• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, September 13, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

पवनराजे हत्याकांड : डॉ. पद्मसिंह पाटलांसह ९ जणांच्या सुटकेला उच्च न्यायालयात आव्हान

आनंदीदेवी निंबाळकरांची याचिका, संबंधितांना नोटीस

admin by admin
September 3, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
पवनराजे हत्याकांड : डॉ. पद्मसिंह पाटलांसह ९ जणांच्या सुटकेला उच्च न्यायालयात आव्हान
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

 धाराशिव : कै. पवनराजे निंबाळकर व त्यांचे वाहनचालक समद काझी यांच्या बहुचर्चित दुहेरी हत्याकांडात मुंबई सत्र न्यायालयाने राज्याचे माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह ९ आरोपींची केलेली निर्दोष मुक्तता आता मुंबई उच्च न्यायालयात आव्हानात आली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मातोश्री आनंदीदेवी निंबाळकर यांनी १८ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयात अपील दाखल केले असून, न्यायालयाने याप्रकरणी संबंधित सर्व आरोपींना नोटीसा बजावल्या आहेत.

न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार – खा. ओमराजे

सत्र न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “सत्र न्यायालयाने निकाल देताना अनेक महत्त्वाचे कायदेशीर मुद्दे आणि पुरावे गृहीत धरले नाहीत. उच्च न्यायालयात या सर्व कायदेशीर बाबींचा किस पडणार असून ते मुद्दे आम्ही प्राधान्याने मांडू. पवनराजेंच्या मारेकऱ्यांना कोणतीही माफी नाही आणि न्याय मिळेपर्यंत आमचा हा लढा सुरूच राहील,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

विशेष सत्र न्यायाधीश सत्यनारायण आर. नावंदर यांनी सबळ पुराव्यांचा अभाव आणि माफीचा साक्षीदार पारसमल जैन याच्या साक्षीत आढळलेल्या त्रुटी व विसंगतींच्या आधारे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. या निकालामुळे तब्बल २० वर्षांनंतरही ‘पवनराजेंना कोणी व का मारले?’ हा प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे.

या आरोपींना मिळाली होती निर्दोष मुक्तता

भादंवि कलम ३०२, १२० (ब) आणि आर्म्स ॲक्ट कलम ३, २५ व २७ अन्वये दाखल गुन्ह्यातून खालील आरोपींची मुक्तता झाली होती, ज्याविरोधात आता अपील करण्यात आले आहे:

  • डॉ. पद्मसिंह पाटील

  • सतीश मंदाडे

  • मोहन शुक्ला

  • पारसमल जैन (माफीचा साक्षीदार)

  • दिनेश तिवारी

  • महात्मा उर्फ पिंटू सिंग चौधरी

  • कैलास यादव

  • ग्यानेंद्र ऊर्फ छोटे पांडे

  • शशिकांत कुलकर्णी

कोठडीचा कालावधी : डॉ. पाटील ३ महिने, तर शूटर तब्बल १५ वर्षे तुरुंगात

या संपूर्ण खटल्यादरम्यान आरोपींच्या कोठडीच्या कालावधीत मोठी तफावत पाहायला मिळाली:

  • डॉ. पद्मसिंह पाटील : ६ जून २००९ रोजी अटक झाल्यानंतर २५ सप्टेंबर २००९ रोजी अलिबाग न्यायालयाने त्यांना २ लाख रुपयांच्या मुचलक्यावर जामीन मंजूर केला. ते सर्वात कमी काळ म्हणजे ३ महिने १९ दिवस कोठडीत राहिले.

  • दिनेश तिवारी (शूटर) : सर्वाधिक काळ म्हणजे १५ वर्षे ११ महिने न्यायालयीन कोठडीत राहिला.

  • पिंटू सिंग चौधरी (शूटर) : १५ वर्षे १० महिने तुरुंगात घालवले.

  • पारसमल जैन (माफीचा साक्षीदार) : १४ वर्षे ६ महिने कोठडीत राहिला.

दीर्घकाळ चाललेल्या सुनावणीमुळे तिवारी आणि चौधरी या दोघांना एप्रिल २०२५ मध्ये जामीन मंजूर झाला होता. आता हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्याने निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Previous Post

 ‘भावी खासदारां’चा पालकमंत्र्यांसोबत ‘फोटो’ बॉम्ब; ओमराजेंना डिवचण्याचा डाव की ‘निधी’ची तडजोड?

Next Post

धाराशिव : ‘SIO’ संघटनेच्या नावावर सोशल मीडियाद्वारे जकात व देणगी गोळा करून लाखो रुपयांचा गंडा

Next Post
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : 'SIO' संघटनेच्या नावावर सोशल मीडियाद्वारे जकात व देणगी गोळा करून लाखो रुपयांचा गंडा

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

September 13, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर

September 13, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

हिंगळजवाडी : शेतातील गवत व झुडपे काढण्यावरून ७५ वर्षीय वृद्धावर कुऱ्हाड अन् खोऱ्याने प्राणघातक हल्ला; ५ जणांवर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल

September 12, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

पश्चिम लोहटा : ग्रामपंचायतीत रोजगार सेवकाच्या बाजूने हात वर केल्याने ग्रामस्थाला मारहाण; ८ जणांवर शिराढोण पोलिसांत गुन्हा दाखल

September 12, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

भूम : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला बालविवाह; पीडिता गर्भवती, पतीसह नातेवाइकांवर पोक्सो अन् बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

September 12, 2026

Recent Posts

  • आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद
  • बुकनवाडीत थरार : चौकातून दुचाकी नेण्याच्या वादातून २४ वर्षीय तरुणाचा पोटात धारदार शस्त्र खुपसून खून; ५ जण गंभीर
  • हिंगळजवाडी : शेतातील गवत व झुडपे काढण्यावरून ७५ वर्षीय वृद्धावर कुऱ्हाड अन् खोऱ्याने प्राणघातक हल्ला; ५ जणांवर ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल
  • पश्चिम लोहटा : ग्रामपंचायतीत रोजगार सेवकाच्या बाजूने हात वर केल्याने ग्रामस्थाला मारहाण; ८ जणांवर शिराढोण पोलिसांत गुन्हा दाखल
  • भूम : १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने लावला बालविवाह; पीडिता गर्भवती, पतीसह नातेवाइकांवर पोक्सो अन् बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!