्र.: ९७६४०२१०६४

Previous Post

येडेश्वरी मंदिरात गर्दीचा फायदा घेत महिलेचे ९५ हजारांचे सोन्याचे गंठण पळविले

Next Post

आरोग्य विभागाचा सर्वात मोठा ‘सर्जिकल स्ट्राईक’; संवर्ग बदलून नियुक्ती मिळवणाऱ्या डॉक्टरांना दणका

Next Post
आरोग्य विभागाचा सर्वात मोठा ‘सर्जिकल स्ट्राईक’; संवर्ग बदलून नियुक्ती मिळवणाऱ्या डॉक्टरांना दणका

आरोग्य विभागाचा सर्वात मोठा 'सर्जिकल स्ट्राईक'; संवर्ग बदलून नियुक्ती मिळवणाऱ्या डॉक्टरांना दणका

ताज्या बातम्या

आरोग्य विभागाचा सर्वात मोठा ‘सर्जिकल स्ट्राईक’; संवर्ग बदलून नियुक्ती मिळवणाऱ्या डॉक्टरांना दणका

आरोग्य विभागाचा सर्वात मोठा ‘सर्जिकल स्ट्राईक’; संवर्ग बदलून नियुक्ती मिळवणाऱ्या डॉक्टरांना दणका

May 12, 2026
कळंब तहसीलदारांच्या वाहन चालकांने साहेबाच्या नावावर आठ हजार लाच घेतली

स्पा सेंटर सुरू ठेवण्यासाठी ३६ हजारांची लाच घेताना कळंबचा पोलीस अंमलदार एसीबीच्या जाळ्यात; दुसरा फरार

May 12, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

येडेश्वरी मंदिरात गर्दीचा फायदा घेत महिलेचे ९५ हजारांचे सोन्याचे गंठण पळविले

May 11, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर चाकू आणि लोखंडी गजाने हल्ला

May 11, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

मत्स्य आयुक्तांकडे तक्रार केल्याच्या रागातून महिलेवर कोयत्याने हल्ला; दागिने व रोकड लुटली

May 11, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group