• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, August 25, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये प्रतिबंधित गुटख्यासह दुचाकी जप्त; शहर पोलिसांची वैराग नाका परिसरात कारवाई

admin by admin
May 14, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव :  महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी गुटखा आणि तंबाखूची विक्री करण्यासाठी जात असलेल्या एका इसमाला धाराशिव शहर पोलिसांनी रंगेहाथ पकडले. वैराग नाका परिसरात रविवारी (दि. ३१ मे) दुपारी करण्यात आलेल्या या कारवाईत गुटखा आणि दुचाकीसह एकूण ५८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी मनोज प्रभाकर जाधव (वय ४४, रा. चिलवडी, ता. जि. धाराशिव) याच्याविरुद्ध धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?

धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पथक रविवारी दुपारी गस्त घालत असताना, त्यांना वैराग नाका परिसरात एक संशयित इसम दुचाकीवरून जात असल्याची माहिती मिळाली. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पोलिसांनी मनोज जाधव याला अडवून त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडे शासनाने प्रतिबंधित केलेला ‘बादशाहा’ नावाचा गुटखा आणि तंबाखू जर्द्याचे आठ पाकिटे मिळून आली.

पोलिसांनी या कारवाईत प्रतिबंधित गुटखा आणि गुटख्याची वाहतूक करण्यासाठी वापरलेली हिरो कंपनीची एच.एफ. डिलक्स मोटरसायकल (क्रमांक: MH 25 AM 2821) असा एकूण ५८ हजार ४०० रुपयांचा माल जप्त केला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी मनोज जाधव याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५ सह अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम ५९ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. जिल्ह्यात छुप्या मार्गाने होणाऱ्या गुटखा विक्रीवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून, अशा अवैध धंद्यांविरुद्ध कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे.


Previous Post

परंड्यात हातचलाकीने एटीएम कार्ड बदलून ५० हजारांचा गंडा; पिठापुरीतील तरुणाची फसवणूक

Next Post

पीक विम्यासाठी नारंगवाडीत रास्ता रोको; १० दिवसांत भरपाई न दिल्यास प्रत्येक तालुक्यात आंदोलनाचा इशारा

Next Post
पीक विम्यासाठी नारंगवाडीत रास्ता रोको; १० दिवसांत भरपाई न दिल्यास प्रत्येक तालुक्यात आंदोलनाचा इशारा

पीक विम्यासाठी नारंगवाडीत रास्ता रोको; १० दिवसांत भरपाई न दिल्यास प्रत्येक तालुक्यात आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

तुळजाभवानी मंदिराला आता ‘एमएसएफ’चे भक्कम सुरक्षा कवच ११६ अधिकारी-जवानांची तैनाती;

तुळजाभवानी मंदिराला आता ‘एमएसएफ’चे भक्कम सुरक्षा कवच ११६ अधिकारी-जवानांची तैनाती;

August 25, 2026
धाराशिवमध्ये मोटारसायकल चोरटा जेरबंद; चार दुचाकी जप्त

धाराशिवमध्ये मोटारसायकल चोरटा जेरबंद; चार दुचाकी जप्त

August 25, 2026
धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

१ कोटींचा ‘घोडेबाजार’ लिक, १४० कोटींचा मलिदा लाडक्यांना, अन् नगराध्यक्षांचा ‘आमचं ठरलंय’ बॉम्ब!

August 25, 2026
तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!

August 24, 2026
तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!

August 23, 2026

Recent Posts

  • तुळजाभवानी मंदिराला आता ‘एमएसएफ’चे भक्कम सुरक्षा कवच ११६ अधिकारी-जवानांची तैनाती;
  • धाराशिवमध्ये मोटारसायकल चोरटा जेरबंद; चार दुचाकी जप्त
  • १ कोटींचा ‘घोडेबाजार’ लिक, १४० कोटींचा मलिदा लाडक्यांना, अन् नगराध्यक्षांचा ‘आमचं ठरलंय’ बॉम्ब!
  • तीर्थक्षेत्र तुळजापुरात निवेदनांचा ‘खेळ’ अन् खाकीची ‘बघ्याची’ भूमिका!
  • तुळजापूरच्या कारभाऱ्यांचे “आमचं ठरलंय”, सूर्यराजेंचा दणका अन् साहेबांचे १६ कोटींचे ‘हायटेक’ गाजर!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!