• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, August 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

“आमची बहीण कुठेय सांग!”… भररस्त्यातून तरुणाचे अपहरण करत बीडच्या ‘त्या’ कुटुंबाने काठीने झोडपले; लोहारा पोलिसांत गुन्हा दाखल

admin by admin
June 18, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

लोहारा: “आमची बहीण कुठे आहे, तिचा पत्ता सांग,” असे म्हणत बीड जिल्ह्यातील एका कुटुंबाने अन्य ५ अनोळखी साथीदारांसह लोहारा येथील एका तरुणाला बेदम मारहाण करत त्याचे भररस्त्यातून बळजबरीने गाडीत घालून अपहरण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरदुपारी सास्तूर येथे घडले नाट्य

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, योगेश विनायक बारकुल (वय ३७ वर्षे, रा. लोहारा, ता. लोहारा, जि. धाराशिव) हे बुधवारी (१७ जून २०२६) दुपारी ३:०० वाजण्याच्या सुमारास सास्तूर येथील काकासाहेब गायकवाड यांच्या घरासमोरून जात होते. त्याचवेळी बीड जिल्ह्यातील परळी येथून आलेल्या काही जणांनी त्यांना रस्त्यात गाठले.

गैरकायद्याची मंडळी जमवून जीवघेणा हल्ला

आरोपी गफार रजाक शेख, रौफ rजाक शेख, रहीम रजाक शेख, रहीमुन बागवान शेख (सर्व रा. परळी, ता. परळी, जि. बीड) आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर ५ अनोळखी इसमांनी बेकायदेशीर टोळी जमवून योगेश बारकुल यांना घेरले. “आमची बहीण कुठे आहे, तिचा पत्ता सांग,” अशी विचारणा करत त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केली.

योगेश यांनी नकार देताच आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता या टोळीने योगेश यांना बळजबरीने स्वतःच्या गाडीत कोंबले आणि त्यांचे अपहरण करून पळवून नेले. या मारहाणीत योगेश गंभीर जखमी झाले असून, आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.

लोहारा पोलिसांत गुन्हा दाखल

अपहरणाच्या या थरारक प्रकारानंतर जखमी योगेश बारकुल यांनी १७ जून रोजीच लोहारा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यांच्या प्रथम खबरीवरून पोलिसांनी परळीच्या शेख कुटुंबातील ४ नामजद आणि ५ अज्ञात अशा एकूण ९ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४०(४) (अपहरण), ११८(१), १८९(१), १८९(२), १९०, ३५१(२), आणि ३५१(३) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. बीडच्या या कुटुंबाने लोहारामध्ये येऊन तरुणाचे अपहरण केल्यामुळे परिसरात सध्या मोठी खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Previous Post

‘पैसे काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला घातला गंडा! मोदाणी बिल्डिंगसमोरील SBI ATM मध्ये हातचलाकी; ७८ हजार लंपास

Next Post

पंढरपूरचे माऊली उमरग्यात लुटले! एसटी बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन वृद्धाच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

पंढरपूरचे माऊली उमरग्यात लुटले! एसटी बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन वृद्धाच्या गळ्यातील सोन्याची चैन लंपास

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये ‘एमडी’ ड्रग्सची विक्री करणारे दोघे जेरबंद

धाराशिवमध्ये ‘एमडी’ ड्रग्सची विक्री करणारे दोघे जेरबंद

August 4, 2026
लाईव्ह बुलेटिनमध्ये ताईंची ‘पॉवर नॅप’, पण नेटकरी म्हणाले – ताई, तुम्ही बिंधास्त झोपा!” 😴📺

लाईव्ह बुलेटिनमध्ये ताईंची ‘पॉवर नॅप’, पण नेटकरी म्हणाले – ताई, तुम्ही बिंधास्त झोपा!” 😴📺

August 4, 2026
धाराशिव भाजपचे ‘कुरुक्षेत्र’: कमळाच्या बागेत ‘प्रायव्हेट लिमिटेड’चा राडा!

‘पेड’ ट्रोलिंगची फौज आणि दुसऱ्याच्या ‘सातबाऱ्यावर’ मालकीचा डाव!

August 4, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

वाशी तालुक्यात थरार! बोरी पाटी-कन्हेरवाडी रस्त्यावर दरोड्याच्या तयारीत असलेले ८ दरोडेखोर गजाआड

August 3, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

घुगी येथे जुन्या वादातून दोन गटात राडा! लोखंडी पाईप अन् सळईने बेदम मारहाण

August 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!