• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, July 27, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

वाशीत हद्दीखुना पाडताना निवासी नायब तहसीलदारांना मारली आडकाठी; ८ जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
June 11, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह
0
SHARES
1.1k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

वाशी : शासकीय आदेशानुसार वाशी शिवारात रस्त्याचा मार्ग खुला करण्यासाठी गेलेले निवासी नायब तहसीलदार आणि शासकीय कर्मचाऱ्यांना मज्जाव करत, शासकीय कामात अडथळा आणल्याची गंभीर घटना समोर आली आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात ८ जणांविरुद्ध बेकायदेशीर जमाव जमवून शासकीय आदेशाची अवहेलना केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीधर देविदास घुले, बिपीन रामलिंग घुले, अच्युत सोपान घुले, विलास हरिदास घुले, भारत सोपान घुले, हनुमंत देविदास घुले, रामलिंग हरिदास घुले आणि स्वप्नील हनुमंत घुले (सर्व रा. वाशी, ता. वाशी, जि. धाराशिव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी बीड येथील निवासी नायब तहसीलदार श्रीकिशन देवराव सांगळे (वय ५४, रा. सोमेश्वर नगर, बीड) यांनी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ९ जून रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास एनएच ५२ लगत असलेल्या वाशी शिवारातील जमीन सर्वे नंबर ६५३/ब, ६६७/ड, ६६७/फ, ६६७ येथे निवासी नायब तहसीलदार श्रीकिशन सांगळे हे आपल्या सहकाऱ्यांसह कायदेशीर हद्दीखुना करून रस्ता खुला करण्याचे शासकीय काम करत होते.

‘तुम्ही खुना करू नका, निघून जा!’

शासकीय पथक काम करत असतानाच, गावातील घुले गोटातील नमूद आठ जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून तेथे धाव घेतली. त्यांनी शासकीय कामात थेट हस्तक्षेप करत रस्ता खुला करण्यास तीव्र मज्जाव केला. “तुम्ही येथे हद्दीच्या खुना करू नका, येथून निघून जा,” असे धमकावत त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांना अडवले. प्रशासकीय आदेशाची सरळ-सरळ अवहेलना करत या जमावाने रस्ता खुला करण्याच्या कामात मोठा अडथळा निर्माण केला.

याप्रकरणी फिर्यादी निवासी नायब तहसीलदार श्रीकिशन सांगळे यांनी १० जून रोजी वाशी पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल (FIR) दिला. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सर्व आठ आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३२, १२६(२), २२३, १८९(२), १९० अन्वये गुन्हा नोंदवला आहे. वाशी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Previous Post

रुम भाड्याने देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार; धाराशिव शहर पोलिसांत गुन्हा दाखल

Next Post

‘माझा संसार का मोडलास?’ म्हणत जावयाचा सासूवर जीवघेणा हल्ला; लोहारा तालुक्यातील मुर्शदपूर येथील घटना

Next Post
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

'माझा संसार का मोडलास?' म्हणत जावयाचा सासूवर जीवघेणा हल्ला; लोहारा तालुक्यातील मुर्शदपूर येथील घटना

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव शहरात भानूनगर येथे तुफान हाणामारी! पूर्ववैमनस्यातून ब्लेड व दगडाने हल्ला

July 26, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तालुक्यातील हासेगाव (के) येथे दोन गटांत तुफान राडा!

July 26, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

परंडा तालुक्यात जवळा नि. येथे सराफ दुकानात धाडसी हातचलाखी!

July 26, 2026
शेतकऱ्यांना फसवू नका, तळतळाट ओढवून घेऊ नका…

“लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं नाही”

July 26, 2026
सायबर फसवणुकीपासून मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

सायबर फसवणुकीपासून मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

July 26, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!