• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, August 14, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

भूम-वाशी पोलिसांची संयुक्त कारवाई; दोन पिकअपमधून 16.58 लाखांचा गुटखा जप्त

admin by admin
August 14, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

भूम : भूम व वाशी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत दोन पिकअप वाहनांमधून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले. या कारवाईत दोन वाहनांसह तब्बल 16 लाख 58 हजार 522 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

11 ऑगस्ट 2026 रोजी रात्री सुमारे 10 वाजता धाराशिव-बीड राष्ट्रीय महामार्गावरील दहिफळ शिवारातील विश्वजित ढाब्याच्या पाठीमागे दोन संशयित पिकअप वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये महिंद्रा बोलेरो पिकअप (MH-23-AU-5810) आणि अशोक लेलँड पिकअप (MH-14-EM-5173) या वाहनांचा समावेश होता.

तपासणीदरम्यान दोन्ही वाहनांमध्ये ‘गोवा १०००’ गुटखा, ‘केसरीयुक्त विमल पान मसाला’, ‘व्ही-१ सुगंधित तंबाखू’, ‘शॉट ९९९ सुगंधित तंबाखू’ आणि ‘डायरेक्टर स्पेशल पान मसाला’ यासह विविध प्रतिबंधित पदार्थ आढळून आले.

पोलिसांनी 6 लाख 58 हजार 523 रुपये किमतीचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ तसेच अंदाजे 10 लाख रुपये किमतीची दोन पिकअप वाहने असा एकूण 16 लाख 58 हजार 522 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी रोहित दिनेश फंदी (वय 25) यांच्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 269/2026 दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 123, 223, 274 व 275 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 मधील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

दोन्ही वाहनांमधून प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्रीच्या उद्देशाने वाहतूक केली जात असल्याचा प्राथमिक अंदाज असून, वाहनांचे अज्ञात चालक तसेच या अवैध वाहतुकीमागील व्यक्तींचा शोध सुरू आहे. ही कारवाई भूम व वाशी पोलीस ठाण्यांच्या पथकांनी संयुक्तपणे केली.

उमरग्यात किराणा दुकानातून प्रतिबंधित गुटखा जप्त; २,७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

उमरगा : उमरगा शहरात किराणा दुकानातून विक्रीसाठी जवळ बाळगलेला प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई १३ ऑगस्ट रोजी रात्री करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजार समितीसमोर एकोंडी रोड, उमरगा येथे अब्दुल्ला नावाचे किराणा दुकान आहे. या दुकानात महमद रशीद कवठेकर (वय ४५, रा. बाजार समितीसमोर, एकोंडी रोड, उमरगा) याने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी जवळ बाळगल्याचे आढळून आले.

पोलिसांच्या कारवाईत विमल पान मसाला, व्ही-१ तंबाखू, प्रिमियम आरएमडी पान मसाला आदी पदार्थांचा समावेश असून, त्यांची एकूण किंमत २ हजार ७०० रुपये आहे. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमाच्या कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उमरगा पोलीस करीत आहेत.

Previous Post

चिखलीत वर्गणीच्या १,५०० रुपयांवरून पाच जणांचा हल्ला; गॅरेजची तोडफोड

Next Post

रहदारीस धोकादायकरित्या वाहने उभी करणाऱ्यांवर गुन्हे; जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिसांची कारवाई

Next Post
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

रहदारीस धोकादायकरित्या वाहने उभी करणाऱ्यांवर गुन्हे; जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिसांची कारवाई

ताज्या बातम्या

एकट्याने शेती नाही, आता गटानेच प्रगती; कसगीच्या रेवणसिद्धेश्वर शेतकरी गटाची यशस्वी वाटचाल

एकट्याने शेती नाही, आता गटानेच प्रगती; कसगीच्या रेवणसिद्धेश्वर शेतकरी गटाची यशस्वी वाटचाल

August 14, 2026
तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेवरून सरनाईक-पाटील आमनेसामने; ‘ऑपरेशन टायगर’वरून आरोप-प्रत्यारोप

तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेवरून सरनाईक-पाटील आमनेसामने; ‘ऑपरेशन टायगर’वरून आरोप-प्रत्यारोप

August 14, 2026
धाराशिव: मध्यरात्री जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ९ जणांवर गुन्हा दाखल, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

गुळहल्ली शिवारात जुगार अड्ड्यावर छापा; 87 हजार 600 रुपये जप्त

August 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

रहदारीस धोकादायकरित्या वाहने उभी करणाऱ्यांवर गुन्हे; जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिसांची कारवाई

August 14, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

भूम-वाशी पोलिसांची संयुक्त कारवाई; दोन पिकअपमधून 16.58 लाखांचा गुटखा जप्त

August 14, 2026

Recent Posts

  • एकट्याने शेती नाही, आता गटानेच प्रगती; कसगीच्या रेवणसिद्धेश्वर शेतकरी गटाची यशस्वी वाटचाल
  • तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेवरून सरनाईक-पाटील आमनेसामने; ‘ऑपरेशन टायगर’वरून आरोप-प्रत्यारोप
  • गुळहल्ली शिवारात जुगार अड्ड्यावर छापा; 87 हजार 600 रुपये जप्त
  • रहदारीस धोकादायकरित्या वाहने उभी करणाऱ्यांवर गुन्हे; जिल्ह्यात विविध ठिकाणी पोलिसांची कारवाई
  • भूम-वाशी पोलिसांची संयुक्त कारवाई; दोन पिकअपमधून 16.58 लाखांचा गुटखा जप्त
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!