• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 16, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

परंड्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; नशेत वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांसह ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त

admin by admin
June 16, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
परंड्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची मोठी कारवाई; नशेत वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांसह ५७ हजारांचा मुद्देमाल जप्त
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा: अवैधरित्या नशेत वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या एका इसमाविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, कृती छत्रपती संभाजीनगर विभाग (ANTF) यांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत ५७,२०० रुपये किमतीचा अवैध अंमली पदार्थ (नशेच्या गोळ्या) आणि मोबाईल जप्त करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १५ जून २०२६ रोजी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सला गुप्त बातमीदारामार्फत एक विश्वासू माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने दोन पंच आणि अन्न व औषध प्रशासन (FDA) निरीक्षकांसह परंडा शहरातील शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागे सापळा रचला. बातमीची खात्री करून तेथे आलेल्या शाहीद सादीक शेख (वय ३९ वर्ष, रा. परंडा, जि. धाराशीव) याला सायंकाळी १७.०० वाजताच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले.

नशेच्या गोळ्या आणि मुद्देमाल जप्त

पंचांसमक्ष आरोपीची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे खालील प्रतिबंधित औषधे आणि मुद्देमाल मिळून आला:

१) Niteor-10 (Nitrazepam घटक): १५ गोळ्या (किंमत ₹६,०००/-)

२) Nizascen-10 (Nitrazepam घटक): १० गोळ्या (किंमत ₹४,०००/-)

३) Anzilum 0.5 (Alprazolam घटक): ९३ गोळ्या (किंमत ₹३७,२००/-)

४) नशेच्या गोळ्यांच्या विक्रीसाठी वापरण्यात येणारा एक ‘विवो’ (Vivo) कंपनीचा मोबाईल.

असा एकूण ५७,२०० रुपये किमतीचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी हा या गोळ्यांची विक्री करण्याच्या उद्देशाने त्या बाळगत असताना रंगेहात पकडला गेला.

गुन्हा दाखल

पोलीस निरीक्षक गीता बागवडे (ANTF) यांनी पंचांसमक्ष हा सर्व मुद्देमाल जप्त केला आणि आरोपीला परंडा पोलीस ठाण्यात हजर केले. सफौ/ वाहेद मुल्ला यांनी दिलेल्या तक्रारीवरून परंडा पोलीस ठाण्यात आरोपी शाहीद सादीक शेख याच्याविरुद्ध गुरन-३९०/२०२६, कलम 8(C), 22(A), NDPS Act सहकलम १८(क) औषधी व सौंदर्य प्रसाधने कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाई करणारे पथक

सदर यशस्वी कारवाई अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे पोलीस महानिरीक्षक श्रीमती ज्योतीप्रिया सिंह मॅडम, पोलीस अधीक्षक अजीत टिके , डि.वाय.एस.पी.साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत पोलीस निरीक्षक श्रीमती गीता बागवडे, पोलीस उप-निरीक्षक प्रदीप ठाकूर, सपोउपनि वाहेद मुल्ला, हनुमान पुरके, हवालदार सुरेश राऊत, नागेश केंद्रे, निलेश सरपाळे, हरीशचंद्र मुंडे आणि ज्योती किर्तीकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Previous Post

तुळजापूरचे पोलीस प्रशासन की गुन्हेगारांचे अभयस्थान?

Next Post

तुळजाभवानी मंदिर संस्थानातील सिक्युरिटी कंपन्यांच्या गैरव्यवहाराविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा

Next Post
तुळजाभवानी मंदिर संस्थानातील सिक्युरिटी कंपन्यांच्या गैरव्यवहाराविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा

तुळजाभवानी मंदिर संस्थानातील सिक्युरिटी कंपन्यांच्या गैरव्यवहाराविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास

September 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली

September 16, 2026

Recent Posts

  • दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास
  • जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल
  • धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद
  • तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!