• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, September 5, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी

admin by admin
September 5, 2026
in राजकारण
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

Version 1.0.0

0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: भारतीय जनता पार्टीच्या धाराशिव जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाला गती देण्यासाठी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी आज (दि. ५ सप्टेंबर) नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नियुक्त्यांमध्ये ग्राम पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक संधी देण्यात आली असून, यामुळे भारतीय जनता पार्टी अधिक सक्षम आणि मजबूत झाली आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

नव्याने करण्यात आलेल्या संघटनात्मक नियुक्त्या खालीलप्रमाणे आहेत:

  • सरचिटणीस: माधव बळीराम पवार (उमरगा ग्रामीण – कोराळ), शिवाजी अन्याबा गिड्डे पाटील (कळंब ग्रामीण – डिकसळ)

  • उपाध्यक्ष: दिलीपसिंह करणसिंह गौतम (उमरगा ग्रामीण – माडज), गौतम रामा लटके (परंडा ग्रामीण – राजुरी), दत्तात्रय काशिनाथ मोहिते (भूम ग्रामीण – वालवड)

  • सचिव (चिटणीस): राहुल हरिभाऊ काकडे (धाराशिव शहर), ज्ञानेश्वर सोपान गीते (भूम ग्रामीण – आंडुड), संग्राम गुणवंतराव देशमुख (धाराशिव ग्रामीण – ढोकी), विठ्ठल रामभाऊ माने (कळंब ग्रामीण – गंभीरवाडी), प्रमोद रामदास पोतदार (लोहारा शहर)

  • सोशल मीडिया जिल्हा समन्वयक: अविनाश ज्योतीराम भोसले (धाराशिव ग्रामीण – पळसप)

राहुल काकडेंच्या नियुक्तीवर कुलकर्णींचे स्पष्टीकरण

काही दिवसापूर्वी राहुल काकडे यांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) जिल्हाध्यक्ष पदावरून हटवण्यात आले होते. आता या नव्या यादीत त्यांची पक्षाच्या मुख्य कार्यकारिणीत सचिव (चिटणीस) म्हणून वर्णी लागली आहे. यावर बोलताना दत्ता कुलकर्णी यांनी स्पष्ट केले की, “जेव्हा भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष पद संपते, त्यानंतर संबंधित पदाधिकाऱ्याला मुख्य कार्यकारिणीत (फादर बॉडीवर) चिटणीस म्हणून सामावून घेण्याची पद्धत आहे. त्यानुसारच त्यांना घेण्यात आले आहे.”

सहा महिन्यांत पद गेले अन् ‘रडक्याचे डोळे पुसले’

भाजपच्या या नियुक्त्यांनंतर राजकीय वर्तुळात मात्र वेगळीच खुमासदार चर्चा रंगली आहे. राहुल काकडे यांचे भाजयुमोचे जिल्हाध्यक्षपद अवघ्या सहा महिन्यांतच गेले होते. त्यामुळे आता मुख्य कार्यकारिणीत सचिव पद देऊन त्यांची नाराजी दूर करण्यात आली आहे. यावरून पक्षात सध्या ‘रडक्याचे डोळे पुसण्यात आले’ असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे.

Previous Post

उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये भाजपची नवी टीम: तळागाळातील कार्यकर्त्यांना संधी, संघटनात्मक बांधणीवर भर

धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी

September 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा

September 5, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कळंब : बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चिमुरडीच्या गळ्यातील ३० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास; कळंब पोलिसांत गुन्हा दाखल

September 5, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

हंगरगा (नळ) : जागेच्या वादातून वृद्ध महिलेला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; ८ जणांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 5, 2026
शिक्षक दिनीच गुरुजींचे उपोषण! ‘माऊलीं’ची धावपळ अन् ‘लेखी’ आश्वासनाशिवाय माघार नाही!

शिक्षक दिनीच गुरुजींचे उपोषण! ‘माऊलीं’ची धावपळ अन् ‘लेखी’ आश्वासनाशिवाय माघार नाही!

September 5, 2026

Recent Posts

  • धाराशिव जिल्हा भाजपच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; ग्रामपातळीवरील कार्यकर्त्यांना संधी
  • उमरगा : बायपासवर पिकअपमधून १० घोड्यांची क्रूरपणे बेकायदेशीर वाहतूक; वाहनासह २.७० लाखांचा मुद्देमाल जप्त, आंध्र प्रदेशातील चालकावर गुन्हा
  • कळंब : बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत चिमुरडीच्या गळ्यातील ३० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास; कळंब पोलिसांत गुन्हा दाखल
  • हंगरगा (नळ) : जागेच्या वादातून वृद्ध महिलेला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; ८ जणांवर नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • शिक्षक दिनीच गुरुजींचे उपोषण! ‘माऊलीं’ची धावपळ अन् ‘लेखी’ आश्वासनाशिवाय माघार नाही!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!