• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने पळवणारी टोळी सक्रिय; येरमाळा व कळंबमध्ये ५ महिलांना गंडा

येडेश्वरी मंदिर परिसर आणि कळंब बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट; १ लाख ६५ हजारांचा ऐवज लंपास

admin by admin
May 16, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : जिल्ह्यातील येरमाळा येथील श्री येडेश्वरी मंदिर परिसर आणि कळंब येथील बसस्थानकावर भाविक व प्रवासी महिलांच्या गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील दागिने व मणिमंगळसूत्र चोरून नेणाऱ्या चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अवघ्या दोन-तीन दिवसांत तब्बल पाच महिलांचे एकूण १ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या वाढत्या चोऱ्यांमुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, येरमाळा आणि कळंब पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

येडेश्वरी मंदिर परिसरात तीन महिलांना लुटले

येरमाळा येथील श्री येडेश्वरी मंदिर परिसरातील कल्लोळ जवळ दर्शनासाठी आलेल्या भाविक महिलांना चोरट्यांनी लक्ष केले. १५ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास नागुलगाव (ता. कळंब) येथील मीरा सोपान भोरे (वय ४८) आणि त्यांच्या जाऊबाई यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीचे साडेपाच ग्रॅमचे मणिमंगळसूत्र अज्ञाताने चोरले.

याच दिवशी सकाळी साडेदहा वाजता गावसूद येथील प्रीती महादेव सगर (वय २८) यांचे १५ हजार रुपये किमतीचे दोन ग्रॅमचे मणिमंगळसूत्र, तर सकाळी ११ वाजता काशिदवाडी (ता. केज, जि. बीड) येथील अश्विनी सखाराम कदम (वय ३५) यांचे ३५ हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅमचे मंगळसूत्र गर्दीचा फायदा घेत लांबवण्यात आले. या तिन्ही घटनांप्रकरणी फिर्यादीवरून येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कळंब बसस्थानकावर प्रवाशांचे दागिने पळवले

दुसरीकडे, कळंब बसस्थानकावर बसमध्ये चढणाऱ्या प्रवासी महिलांचे दागिने पळवण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. १३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता थेरगाव (पुणे) येथील मनीषा मधुकर विभुते (वय ४६) या कळंब-परळी बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील ३५ हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅमचे दागिने चोरट्याने पळवले.

तसेच, १४ मे रोजी दुपारी १.१० वाजता माणगाव (जि. रायगड) येथील मंगल अर्जुन सोनवणे (वय ६०) या बसमध्ये चढत असताना त्यांच्याही गळ्यातील १५ ग्रॅमचे ३५ हजार रुपये किमतीचे दागिने अज्ञाताने चोरी केले.

या पाचही घटनांप्रकरणी संबंधित येरमाळा आणि कळंब पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. बसस्थानक आणि मंदिर परिसरातील वाढत्या चोऱ्या रोखण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे राहिले आहे.


Previous Post

 डॉल्बीवर कारवाई करणाऱ्या पोलिसांनाच मारहाण; पोलिसांच्या ताब्यातून डीजेचे वाहन पळवले

Next Post

भूममध्ये पोलिसांवर जमावाचा जीवघेणा हल्ला; गाड्यांची तोडफोड

Next Post
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

भूममध्ये पोलिसांवर जमावाचा जीवघेणा हल्ला; गाड्यांची तोडफोड

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी

October 17, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून

October 17, 2026

Recent Posts

  • धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता
  • उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला
  • खामसवाडी : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून कॉम्प्युटर सेंटरचालकावर चाकू अन् लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला
  • जळकोट शिवार : शेतीच्या वादातून रक्तरंजित थरार; चाकू व दगडाने प्राणघातक हल्ला करून तरुणाला केले गंभीर जखमी
  • भंडारी शिवार : हॉटेलमध्ये नेहमी रागावल्याचा मनात धरला राग; ओडिशातून आलेल्या वेटरने डोक्यात वार करून मालकाचाच केला निर्घृण खून
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!