• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 26, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

पीएम-किसान योजनेची कट-ऑफ डेट शिथिल करा; खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकरांची लोकसभेत सरकारकडे मागणी

admin by admin
August 11, 2026
in शेती - शेतकरी
Reading Time: 1 min read
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It
नवी दिल्ली |  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत १ फेब्रुवारी २०१९ नंतर कुटुंब विभाजन किंवा जमिनीच्या वाटणीमुळे स्वतंत्र भूधारक झालेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याचा महत्त्वपूर्ण मुद्दा धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आज लोकसभेत उपस्थित केला. कोणत्याही तांत्रिक कारणास्तव पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नयेत, यासाठी पात्रतेची अंतिम तारीख शिथिल करण्याची आग्रही मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
खा. राजेनिंबाळकर यांनी लोकसभेत विचारले की, १ जानेवारी २०१९ नंतर वारसा हक्क, कुटुंब विभाजन अथवा जमिनीच्या फेरवाटपामुळे स्वतंत्र खातेदार झालेले अनेक पात्र शेतकरी पीएम-किसानच्या लाभापासून वंचित आहेत काय? तसेच, अशा वंचित शेतकऱ्यांची राज्यनिहाय आकडेवारी किती आहे आणि त्यांना सामावून घेण्यासाठी सरकार पात्रतेच्या तारखेत शिथिलता आणणार का?

सरकारचे स्पष्टीकरण: कट-ऑफ डेट बदलणार नाही

या प्रश्नावर उत्तर देताना कृषी व किसान कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी स्पष्ट केले की, पीएम-किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार लाभार्थ्यांची पात्रता निश्चित करण्याची अंतिम तारीख १ फेब्रुवारी २०१९ हीच आहे. सध्या ही तारीख शिथिल करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही विचार किंवा तसा प्रस्ताव नाही. त्यामुळे या तारखेनंतर स्वतंत्र झालेल्या शेतकऱ्यांना सामावून घेण्याबाबत किंवा त्यांना थकबाकीसह लाभ देण्याबाबत सध्या कोणतीही अतिरिक्त तरतूद नाही.
वारसदारांसाठी मात्र अपवाद:
सरकारने यावेळी एक महत्त्वाची माहिती दिली. जर १ फेब्रुवारी २०१९ नंतर मूळ भूधारकाचा (जमीन मालकाचा) मृत्यू झाला असेल आणि वारसाहक्काने जमिनीची मालकी बदलली असेल, तर ते वारसदार योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरू शकतात; मात्र त्यासाठी त्यांनी योजनेचे इतर सर्व निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

योजनेसाठी आवश्यक अटी

पीएम-किसान योजनेचा लाभ थेट आणि पारदर्शक पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी काही अटी अनिवार्य करण्यात आल्याचे सरकारने सांगितले:
  • लँड सीडिंग (भूमी अभिलेख जोडणी)
  • आधार-बँक खाते लिंकिंग
  • ई-केवायसी (e-KYC)
पात्र शेतकऱ्यांनी या अनिवार्य अटी पूर्ण करून त्यांची माहिती सत्यापित करणे आवश्यक आहे. तसेच, लाभार्थ्यांची नोंदणी व माहितीची पडताळणी करण्याची सर्वस्वी जबाबदारी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांवर सोपविण्यात आल्याचेही कृषी मंत्रालयाने स्पष्ट केले.

खा. राजेनिंबाळकरांची ठाम मागणी

सरकारच्या या उत्तरातून कट-ऑफ डेट बदलणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी अटींमध्ये सुधारणा करण्याची मागणी केली. “कुटुंब विभाजन, वारसा आणि जमिनीच्या फेरवाटपामुळे स्वतंत्र भूधारक झालेल्या ग्रामीण भागातील पात्र शेतकऱ्यांना केवळ तांत्रिक किंवा प्रक्रियात्मक कारणांमुळे शासकीय योजनांपासून वंचित ठेवणे अन्यायकारक आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यावर सकारात्मक निर्णय घ्यावा,” अशी ठाम भूमिका खा. राजेनिंबाळकर यांनी संसदेत मांडली.
Previous Post

धाराशिवमध्ये ‘खड्डे’ दर्शन: ५ वर्षांपासून पालिकेचा ‘डीपीआर’ गायब, तर आमदारांचे ‘आश्वासन’ फक्त स्क्रीनशॉटवरच!

Next Post

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

Next Post
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

ताज्या बातम्या

‘माझं नाव घेतल्याशिवाय त्यांना करमतच नाही’; ओमराजेंचा राणा पाटलांवर थेट हल्लाबोल!

गाडीत शेजारी बसून लाचारीचा आव, पाठीमागे मात्र काळ्या पैशातून पुत्राची ‘ट्रोल गँग’; राणा पाटलांचा मुखवटा ओमराजेंनी टराटरा फाडला!

September 26, 2026
टेबलावरचे ‘सोयाबीन’, शेतकऱ्यांना धक्के अन् साहेबांचे ४० हजारांचे नवे ‘विमा’ गाजर!

टेबलावरचे ‘सोयाबीन’, शेतकऱ्यांना धक्के अन् साहेबांचे ४० हजारांचे नवे ‘विमा’ गाजर!

September 26, 2026
ज्ञानाच्या देवतेला बकऱ्यांचा नैवेद्य! नवसाची ‘सटवाई’ निघाली साक्षात ‘सरस्वती’

ज्ञानाच्या देवतेला बकऱ्यांचा नैवेद्य! नवसाची ‘सटवाई’ निघाली साक्षात ‘सरस्वती’

September 26, 2026
धाराशिव: मांडवा येथे मध्यरात्री पोलिसांची धाडसी कारवाई; १७ लाखांच्या मुद्देमालासह २२ जुगारी गजाआड

धाराशिव: मांडवा येथे मध्यरात्री पोलिसांची धाडसी कारवाई; १७ लाखांच्या मुद्देमालासह २२ जुगारी गजाआड

September 25, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

गणेशोत्सवात शांतता राखण्यासाठी धाराशिव पोलिसांचा दणका; ५ ठाण्यांतील १२४ सराईत गुन्हेगारांना तालुक्यांतून हद्दपारीचे आदेश

September 24, 2026

Recent Posts

  • गाडीत शेजारी बसून लाचारीचा आव, पाठीमागे मात्र काळ्या पैशातून पुत्राची ‘ट्रोल गँग’; राणा पाटलांचा मुखवटा ओमराजेंनी टराटरा फाडला!
  • टेबलावरचे ‘सोयाबीन’, शेतकऱ्यांना धक्के अन् साहेबांचे ४० हजारांचे नवे ‘विमा’ गाजर!
  • ज्ञानाच्या देवतेला बकऱ्यांचा नैवेद्य! नवसाची ‘सटवाई’ निघाली साक्षात ‘सरस्वती’
  • धाराशिव: मांडवा येथे मध्यरात्री पोलिसांची धाडसी कारवाई; १७ लाखांच्या मुद्देमालासह २२ जुगारी गजाआड
  • गणेशोत्सवात शांतता राखण्यासाठी धाराशिव पोलिसांचा दणका; ५ ठाण्यांतील १२४ सराईत गुन्हेगारांना तालुक्यांतून हद्दपारीचे आदेश
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!