• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, September 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये ‘लुटारू नवरी’चा थरार; लग्न करून तब्बल २७ लाखांना लुटले, ५० लाखांची खंडणीही मागितली!

admin by admin
June 12, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये ‘लुटारू नवरी’चा थरार; लग्न करून तब्बल २७ लाखांना लुटले, ५० लाखांची खंडणीही मागितली!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : लग्नाचे आमिष दाखवून नवरदेवाला लुटणाऱ्या ‘लुटारू नवरी’च्या टोळीचा आणखी एक धक्कादायक कारनामा धाराशिवमध्ये उघडकीस आला आहे. एका शासकीय अधिकाऱ्याशी लग्न लावून, महिनाभरातच घरातील १७ तोळे सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण २७ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन नवरीसह तिचे साथीदार पसार झाले आहेत. एवढेच नव्हे तर, बदनामी करण्याची धमकी देत या टोळीने नवरदेवाकडे तब्बल ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी शिवराज संग्राम पाटील (वय २८, रा. सुंडगी, ता. देगलूर, जि. नांदेड. हली मुक्काम- भाग्यनगर, धाराशिव) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आनंदनगर पोलिस ठाण्यात नवरीसह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिनाभरातच डाव साधला

फिर्यादी शिवराज पाटील हे धाराशिव येथील भाग्यनगर भागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय निवासस्थानात राहतात. आरोपींनी संगनमत करून शिवराज यांच्याशी शुंभागी उर्फ साक्षी मच्छिंद्रनाथ वारले हिचे लग्न लावून दिले. १३ मे २०२६ ते ११ जून २०२६ या अवघ्या महिनाभराच्या कालावधीत नवरी आणि तिच्या नातेवाईकांनी घरातून १७ तोळे सोन्याचे दागिने (किंमत २५ लाख ८४ हजार रुपये) आणि १ लाख ७० हजार रुपयांची रोकड असा एकूण २७ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

खंडणीसाठी धमकावले

हा दरोडा टाकल्यानंतरही आरोपींचे मन भरले नाही. फिर्यादी हे शासकीय पदावर कार्यरत असल्याने त्यांची व त्यांच्या पदाची प्रतिमा समाजात मलीन करण्याची धमकी या टोळीने दिली. प्रकरण दाबण्यासाठी आणि बदनामी टाळण्यासाठी आरोपींनी फिर्यादीकडे थेट ५० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसात धाव घेतली.

‘या’ नऊ जणांवर गुन्हा दाखल

आनंदनगर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये खालील आरोपींचा समावेश आहे:

  • महेश जनार्धन पाटील (रा. कौठा, नांदेड)

  • नवीनकुमार मारुतीराव पाटील (रा. बन्नाळी, धर्माबाद)

  • सुंदरबाई गंगाधर पाटील (रा. देगलूर, नांदेड)

  • शंकर नागोराव खपाटे (रा. बन्नाळी, धर्माबाद)

  • शुंभागी उर्फ साक्षी मच्छिंद्रनाथ वारले (नवरी, रा. वाधी)

  • शिवम खरबुजे (रा. बोधन, निझामाबाद, तेलंगणा)

  • गोरखनाथ वारले, जालींदरनाथ वारले, शुभम वारले (तिघे रा. तानूर, जि. निर्मल, तेलंगणा)

या आंतरराज्य टोळीने अशाच प्रकारे आणखी किती जणांना जाळ्यात ओढले आहे का? याचा तपास आता आनंदनगर पोलिस करत आहेत.

Previous Post

धाराशिव जनता बँकेच्या ७ संचालकांना हटवण्याचे आरबीआयचे निर्देश; सहकार क्षेत्रात मोठी खळबळ

Next Post

हॉटेल ‘रॉयल लॉज’वर पोलिसांचा छापा; हायप्रोफाइल देहविक्रीचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका!

Next Post
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

हॉटेल 'रॉयल लॉज'वर पोलिसांचा छापा; हायप्रोफाइल देहविक्रीचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका!

ताज्या बातम्या

पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR

पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR

September 18, 2026
एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल

September 18, 2026
‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!

‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!

September 17, 2026
‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!

‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!

September 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : सामाजिक वनीकरण कार्यालयात घुसून वनरक्षकाच्या अंगावर ओतली काळी शाई; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

September 17, 2026

Recent Posts

  • पोलिसांची ८ महिने टोलवाटोलव, आगार प्रमुखाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न; एसटी चालकाच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर अखेर FIR
  • एसटी बसमध्ये बनावट दिव्यांग कार्ड वापरून फसवणूक; आगार प्रमुखासह प्रवाशाविरुद्ध तुळजापूर पोलिसांत गुन्हा दाखल
  • ‘मराठवाड्याची शिवकाशी’ तेरखेड्यातील फटाका उद्योग संशयाच्या भोवऱ्यात!
  • ‘झेंडा मंत्री’ प्रताप सरनाईकांचा ‘व्हिडिओ कॉल’ दुष्काळ दौरा: उंटावरून शेळ्या हाकण्याचा नवा विक्रम!
  • उमरगा : सामाजिक वनीकरण कार्यालयात घुसून वनरक्षकाच्या अंगावर ओतली काळी शाई; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!