• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, July 27, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

हॉटेल ‘रॉयल लॉज’वर पोलिसांचा छापा; हायप्रोफाइल देहविक्रीचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका!

बनावट ग्राहक पाठवून शिराढोण पोलिसांनी केली कारवाई; मॅनेजरसह दोघांवर गुन्हा दाखल

admin by admin
June 12, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह
0
SHARES
3.3k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

शिराढोण: नायगाव ते मुरुड रस्त्यावरील ‘रॉयल लॉज’वर सुरु असलेल्या अनैतिक देहविक्रीच्या व्यवसायावर शिराढोण पोलिसांनी गुरुवारी (दि. ११) सायंकाळी धडक छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी वेश्या व्यवसायासाठी डांबून ठेवलेल्या दोन पीडित महिलांची सुटका केली असून, लॉज मॅनेजरसह दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख रकमेसह एकूण १५ हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी अक्षय दादासाहेब घोगरे आणि लॉज मॅनेजर अजय अच्युत रसाळ (दोघे रा. मुरुड, ता. जि. लातूर) यांच्याविरुद्ध तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असा रचला पोलिसांंनी सापळा…

पोलीस अधीक्षक रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिराढोण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कोळेकर व त्यांचे पथक हद्दीत गस्तीवर होते. दरम्यान, नायगाव शिवारातील ‘रॉयल लॉज’मध्ये काही महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची खात्रीशीर माहिती गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली.

माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी तात्काळ एक बनावट ग्राहक (डिकॉय कस्टमर) लॉजवर पाठवला. तेथे देहविक्री सुरू असल्याचे स्पष्ट होताच, सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास पोलीस पथकाने लॉजवर अचानक छापा टाकला.

मुद्देमाल जप्त, आरोपी गजाआड

या छाप्यात दोन पीडित महिला मिळून आल्या. महिला पोलिसांच्या मदतीने त्यांची विचारपूस केली असता, आरोपी अक्षय घोगरे आणि मॅनेजर अजय रसाळ हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी व उपजीविकेसाठी आपल्याला या व्यवसायात ढकलत असल्याचे महिलांनी सांगितले. पोलिसांनी दोन्ही महिलांची सुटका केली असून त्यांची नावे गोपनीय ठेवली आहेत.

कारवाईत काय काय जप्त?

पोलिसांनी घटनास्थळावरून आरोपींचे मोबाईल फोन, लॉजचे नोंदणी रजिस्टर, ५ हजार ३०० रुपयांची रोख रक्कम आणि इतर आक्षेपार्ह साहित्य असा एकूण १५,४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपींविरुद्ध तामलवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि मानवी अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमाच्या (PITA) विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही यशस्वी कामगिरी सपोनि कोळेकर आणि शिराढोण पोलिसांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Previous Post

धाराशिवमध्ये ‘लुटारू नवरी’चा थरार; लग्न करून तब्बल २७ लाखांना लुटले, ५० लाखांची खंडणीही मागितली!

Next Post

लोहार्यात धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी

Next Post
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

लोहार्यात धक्कादायक! लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी

ताज्या बातम्या

भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा अपमान की सत्तेचा माज?

भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा अपमान की सत्तेचा माज?

July 27, 2026
होर्डिंगवरून महायुतीत ठिणगी; तानाजीराव सावंत-ओमराजे यांचे फोटो वगळल्याने कार्यक्रमावर बहिष्कार

होर्डिंगवरून महायुतीत ठिणगी; तानाजीराव सावंत-ओमराजे यांचे फोटो वगळल्याने कार्यक्रमावर बहिष्कार

July 27, 2026
35 वर्षे पक्षात काम करणाऱ्या भाजप नेत्याला मंत्र्यांची भेट नाकारली?

35 वर्षे पक्षात काम करणाऱ्या भाजप नेत्याला मंत्र्यांची भेट नाकारली?

July 27, 2026
धाराशिव जिल्हा परिषदेला ग्रामविकास मंत्र्यांची केराची टोपली

धाराशिव जिल्हा परिषदेला ग्रामविकास मंत्र्यांची केराची टोपली

July 27, 2026
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

खोटे अपघात दाखवून विमा कंपन्यांना गंडा घालणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; उमरगा पोलिसांत धाव

July 27, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!