• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 29, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

पोलीस ठाण्यात टिप्पर जप्त असताना दुसऱ्या दिवशी भरला टॅक्स!

धाराशिव आरटीओचा 'मॅनेजिंग' प्रताप चव्हाट्यावर

admin by admin
August 13, 2026
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये भरधाव टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू;
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव :  शहरातील बायपास रोडवर ५ ऑगस्ट रोजी एका ५२ वर्षीय दुचाकीस्वाराला चिरडणाऱ्या अवैध टिप्पर (MH 25 U 1107) प्रकरणात प्रशासनाच्या भ्रष्टाचाराचा एक भयानक नमुना समोर आला आहे. अपघात घडल्या दिवशीच पोलिसांनी हा टिप्पर जप्त करून शहर पोलीस ठाण्याच्या आवारात लावला होता. मात्र, अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, गाडी पोलिसांच्या ताब्यात असतानाच दुसऱ्या दिवशी (६ ऑगस्ट रोजी) या गाडीचा आरटीओ टॅक्स भरण्यात आला आहे! गाडी समोर नसताना आणि गाडीचा इन्शुरन्स (विमा) नसताना आरटीओने ही पावती फाडलीच कशी? असा संतापजनक सवाल आता उपस्थित होत आहे.

या संपूर्ण प्रकरणावरून टिप्पर मालकाने आरटीओ अधिकाऱ्यांचे खिसे गरम करून हे प्रकरण ‘मॅनेज’ केल्याचे उघड झाले आहे.

काय आहेत हे अनुत्तरित आणि गंभीर प्रश्न?

१. पोलीस ठाण्यात गाडी, मग टॅक्स भरला कसा?

पाच ऑगस्ट रोजी अपघात झाल्यानंतर शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अपघातग्रस्त टिप्पर पोलीस स्टेशनच्या आवारात जप्त करून ठेवला. वाहन पोलिसांच्या ताब्यात असताना त्याच्या कायदेशीर कागदपत्रांमध्ये कोणताही फेरफार करता येत नाही. तरीही ६ ऑगस्ट रोजी या गाडीचा आरटीओ (RTO) टॅक्स भरला गेला. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात असलेल्या गाडीचा टॅक्स रातोरात भरण्याची हिंमत मालकाने केलीच कशी आणि त्याला आरटीओने साथ कशी दिली?

२. गाडी समोर नसताना पावती दिली कुणी?
कोणत्याही व्यावसायिक वाहनाचा थकीत टॅक्स किंवा इतर प्रक्रिया पूर्ण करताना वाहन निरीक्षकांकडून (RTO Inspector) त्याची प्राथमिक पडताळणी होणे अपेक्षित असते. गाडी पोलीस स्टेशनमध्ये उभी असताना आरटीओ अधिकाऱ्यांनी कोणती गाडी पाहून ही टॅक्सची पावती दिली? की कार्यालयात बसूनच अंधारात कारभार हाकला गेला?

३. इन्शुरन्स नसताना टॅक्स कसा स्वीकारला?
सर्वात मोठा तांत्रिक आणि कायदेशीर प्रश्न म्हणजे, या टिप्परचा पीयुसी (PUC) संपलेला होता आणि गाडीचा वैध विमा (Insurance) देखील नव्हता. नियमानुसार, इन्शुरन्स नसताना वाहनाचा टॅक्स भरून घेतला जाऊ शकत नाही. असे असताना आरटीओने नियम धाब्यावर बसवून टॅक्सची रक्कम कशी स्वीकारली? सिस्टीममध्ये ही एंट्री कशी झाली?

‘अर्थपूर्ण’ तडजोड आणि धाराशिव आरटीओमधील भ्रष्टाचाराची कीड
टिप्पर मालकाने स्वतःला वाचवण्यासाठी आणि कागदपत्रांमधील गंभीर त्रुटी लपवण्यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांना मोठी रक्कम देऊन हे संपूर्ण प्रकरण ‘मॅनेज’ केल्याचा थेट आरोप आता होत आहे. धाराशिव आरटीओ कार्यालयाच्या भ्रष्ट कारभाराबद्दल यापूर्वीही अनेक तक्रारी दाखल आहेत. मात्र, एका निष्पाप माणसाचा बळी गेल्यानंतरही गुन्हेगाराला वाचवण्यासाठी कागदपत्रांची अशी बेकायदेशीर जुळवाजुळव करण्यास आरटीओ अधिकारी मदत करत असतील, तर सामान्य जनतेने न्याय मागायचा कुणाकडे?

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीची गरज:
अपघातानंतरची ही ‘बनवाबनवी’ आता पुराव्यांसहित समोर आली आहे. या प्रकरणात केवळ टिप्पर मालकच नव्हे, तर बेकायदेशीररित्या टॅक्सची पावती फाडून देणारे आरटीओ अधिकारीही तितकेच दोषी आहेत. राज्याच्या परिवहन आयुक्तांनी आणि पोलीस अधीक्षकांनी या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी संतप्त मागणी धाराशिवकरांमधून होत आहे.

Previous Post

‘माऊली’ परतल्या, सभा गाजली! ‘प्रमोशन’च्या बाजाराला अखेर स्थगिती; पण शिक्षणाधिकाऱ्यांच्या ५-७ लाखांच्या ‘खोक्यां’चे काय?

Next Post

धाराशिव – ढोकीमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

Next Post
धाराशिव – ढोकीमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

धाराशिव - ढोकीमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

ताज्या बातम्या

तेरणाची राखरांगोळी, लाटलेल्या जमिनी अन् आता ‘हावरगाव’मध्ये शेतकऱ्यांची बुडवलेली बिले!

तेरणाची राखरांगोळी, लाटलेल्या जमिनी अन् आता ‘हावरगाव’मध्ये शेतकऱ्यांची बुडवलेली बिले!

September 29, 2026
भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांच्या DDN साखर कारखान्याविरोधात संतापाचा भडका

भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांच्या DDN साखर कारखान्याविरोधात संतापाचा भडका

September 29, 2026
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात ‘जनता दरबार’ सुरू, नागरिकांना थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधता येणार

‘कागदावर नाकाबंदी, शिवारात कोरडबंदी!’ — साहेब, चारा शिल्लकच नाही, मग निर्यात हवेत करणार का?

September 29, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

धुळे महामार्गावरील गरोदर नर्तिका हत्याकांडातील फरार जोडपे कळंब पोलिसांच्या जाळ्यात; पांढऱ्या मोबिलो कारसह दोघांना ठोकल्या बेड्या

September 28, 2026
धाराशिव जिल्ह्यात भीषण कोरडा दुष्काळ; हक्काच्या पीक विम्याचे कोट्यवधी रुपये अडकल्याने बळीराजा संकटात

धाराशिव जिल्ह्यात भीषण कोरडा दुष्काळ; हक्काच्या पीक विम्याचे कोट्यवधी रुपये अडकल्याने बळीराजा संकटात

September 27, 2026

Recent Posts

  • तेरणाची राखरांगोळी, लाटलेल्या जमिनी अन् आता ‘हावरगाव’मध्ये शेतकऱ्यांची बुडवलेली बिले!
  • भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांच्या DDN साखर कारखान्याविरोधात संतापाचा भडका
  • ‘कागदावर नाकाबंदी, शिवारात कोरडबंदी!’ — साहेब, चारा शिल्लकच नाही, मग निर्यात हवेत करणार का?
  • धुळे महामार्गावरील गरोदर नर्तिका हत्याकांडातील फरार जोडपे कळंब पोलिसांच्या जाळ्यात; पांढऱ्या मोबिलो कारसह दोघांना ठोकल्या बेड्या
  • धाराशिव जिल्ह्यात भीषण कोरडा दुष्काळ; हक्काच्या पीक विम्याचे कोट्यवधी रुपये अडकल्याने बळीराजा संकटात
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!