वाशी :आरोपी नामे-1) दत्तात्रय शिवाजी गोरे, 2) बाजीराव लक्ष्मण मोरे, 3) पृथ्वीराज आण्णा मोरे, 4) श्रिनिवास सागर मोरे, 5) मुन्ना अंकुश मोरे, 6) सुनिल श्रीमंत नांगरे, 7) बापूराव अंकुश मोरे सर्व रा. सारोळा ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि. 19.02.2024 रोजी 22.00 वा. सु. सारोळा येथील चौकात फिर्यादी नामे- आकाश राजेंद्र उकरंडे, वय 24 वर्षे, रा. तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी विना कारण गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, फायबरच्या पाईपने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- आकाश उकरंडे यांनी दि.20.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर :फिर्यादी नामे-1)जिवीत हरिदनाथ शेट्टी, वय 44 वर्षे, रा. येरलापट्टी ता. कारलाका जि. उडपी ह.मु. श्रीनाथ मंगल कार्यालय पाठीमागे तुळजापूर हे दि. 19.02.2024 रोजी 23.05 वा. सु. वडगाव लाख शिवार गट नं 53 व 54 जे.एस. डब्ल्यु डोल्वी कंपीनचे पवनचक्कीचे लोकेशन क्र 636 चे काम करत असताना अज्ञात कारणावरुन अज्ञात इसमांनी गैरकायद्याची मंडळी जमवून तोंडाला लाल व भगवे रुमाला बांधुन कंपनीचे कर्मचाऱ्यारी व फिर्यादी यांना दगड, काठी, रॉडने मारहाण करुन जखमी केले. लोकेशन क्र 636 चे आवारात उभी असलेली टाटा व्हॅन व मोटरसायकल चे काच फोडून अंदाजे 27,000₹ चे नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- जिवीत शेट्टी यांनी दि.20.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 324, 427, 143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा :आरोपी नामे-1)प्रशांत पुरतले, 2) गुराण्णा लक्ष्मण तडकल, 3) संतोष पुरातले सर्व रा. काळे प्लॉट उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव अनोळखी दोन इसम यांनी दि. 20.02.2024 रोजी 20.30 वा. सु. काळे प्लॉट उमरगा येथे फिर्यादी नामे- रितेश परमेश्वर उसके, वय 21 वर्षे, रा. काळे प्लॉट उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मोटरसायकल सावकास चालवा असे बोलण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,लोखंडी कत्तीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रितेश उसके यांनी दि.20.02.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 324, 143, 147, 148, 149, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.