• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 19, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये ‘एमडी’ ड्रग्सची विक्री करणारे दोघे जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कळंबमध्ये मोठी कारवाई, ११.२१ ग्रॅम एमडी जप्त

admin by admin
August 4, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये ‘एमडी’ ड्रग्सची विक्री करणारे दोघे जेरबंद
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब: धाराशिव जिल्ह्यात तरुण पिढीला नशेच्या खाईत ढकलणाऱ्या ‘एमडी’ (मेफेड्रोन) या अत्यंत घातक अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) बेड्या ठोकल्या आहेत. कळंब शहरालगत सोमवारी (३ ऑगस्ट) पोलिसांनी ही धडक कारवाई केली असून, संशयितांकडून ११.२१ ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार (NDPS) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निखिल जाधव आणि अरविंद कांबळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

गेल्या काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात एमडी या अमली पदार्थाची तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळत होती. या गंभीर प्रकारामुळे तरुण पिढी नशेच्या आहारी जात असल्याचे निदर्शनास आल्याने, जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या प्रकरणाची गोपनीय माहिती काढून कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

सापळा रचून ‘एलसीबी’ने आवळल्या मुसक्या

या सूचनेनुसार, ३ ऑगस्ट २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार आणि त्यांचे पथक कळंब पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, आरोपी निखिल जाधव आणि अरविंद कांबळे हे कळंब-येरमाळा रोडवरील पाझर तलावाजवळ ‘एमडी’ ड्रग्स विक्रीसाठी घेऊन येणार आहेत.

ही विश्वसनीय माहिती मिळताच पोलिसांनी एनडीपीएस (NDPS) कायद्यातील तरतुदींचे तंतोतंत पालन करत, पंचांसह आणि फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी सापळा रचला. रस्त्याच्या कडेला दुचाकी लावून संशयितरीत्या उभे असलेल्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.

२९ प्लास्टिक पुड्यांमध्ये सापडले ‘एमडी’ ड्रग्स

पंचांसमक्ष आरोपींची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे २९ पारदर्शक प्लास्टिकच्या पुड्यांमध्ये भरलेली एकूण ११.२१ ग्रॅम पांढऱ्या रंगाची स्फटिक स्वरूपातील ‘एमडी’ (मेफेड्रोन) पावडर आढळून आली. अमली पदार्थ जप्त करून पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या.

याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२६/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा कलम ८(क) आणि २२(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक  सचिन पांडकर आणि पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक खटके (स्था.गु.शा.), सहाय्यक पोलीस निरीक्षक मगर (कळंब पो.स्टे.) तसेच पोलीस अंमलदार राठोड (३९७), जानराव (३२७), गादेकर (१४३१), जाधवर (१४७९), चौरे (५८४), जाधवर (१६११), ढगारे (१६३१), मुंगळे (१८९३), शेख (८४), माळवे (१८३६), बोईनवाड (५८३), आरब (१२४८) आणि माने (१३४४) यांनी या यशस्वी कामगिरीत सहभाग घेतला.

Previous Post

लाईव्ह बुलेटिनमध्ये ताईंची ‘पॉवर नॅप’, पण नेटकरी म्हणाले – ताई, तुम्ही बिंधास्त झोपा!” 😴📺

Next Post

तुळजापूर तालुक्यातील दिंडेगाव येथे जुन्या वादातून राडा!

Next Post
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर तालुक्यातील दिंडेगाव येथे जुन्या वादातून राडा!

ताज्या बातम्या

‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

September 19, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी

September 19, 2026
भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले

भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले

September 19, 2026
तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!

तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!

September 19, 2026
ऐन महालक्ष्मी सणाच्या रात्री धाराशिवमध्ये ‘दडपशाही’! जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटलांच्या हट्टापायी ४० वर्षांचा रस्ता रोखण्यासाठी मध्यरात्री उभारली भिंत

ऐन महालक्ष्मी सणाच्या रात्री धाराशिवमध्ये ‘दडपशाही’! जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटलांच्या हट्टापायी ४० वर्षांचा रस्ता रोखण्यासाठी मध्यरात्री उभारली भिंत

September 19, 2026

Recent Posts

  • ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!
  • उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी
  • भाटसांगवी पाटीजवळ स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसासह एकास रंगेहात पकडले
  • तेरखेडा फटाका उद्योगाला दणका; ‘भवानी फायर वर्क्स’चे उत्पादन जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत बंद!
  • ऐन महालक्ष्मी सणाच्या रात्री धाराशिवमध्ये ‘दडपशाही’! जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटलांच्या हट्टापायी ४० वर्षांचा रस्ता रोखण्यासाठी मध्यरात्री उभारली भिंत
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!