• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, June 18, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘पैसे काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला घातला गंडा! मोदाणी बिल्डिंगसमोरील SBI ATM मध्ये हातचलाकी; ७८ हजार लंपास

admin by admin
June 18, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा
0
SHARES
162
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: “तुम्हाला पैसे काढून देतो,” अशी खोटी मदत करण्याचा बहाणा करून एका भामट्याने ज्येष्ठ नागरिकाचे एटीएम कार्ड बदलून तब्बल ७८ हजार रुपयांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना धाराशिवमध्ये समोर आली आहे. याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मदतीचा बहाणा अन् हातचलाकी

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र संभाजी उंबरे (वय ६५ वर्षे, रा. वानेवाडी, ता. जि. धाराशिव) हे ८ जून २०२६ रोजी दुपारी १:४५ ते ९ जून २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास धाराशिव येथील मोदाणी बिल्डिंगसमोरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. वयस्कर असल्याने त्यांना पैसे काढण्यात अडचण येत असल्याचे पाहून तिथं उभ्या असलेल्या एका अज्ञात व्यक्तीने, “तुम्हाला पैसे काढून देतो,” असे म्हणत त्यांचा विश्वास संपादन केला.

पैसे काढण्याच्या नादात या भामट्याने उंबरे यांच्या एटीएमचा पिन नंबर चोरून पाहिला. त्यानंतर अत्यंत शिताफीने आणि हातचलाकी करून राजेंद्र उंबरे यांचे मूळ एटीएम कार्ड स्वतःकडे ठेवून घेतले आणि त्यांना भलतेच दुसरे हुबेहूब दिसणारे एटीएम कार्ड हातावर टेकवले.

बँक खात्यातून ७८ हजार गायब!

उंबरे एटीएममधून बाहेर पडल्यानंतर, त्या भामट्याने त्यांच्या खऱ्या एटीएम कार्डचा आणि पिन नंबरचा वापर करून उंबरे यांच्या बँक खात्यातून तब्बल ७८,००० रुपये काढून घेतले. खात्यातून पैसे वजा झाल्याचा मेसेज आल्यानंतर आणि कार्ड बदलल्याचे लक्षात आल्यानंतर उंबरे यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले.

आनंदनगर पोलिसात गुन्हा दाखल

याप्रकरणी फसवणूक झालेल्या राजेंद्र उंबरे यांनी १७ जून २०२६ रोजी आनंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या प्रथम खबरीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८(४) अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आता एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या भामट्याचा शोध घेत आहेत.

‘धाराशिव लाइव्ह’चे आवाहन: एटीएम सेंटरमध्ये किंवा बँकेत अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. आपले एटीएम कार्ड आणि पिन नंबर कधीही कोणाला शेअर करू नका. मदत हवी असल्यास केवळ बँक कर्मचाऱ्यांचीच मदत घ्या.

Previous Post

कत्तलखान्याकडे जाणारे ९ गोवंश वाचवले! भूमच्या हाडळ परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचा छापा

Next Post

“आमची बहीण कुठेय सांग!”… भररस्त्यातून तरुणाचे अपहरण करत बीडच्या ‘त्या’ कुटुंबाने काठीने झोडपले; लोहारा पोलिसांत गुन्हा दाखल

Next Post
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

"आमची बहीण कुठेय सांग!"... भररस्त्यातून तरुणाचे अपहरण करत बीडच्या 'त्या' कुटुंबाने काठीने झोडपले; लोहारा पोलिसांत गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

ओमराजेंना ‘Y+’ सुरक्षा; २० जूनला मोठी घोषणा

ओमराजेंना ‘Y+’ सुरक्षा; २० जूनला मोठी घोषणा

June 18, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांचा ‘अ‍ॅक्शन मोड’! उमरगा, नळदुर्ग अन् येरमाळ्यात तलवारी आणि कोयत्यासह तिघे गजाआड; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन

June 18, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

पंढरपूरचे माऊली उमरग्यात लुटले! एसटी बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन वृद्धाच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास

June 18, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

“आमची बहीण कुठेय सांग!”… भररस्त्यातून तरुणाचे अपहरण करत बीडच्या ‘त्या’ कुटुंबाने काठीने झोडपले; लोहारा पोलिसांत गुन्हा दाखल

June 18, 2026
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

‘पैसे काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला घातला गंडा! मोदाणी बिल्डिंगसमोरील SBI ATM मध्ये हातचलाकी; ७८ हजार लंपास

June 18, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group