• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, October 20, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

 ‘भावी खासदारां’चा पालकमंत्र्यांसोबत ‘फोटो’ बॉम्ब; ओमराजेंना डिवचण्याचा डाव की ‘निधी’ची तडजोड?

धाराशिव 'कुरुक्षेत्र' नवा अंक: 21

admin by admin
September 2, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
 ‘भावी खासदारां’चा पालकमंत्र्यांसोबत ‘फोटो’ बॉम्ब; ओमराजेंना डिवचण्याचा डाव की ‘निधी’ची तडजोड?
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो, पण ‘फोटो’ मात्र बऱ्याच जणांचा गेम करतात! धाराशिवच्या राजकीय पटावर आतापर्यंत ‘नगरसेवक पळवापळवी’चा खेळ सुरू होता. पण ‘ऑपरेशन लोटस’ तोंडावर आपटल्यानंतर आता साहेबांच्या (राणा पाटील) गोटातून ‘फोटो-सेशन पॉलिटिक्स’ सुरू झाले आहे. या नव्या खेळाचे टार्गेट दुसरे तिसरे कुणी नसून, थेट साहेबांचे कट्टर राजकीय वैरी आणि नुकतेच शिंदे सेनेत आलेले खासदार ओमराजे निंबाळकर हे आहेत!

ओमराजे-सरनाईक ‘दोस्ताना’ अन् साहेबांची धाकधूक!

तुम्हाला आठवत असेलच, गेल्या वर्षी जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) ‘निधी वाटपावरून’ पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार राणा पाटील यांच्यात भयंकर जुंपली होती. नंतर नगरपालिकेच्या निवडणुकीत कसेबसे पॅचअप झाले. पण आता गेम बदललाय!

खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरे सेना सोडून शिंदे सेनेत (महायुतीत) एन्ट्री घेतल्यापासून, त्यांची आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची मैत्री भलतीच घट्ट झाली आहे. ओमराजे आणि सरनाईकांची ही वाढती जवळीक पाहून साहेबांच्या गोटात साहजिकच धाकधूक वाढली होती. पण साहेबांचे चिरंजीव तथा ‘भावी खासदार’ मल्हार पाटील आणि नगराध्यक्षा नेहा काकडे यांचे पती (नगरसेवक) राहुल काकडे यांनी अचानक एक ‘गुगली’ टाकली.

डिवचण्यासाठी ‘फोटो सेशन’ अन् विकासाच्या गप्पा!

केवळ ओमराजेंना डिवचण्यासाठी आणि “पालकमंत्री आमचेही कसे खास आहेत,” हे दाखवण्यासाठी मल्हार दादा आणि राहुल काकडे यांनी थेट मुंबई गाठली आणि प्रताप सरनाईकांची भेट घेतली. या भेटीनंतर सोशल मीडियावर एक भलीमोठी ‘पीआर’ (PR) पोस्ट टाकण्यात आली.

पोस्टमध्ये काय लिहिले होते?

“धाराशिवच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण भेट! शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता… यावर सकारात्मक चर्चा झाली. राज्य शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी दिली… आमदार राणा पाटील साहेब आणि मल्हार दादांच्या मार्गदर्शनाखाली… आपला राहुल काकडे!”

आता सामान्य जनतेला प्रश्न पडलाय की, या बंद दाराआडच्या भेटीत खरंच ‘विकासाची’ खिचडी शिजली? की फक्त ओमराजेंच्या डोळ्यांत धूळ फेकण्यासाठी आणि त्यांना ‘जळवण्यासाठी’ हा फोटो काढण्यात आला? कारण यामागे एक मोठा राजकीय ‘इगो’ लपलेला आहे!

‘ऑपरेशन लोटस’चा बदला: वेळ चव्हाणांची, बाजी ओमराजेंची!

या भेटीचे टायमिंग समजून घेणे महत्त्वाचे आहे. नुकतेच धाराशिव पालिकेतील ४ नगरसेवक भाजपमध्ये जाणार होते. मल्हार दादांनी त्यासाठी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून प्रवेशाची ‘वेळ आणि तारीख’ फिक्स केली होती. पण ऐनवेळी ओमराजेंनी अशी काही ‘फिल्डिंग’ लावली की ते ४ नगरसेवक थेट शिंदे सेनेत गेले!

प्रदेशाध्यक्षांचा वेळ घेऊनही नगरसेवक पळाले, यामुळे मल्हार दादा अक्षरशः तोंडावर पडले होते. हा अपमान धुवून काढण्यासाठी आणि “तुमचे नेते (सरनाईक) आमच्याच खिशात आहेत,” असा अप्रत्यक्ष मेसेज ओमराजेंना देण्यासाठी हे ‘फोटो सेशन’ घडवून आणल्याची शहरात चवीने चर्चा सुरू आहे.

झिरो (०) ते चार (४)… अन् ‘निधी’चा नवा वाटेकरी!

या सगळ्या राड्यात खरा मुद्दा लपलाय तो ‘निधीचा’! धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाची युती फिस्कटली होती. शिंदे गटाने १४ जागा लढवल्या, पण त्यांच्या पदरात पडला मोठा ‘शून्य’ (०)! एकही जागा आली नाही. उलट भाजपने ४१ पैकी २२ जागा जिंकून नगराध्यक्षपद खिशात घातले.

शिंदे गटाचा एकही नगरसेवक नसल्यामुळे, जिल्हा नियोजन समितीमध्ये (DPDC) शिंदे गटाला वाटा द्यायचाच नाही, सर्व मलिदा आपणच खायचा, अशी साहेबांची खेळी होती. पण इथंच ओमराजेंनी गेम केला! त्यांनी ठाकरे गटाचे ४ नगरसेवक शिंदे सेनेत आणले. आता पालिकेत शिंदे गटाचे ४ नगरसेवक झालेत, म्हणजेच आता निधीत त्यांनाही कायदेशीर ‘वाटा’ द्यावाच लागणार!

राजकारणाची गंमत: खांद्यावर हात कुणाचा?

निधीचा वाटा वाचवण्यासाठी आणि ओमराजेंना शह देण्यासाठी मल्हार दादा आणि काकडे सरनाईकांच्या दरबारात गेले खरे; पण सर्वात मोठी गंमत म्हणजे, एकाच पक्षातील दोन नेत्यांमध्ये (ओमराजे आणि सरनाईक) कटुता निर्माण करायला गेलेल्या राहुल काकडे यांच्या खांद्यावर अत्यंत प्रेमाने हात टाकून पालकमंत्री प्रताप सरनाईक फोटोला पोझ देत आहेत!

“तुम्ही आमचे नगरसेवक पळवा, आम्ही तुमच्या पालकमंत्र्यांसोबत फोटो काढतो,” असा हा सगळा राजकीय पोरखेळ धाराशिवकर उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत. आता या ‘फोटो-बॉम्ब’वर ओमराजे काय उत्तर देणार? हे पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे!

Previous Post

येरमाळा : येडेश्वरी मंदिर परिसरात खेट्याच्या दोऱ्यावेळी गर्दीचा फायदा घेत १.४० लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

Next Post

पवनराजे हत्याकांड : डॉ. पद्मसिंह पाटलांसह ९ जणांच्या सुटकेला उच्च न्यायालयात आव्हान

Next Post
पवनराजे हत्याकांड : डॉ. पद्मसिंह पाटलांसह ९ जणांच्या सुटकेला उच्च न्यायालयात आव्हान

पवनराजे हत्याकांड : डॉ. पद्मसिंह पाटलांसह ९ जणांच्या सुटकेला उच्च न्यायालयात आव्हान

ताज्या बातम्या

धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष

धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष

October 18, 2026
‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!

‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!

October 18, 2026
हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा

हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा

October 18, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता

October 17, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला

October 17, 2026

Recent Posts

  • धाराशिव नगर पालिका : अखेर उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांचा राजीनामा मंजूर; नव्या निवडीकडे सर्वांचे लक्ष
  • ‘रडू नको बाळा’वर डिवचणारा कार्यकर्ता आता ओमराजेंच्याच गळ्यात गळा घालून रडला; नितीन शेरखानेंचा भाजपला ‘बदाबदा’ दणका!
  • हॉटेल मालकाचा खून करून चार राज्यांत पळालेल्या आरोपींच्या धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या; ४८ तासांत छडा
  • धाराशिव जिल्ह्यात अपहरणाच्या दोन घटना; ढोकीत ५२ वर्षीय व्यक्ती तर आनंदनगरमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता
  • उमरगा : ‘आमच्याकडे रागाने का बघतोस?’ म्हणून २४ वर्षीय तरुणावर कोयता, काठी अन् बेल्टने हल्ला
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!