• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, September 25, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या दरोडेखोरांवर स्थानिक गुन्हे शाखेचा ‘सर्जिकल स्ट्राईक

दोन प्रमुख आरोपींना बेड्या, दहा निष्पन्न

admin by admin
August 10, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या दरोडेखोरांवर स्थानिक गुन्हे शाखेचा ‘सर्जिकल स्ट्राईक
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांवर दगडफेक करून घटनास्थळावरून पसार झालेल्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या या कारवाईत दोन प्रमुख आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या सखोल चौकशीत या गुन्ह्यात सामील असलेले एकूण १० आरोपी निष्पन्न झाले आहेत.

दिनांक २ ऑगस्ट २०२६ रोजी काही आरोपी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक कारवाईसाठी गेले होते. मात्र, पोलिसांना पाहून आरोपींनी त्यांच्यावर दगडफेक केली आणि ते अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, तेथे आरोपींनी दरोडा टाकण्यासाठी आणलेले साहित्य आढळून आले. या गंभीर घटनेप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक २८३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१०(४), ३१० (५), १२१ आणि ३२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेनंतर आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे गतिमान केली. मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने दिनांक ९ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) कासार आणि त्यांचे पथक पेट्रोलिंग करत होते. यादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी शिवारात सापळा रचला आणि रामा उर्फ बेल्या शंकर काळे (वय २३) व सरदार शंकर काळे (वय २८, दोघेही रा. कन्हेरवाडी, ता. कळंब) या दोन प्रमुख आरोपींना ताब्यात घेतले.
या दोन्ही आरोपींकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी आपल्या इतर साथीदारांसोबत मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली. या तपासात गुन्ह्यातील एकूण १० आरोपी निष्पन्न झाले आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करून, आवश्यक अहवालासह त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी वाशी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.

ही उल्लेखनीय कारवाई धाराशिवच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर आणि अप्पर पोलीस अधीक्षक  सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  विनोद इज्जपवार, सपोनि. सुदर्शन कासार, पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, फरहान पठाण, तसेच चालक पोलीस हवालदार नागनाथ गुरव आणि रत्नदीप डोंगरे यांच्या पथकाने संयुक्तरीत्या ही कारवाई यशस्वी केली.

 

Previous Post

२४० कोटींचा नवा ‘महाल’, १४ कोटींचे थकीत भाडे आणि मोक्याच्या जागेवर बांधा-वापरा-हडपा (BOT) चा डाव!

Next Post

येरमाळा उड्डाणपुलावर धावत्या ट्रॅव्हल्सवर चढून ९६ हजारांचे सोने लंपास!

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

येरमाळा उड्डाणपुलावर धावत्या ट्रॅव्हल्सवर चढून ९६ हजारांचे सोने लंपास!

ताज्या बातम्या

उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

गणेशोत्सवात शांतता राखण्यासाठी धाराशिव पोलिसांचा दणका; ५ ठाण्यांतील १२४ सराईत गुन्हेगारांना तालुक्यांतून हद्दपारीचे आदेश

September 24, 2026
‘माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना करमतच नाही’; ओमराजेंचा राणा पाटलांवर थेट हल्लाबोल!

‘माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना करमतच नाही’; ओमराजेंचा राणा पाटलांवर थेट हल्लाबोल!

September 24, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

“एकदा जनतेतून निवडणूक लढवा, मग स्वतःची लायकी कळेल!”; ओमराजेंचा दानवेंना पलटवार

September 24, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

लोहारा खुर्द येथे थरार : घर व शेती विकण्याच्या वादातून पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या; स्वतःच्याही पोटात खुपसली सुरी

September 24, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

कडोदरा-व्हंताळा रोड : पिकअपमधून गोवंशाची अवैध वाहतूक उमरगा पोलिसांनी पकडली

September 24, 2026

Recent Posts

  • गणेशोत्सवात शांतता राखण्यासाठी धाराशिव पोलिसांचा दणका; ५ ठाण्यांतील १२४ सराईत गुन्हेगारांना तालुक्यांतून हद्दपारीचे आदेश
  • ‘माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना करमतच नाही’; ओमराजेंचा राणा पाटलांवर थेट हल्लाबोल!
  • “एकदा जनतेतून निवडणूक लढवा, मग स्वतःची लायकी कळेल!”; ओमराजेंचा दानवेंना पलटवार
  • लोहारा खुर्द येथे थरार : घर व शेती विकण्याच्या वादातून पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या; स्वतःच्याही पोटात खुपसली सुरी
  • कडोदरा-व्हंताळा रोड : पिकअपमधून गोवंशाची अवैध वाहतूक उमरगा पोलिसांनी पकडली
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!