• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, August 1, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

फेसबुक पिंट्या उर्फ पावशेरसिंहाचा नवा ‘इको-फ्रेंडली’ स्टंट!

 बायोडिझेल कार्यकर्त्याच्या गाडीत, बातमी मात्र स्वतःच्या नावे!

admin by admin
June 15, 2026
in गोफणगुंडा
Reading Time: 1 min read
फेसबुक पिंट्या उर्फ पावशेरसिंहाचा नवा ‘इको-फ्रेंडली’ स्टंट!
0
SHARES
555
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

नमस्कार वाचकहो! ‘फेसबुक पिंट्या उर्फ पावशेरसिंह’ यांच्या पोकळ घोषणांच्या आणि ‘कॅमेरा-शो’च्या मालिकेत तुमचं पुन्हा स्वागत आहे. कालपर्यंत लेदर कारखाना, टेक्सटाईल पार्क, डिफेन्स हब आणि रेल्वेचे श्रेय लाटणारे साहेब आता थेट ‘इको-फ्रेंडली’ झाले आहेत! साहेबांच्या राजकीय इंजिनातलं इंधन संपल्यामुळे त्यांनी आता जनतेला फसवण्यासाठी ‘बायोडिझेल’ नावाचं नवं गाजर शोधून काढलं आहे.

चला तर मग, साहेबांच्या या नव्या ‘हटके’ घोषणेमागचं काळं सत्य, जमिनीचा खेळ आणि त्यांच्या ‘आलिशान’ स्टंटबाजीची पोलखोल करूया!

स्वतःच्या आलिशान गाडीला जपलं, कार्यकर्त्याचा मात्र बळी दिला!

साहेबांनी नुकतीच अशी भन्नाट हवा केलीये की, त्यांनी शेतातील तुराट्या, धसकटे, आणि काडी-कचऱ्यापासून तयार केलेलं ‘बायोडिझेल’ चक्क स्वतःच्या चारचाकी वाहनात वापरण्यास सुरुवात केली आहे. पण थांबा… इथंच तर खरा ‘गेम’ आहे!

आमच्या ‘बोरूबहाद्दरांनी’ जेव्हा आतली बातमी काढली, तेव्हा सत्य भयंकर निघालं. फेसबुक पिंट्या साहेबांनी स्वतःच्या करोडोंच्या ‘आलिशान’ गाडीत हे कचऱ्याचं डिझेल ओतायची रिस्क अजिबात घेतली नाही. त्यांनी काय केलं? तर त्यांच्या मागेपुढे फिरणाऱ्या एका बिचाऱ्या कार्यकर्त्याला पकडलं आणि हे ‘बायोडिझेल’ त्याच्या गाडीत ओतलं! स्वतःची गाडी सुरक्षित ठेवली आणि प्रयोगासाठी कार्यकर्त्याच्या गाडीच्या इंजिनाचा बळी दिला!

‘पाकीटमार’ पत्रकारांची फौज आणि साहेबांचा खोटा ‘कॅमेरा-शो’

कार्यकर्त्याच्या गाडीत डिझेल भरल्यावर साहेबांनी आपला पुढचा डाव टाकला. त्यांनी ‘पाकीट’ घेऊन पत्रकारिता करणाऱ्या त्या ‘दांडकेबहाद्दर’ पत्रकारांना बोलावलं आणि मोठ्या थाटात कॅमेऱ्यासमोर उभं राहून सांगितलं, “बघा बघा… हे बायोडिझेल मी माझ्या स्वतःच्या गाडीत भरलंय! आता याची मोठी बातमी करा आणि सगळीकडे पसरवा!”

पाकीटबहाद्दरांनीही मग ‘साहेब कसे पर्यावरणाचे रक्षक आहेत’ , आता १०० एकर मध्ये बायोडीझल कारखाना काढणार आहेत, तरुणांना रोजगार देणार आहेत याच्या बातम्या छापून आणल्या. पण साहेब, हा खोटेपणा किती दिवस चालणार?

मुळात या डिझेलला सरकारची परवानगी आहे का?

स्टंटबाजी आणि खोट्या बातम्यांच्या पलीकडे जाऊन एक अत्यंत गंभीर आणि मूळ प्रश्न असा आहे की… या ‘बायोडिझेल’ निर्मितीला आणि वापराला सरकारची अधिकृत परवानगी आहे का?

कुठलीही शासकीय मान्यता नसताना, सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून हा बेकायदेशीर उद्योग का सुरू आहे? जनतेला आणि प्रशासनाला अंधारात ठेवून हा कसला ‘विकास’ साधला जातोय?

आता साहेबांचं टार्गेट: धाराशिवसह सोलापूर, लातूर आणि बीड!

फेसबुक पिंट्यांची भूक आता फक्त धाराशिवपुरती मर्यादित राहिलेली नाही. त्यांनी या पोकळ घोषणेचा आवाका वाढवत, “या प्रकल्पाचा फायदा धाराशिवसह सोलापूर, लातूर आणि बीड जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना होणार आहे” अशी लोणकढी थाप मारली आहे.

  • धाराशिवचे शेतकरी: आधीच विम्याच्या पैशांसाठी रस्त्यावर रस्ता रोको करत आहेत.

  • इतर जिल्हे: आता लातूर, बीड आणि सोलापूरच्या शेतकऱ्यांनाही साहेब स्वतःच्या भूलथापांच्या जाळ्यात ओढू पाहत आहेत! एका जिल्ह्याला गाजर दाखवून झालं, आता चार जिल्ह्यांना वेड्यात काढायचा विडा साहेबांनी उचललाय.

संस्थेच्या नावाखाली १०० एकरांचा नवा प्लॅन!

या ‘बायोडिझेल’च्या बातमीत एक अत्यंत महत्त्वाची गोम दडलेली आहे. फेसबुक पिंट्या साहेब हे उपाध्यक्ष असलेल्या एका संस्थेच्या माध्यमातून धाराशिव परिसरात हा बायोडिझेल निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. आणि त्यासाठी किती जमीन लागणार? तर तब्बल १०० एकर!

कौडगाव एमआयडीसीत डिफेन्स आणि दारूगोळ्याच्या नावाखाली हजारो एकर जमिनी लाटण्याचा प्लॅन उघडकीस आल्यावर साहेबांनी आता संस्थेचा बुरखा पांघरला आहे. ‘बायोडिझेल’चा कारखाना उभारण्याच्या गोंडस नावाखाली परिसरातील मोक्याची १०० एकर जमीन गिळंकृत करण्याचा हा नवा ‘मास्टरप्लॅन’ आहे. नाव ‘स्वतःच्या संस्थेचं ठेवलंय, पण शेतकऱ्यांच्या जमिनींवर डल्ला मारणारे हे कसले उपाध्यक्ष ?

साहेब, शेतातल्या तुराट्या आणि धसकटे जाळून डिझेल बनवण्यापेक्षा, तुम्ही गेली १०-१२ वर्षे ज्या खोट्या आश्वासनांचा ‘कचरा’ गोळा केलाय, तो आधी साफ करा! धाराशिवच्या जनतेला आता पक्कं समजलंय की, जिथे जिथे फेसबुक पिंट्या ‘विकास’ आणि ‘कारखाना’ हा शब्द वापरतात, तिथे तिथे त्यांचा डोळा फक्त आणि फक्त ‘जमिनींवर’ असतो.

तुम्ही डिझेल कार्यकर्त्याच्या गाडीत टाका नाहीतर स्वतःच्या, तुमची राजकीय गाडी आता ‘बोगस इंधनावर’ जास्त काळ चालणार नाही आणि पुढच्या निवडणुकीत ती ‘पंक्चर’ होणार हे मात्र नक्की!

Previous Post

नळदुर्ग पोलिसांची चिवरी पाटीवर मोठी कारवाई! कत्तलीसाठी नेली जाणारी गोवंशीय जनावरे जप्त; ४ पिकअप गाड्यांसह ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Next Post

२० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज अंतिम फैसला!

Next Post
सुप्रीम कोर्टाचा आदेश: पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लवकरच

२० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज अंतिम फैसला!

ताज्या बातम्या

बसवराज पाटील यांच्या सत्काराच्या निमित्ताने निष्ठावंत भाजप नेत्यांचे शक्तीप्रदर्शन?

बसवराज पाटील यांच्या सत्काराच्या निमित्ताने निष्ठावंत भाजप नेत्यांचे शक्तीप्रदर्शन?

August 1, 2026
उमरगा नगर परिषदेच्या कचरा वाहन प्रकरणाला वेग

उमरगा नगर परिषदेच्या कचरा वाहन प्रकरणाला वेग

July 31, 2026
औराद येथील वायर चोरीत घंटागाडीचा वापर; नगराध्यक्ष किरण गायकवाड ॲक्शन मोडवर!

औराद येथील वायर चोरीत घंटागाडीचा वापर; नगराध्यक्ष किरण गायकवाड ॲक्शन मोडवर!

July 31, 2026
सोनारीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन यशस्वी; जिल्हा परिषदेत आंदोलनानंतर शिक्षक नियुक्तीचा आदेश

सोनारीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन यशस्वी; जिल्हा परिषदेत आंदोलनानंतर शिक्षक नियुक्तीचा आदेश

July 31, 2026
उमरगा नगर परिषदेच्या कचरा वाहन प्रकरणाला वेग

उमरगा नगर परिषद प्रशासन बॅकफूटवर! औराद येथील वायर चोरीच्या प्रकरणात कचरा गाडीचा संशयास्पद वापर

July 31, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!